Jump to content

"ना.धों. महानोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने पुनर्निर्देशन ठेउन लेख ना.धों. महानोर वरुन नामदेव धोंडो महानोर ला हलविला: शीर्षकलेखन स...
(चर्चा | योगदान)
ओळ ६०: ओळ ६०:
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा [[जनस्थान पुरस्कार]], इ.स. २००९
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा [[जनस्थान पुरस्कार]], इ.स. २००९
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]], इ.स. २००० - 'पानझड'
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]], इ.स. २००० - 'पानझड'
* महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०७:३२, १३ मार्च २०१७ ची आवृत्ती

नामदेव धोंडो महानोर (सप्टेंबर १६, इ.स. १९४२; पळसखेडे, ब्रिटिश भारत - हयात) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

जीवन

महानोरांचा जन्म सप्टेंबर १६, इ.स. १९४२ रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले[ संदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले[ संदर्भ हवा ].

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंठा (कवितासंग्रह) दीर्घ कविता पॉप्युलर प्रकाशन १९८४/१९०६
गंगा वाहू दे निर्मळ कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावे कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
त्या आठवणींचा झोका साकेत प्रकाशन
दिवेलागणीची वेळ कविता संग्रह साकेत प्रकाशन
पळसखेडची गाणी लोकगीते पॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवे पॉप्युलर प्रकाशन
पानझड पॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
यशवंतराव चव्हाण साकेत प्रकाशन
रानातल्या कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मी साकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवन साकेत प्रकाशन

चित्रपट गीते

चित्रपट वर्ष (इ.स.)
एक होता विदुषक इ.स. १९९२
जैत रे जैत इ.स. १९७७
निवडुंग

राजकीय कारकीर्द

महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त सभासद म्हणून महाराष्ट्र शासनाने महानोरांची शिफारस केल्यावर इ.स. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.

पुरस्कार

बाह्य दुवे

  • http://ndmahanor.com/. Missing or empty |title= (सहाय्य)
  • http://www.marathimati.com/marathi-e-sahitya-sammelan/. Missing or empty |title= (सहाय्य)