बनारस हिंदू विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बनारस हिंदू विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरातील विद्यापीठ आहे. याला काशी विश्वविद्यालय किंवा बीएचयू नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा आयटी-बीएचयू नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये आयआयटीचा दर्जा दिला गेल्यावर या शाखेला आयआयटी-बीएचयू असे नाव दिले गेले. 1960च्या सुमारास हैदराबाद निज़ाम- मीर उस्मान अली खानने 10 लाख रुपये दान केले. [१] याची स्थापना १९१६ साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती.

संदर्भ[संपादन]

  1. ^ missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/

बाह्य दुवे[संपादन]