अॅस्ट्रोसॅट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲस्ट्रोसॅट या पानावरून पुनर्निर्देशित)

अॅस्ट्रोसॅट हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो ने खगोलशास्त्रीय संशोधनासाठी सोडलेला पहिलाच उपग्रह आहे. तो दि. २८ सप्टेंबर २०१५ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून पी.एस.एल.व्ही. या रॉकेटच्या साहाय्याने, भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजता यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आला. [१]

इस्रोने ’इंडियन एक्स-रे अॅस्ट्रोनाँमी एक्सपेरिमेन्ट’च्या यशानंतर, १९९६ साली प्रक्षेपित केलेल्या उपग्रहापेक्षा अधिक आधुनिक अशा अॅस्ट्रोसॅटसाठी २००४साली मंजुरी दिली होती.

भारतातल्या प्रतिष्ठित संशोधन संस्था आणि परदेशातील प्रतिष्ठित संस्था भारतातील इस्रो (ISRO)[२] , इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फोर अॅस्ट्रोनाँमी आणि अॅस्ट्रोफिसिक्स (आयुका) (ICUAA)[३], टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, मुंबई (टी.आय.एफ.आर) (TIFR)[४], रामन रिसर्च इन्स्टिट्यूट (RRI)[५], इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिसिक्स (IIA)[६], फिजिकल रिसर्च लँबोरेटरी (PRL)[७], आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी,[८], लंडनची युनिव्हर्सिटी ओफ लिचेस्टर या संस्थांनी ह्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी मदत केली आहे.

अॅस्ट्रोसॅटच्या प्रक्षेपणानंतर भारत हा, ज्याची अवकाशातही प्रयोगशाळा आहे, अशा अमेरिका, रशिया, युरोपिअन स्पेस एजन्सी आणि जपाननंतर जगातील चौथा देश बनला आहे .[९]

अॅस्ट्रोसॅट हा मल्टि-तरंगलांबीची सोय असलेला खगोलशास्त्र उपग्रह असून तो विषुववृत्तीय कक्षेत पी.एस.एल.व्ही. रॉकेटच्या साहाय्याने प्रस्थापित करण्यात आला आहे. या उपग्रहावर ५ वैज्ञानिक उपकरणे असून ती खगोलीय घटकांचे विविध वारंवारतेच्या साहाय्याने निरीक्षण करू शकतात. या उपकरणामुळे दृश्यमान (320-530 एनएम) कव्हर, अतिनील (180-300 एनएम), अतिनील (130-180 एनएम), सॉफ्ट क्ष-किरण (0.3-8 Kev आणि 2-10 Kev) आणि हार्ड क्ष-किरण (3-80 Kev आणि 10-150 Kev) या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा अभ्यास करता येतो.

अॅस्ट्रोसॅटचा हेतू[संपादन]

  • अनेक तरंगलांबींच्या साहाय्याने अतिदूर अंतरावरील वैश्विक किरणांच्या स्रोतांचा व त्यांच्यामध्ये होणार्‍या तीव्र चढ उतारांचे एकाचवेळी निरीक्षण करणे
  • हार्ड क्ष-किरण आणि अल्ट्रा व्हायोलेट परिप्रेक्षामध्ये अवकाशाचे निरीक्षण करणे
  • क्ष किरण बायनरीचा, सक्रिय आकाशगंगेचे केंद्र, मृत तार्‍यांचे अवशेष, तार्‍यांचे प्रभामंडळ यांचे वेगवेगळ्या तरंग लांबीमध्ये निरीक्षण करणे
  • नियमित, अनियमित व अल्पायुषी क्ष किरण स्रोतांचा अभ्यास करणे

उपकरणांची माहिती[संपादन]

  • अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (यू.व्ही.आय.टी) (अतिनील प्रतिमा दुर्बीण)- अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप हा १३०-१८० नॅनोमीटर एनएम), १८०-३०० नॅनोमीटर (एनएम) आणि ३२०-५३० नॅनोमीटर (एनएम) या तीन चॅनेलांमधून एकाचवेळी निरीक्षण करू शकतो. . हे उपकरण संयुक्तरीत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बंगलोर आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फोर अॅस्ट्रोनाँमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका), इस्रो आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या सहयोगाने बनवले आहे. अवकाशाच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे दृश्यमान क्षेत्र, अदूर अतिनील क्षेत्र व सुदूर अतिनील क्षेत्र या तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निरीक्षण करण्यास हे उपकरण सक्षम आहे.
  • लार्ज एरिया झेनॉन प्रपोर्शनल काउंटर (Large Area Xenon Proportional Counters (LAXPC) [मराठी शब्द सुचवा]- हे दुसरे उपकरण आहे. ते क्ष-किरण बायनरी, active galactic nuclei[मराठी शब्द सुचवा](सक्रिय गांगेय बीजुके?) या क्ष-किरण स्रोतांतून होणार्‍या क्ष किरण उत्सर्जनाचे, व त्यात होणारे फेरफारांचे प्रमाण मोजण्यासाठी उपयोगी आहे.. ते मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने व बंगलोरच्या रामन रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केले आहे. हे उपकरण सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही उपकरणापेक्षा पाच पट अधिक क्ष-किरण फोटॉन एनर्जी गोळा करू शकते. ही उर्जा २५ KeV पेक्षा जास्त असते.

संदर्भ[संपादन]