इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयुका या पानावरून पुनर्निर्देशित)
इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स
(आयुका)
IUCAA logo.svg
ब्रीदवाक्य
स्थापना १९८८
संस्थेचा प्रकार संशोधन संस्था
मिळकत
कर्मचारी
Rector
कुलपती
अध्यक्ष
संचालक सोमक रायचौधुरी[१]
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी
पदवी
पदव्युत्तर
स्नातक
स्थळ पुणे, महाराष्ट्र, भारत
आवार शहरी
रंग
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ www.iucaa.ernet.in
आयुकामधील आर्यभटचा पुतळा

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स (इंग्रजी: Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)) ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती आयुका या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोर्रिआ यांनी केली.[२]

इतिहास[संपादन]

प्रा. गोविंद स्वरूप यांनी नारायणगावजवळील खोडद येथे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप बसवल्यानंतर नियोजन आयोगाच्या प्रा. यश पाल यांनी देशामध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीसाठी संयुक्त सुविधा असली पाहिजे असा प्रस्ताव मांडला. यावर काम करून खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी अजित केंभावी आणि नरेश दधिच यांच्यासोबत १९८८ मध्ये आयुकाची स्थापना केली.[२]

२००२ साली आयुकाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी नागपूर (महाराष्ट्र), तिरुवला (केरळ), सिलिगुरी (पश्चिम बंगाल) येथील विद्यापीठांसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मदतीने अभ्यागत कार्यक्रम सुरू केला.[३]

२००४ साली आयुकाने पु.ल. देशपांडे संस्थेच्या अनुदानाने "मुक्तांगण विज्ञान शोधिका" या विज्ञान केंद्राची सुरूवात केली. हे केंद्र पुण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.[४] २००९ साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी आयुकाची निवड करण्यात आली.[५]

प्रा. जयंत नारळीकर पहिली दहा वर्षे आयुकाचे संचालक होते. त्यानंतर अनुक्रमे प्रा. नरेश दधिच व प्रा. अजित केंभावी आयुकाचे संचालक होते. सप्टेंबर २०१५ पासून डॉ. सोमक रायचौधुरी आयुकाचे संचालक आहेत.[६]

संशोधन[संपादन]

आयुकातील शास्त्रज्ञ खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि भौतिकशास्त्रातील क्वांटम गुरुत्व, विश्वनिर्माणशास्त्र, गुरुत्वीय लहरी, ऑप्टिकल आणि रेडिओ खगोलशास्त्र अशा अनेक विभागात संशोधन करतात.

सुविधा[संपादन]

पर्सिस्टंट सिस्टम्स पुणे यांच्या सहकार्याने आयुका आभासी वेधशाळा प्रकल्प चालवते. हा प्रकल्प वापरकर्त्यांना रॉ डेटा आणि पर्सिस्टंट सिस्टम्सच्या अभियंत्यांनी बनवलेले त्यावर प्रकिया करणारे आधुनिक सॉफ्टवेअर पुरवतो.[७]

त्याचबरोबर आयुका गिरवली वेधशाळा चालवते. गिरवली वेधशाळा पुण्यापासून जवळपास ८० किमी अंतरावर ऐतिहासिक जुन्नर जवळ एका डोंगरावर आहे. सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून येणार्‍या निरीक्षण प्रस्तावांसाठी राखून ठेवते. येथील दुर्बिणीचा प्राथमिक आरसा २ मीटर व्यासाचा असून दुय्यम आसरा ६० सेंटीमीटर व्यासाचा आहे. सध्या दुर्बिणीमध्ये आयुका फेंट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ आणि कॅमेरा (आयएफओएससी) हे मुख्य उपकरण आहे.[८]

आयुकाने रामन संशोधन संस्था आणि भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या सोबतीने आंतरराष्ट्रीय महादुर्बिणी प्रकल्पामध्ये दहा टक्के वाटा घेण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना जायंट मॅगेलन टेलिस्कोप, थर्टी मीटर टेलिस्कोप आणि युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप यांसारखे आगामी महत्त्वाचे टेलिस्कोप वापरण्याची संधी मिळेल.[९]

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. कर्मचारी. आयुका. ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  2. २.० २.१ दधिच, नरेश. From Sand Dunes To IUCAA: A Mirage. आयुका. ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  3. चांदवरकर, राहुल. "IUCAA aims sky-high via campaign", Times of India, १९ नोव्हेंबर, २००२. (इंग्रजी मजकूर) 
  4. ढवसे, रसिका. "The people's astronomer", India Together, जानेवारी २००४. (इंग्रजी मजकूर) 
  5. येवलेकर, राजेंद्र. "हे विश्वचि माझे घर!", लोकसत्ता, २१ जानेवारी २००९. (मराठी मजकूर) ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. 
  6. "डॉ. सोमक रायचौधुरी", लोकसत्ता, ३ सप्टेंबर, २०१५. (मराठी मजकूर) ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. 
  7. TNN. "IUCAA unveils country’s first virtual observatory", Times of India, ७ जानेवारी , २००३. (इंग्रजी मजकूर) ३ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले. 
  8. IUCAA Girawali Observatory. आयुका. ३ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  9. "आयुका प्रस्ताव", लोकसत्ता, ७ ऑगस्ट २००९. (मराठी मजकूर) ३ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.