Jump to content

"तुकाराम भाऊराव साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अभय नातू यांनी अण्णाभाऊ साठे हे पान पुनर्निर्देशन लावुन अण्णा भाऊ साठे येथे हलवले
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ६०: ओळ ६०:


== कार्य ==
== कार्य ==
अण्णा [[लावणी|लावण्या]], शाहिरी, [[पोवाडा]] या लोककलांमध्ये तरबेज होते. [[मराठी भाषा|मराठीभाषिक]] स्वतंत्र [[महाराष्ट्र]] राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीत]] त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी [[तमाशा]] या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. ''अकलेची गोष्ट'', ''शेटजींचे इलेक्षन'', ''बेकायदेशीर'', ''माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?'', ''मूक मिरवणूक'', ''लोकमंत्र्यांचा दौरा'', ''खापऱ्या चोर'', ''बिलंदर बडवे'' यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील ''गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला'' हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
अण्णा भाऊ साठे हे [[लावणी|लावण्या]], शाहिरी काव्ये, [[पोवाडा]] या लोककलांमध्ये तरबेज होते. [[मराठी भाषा|मराठीभाषिक]] स्वतंत्र [[महाराष्ट्र]] राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीत]] त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी [[तमाशा]] या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. ''अकलेची गोष्ट'', ''शेटजींचे इलेक्षन'', ''बेकायदेशीर'', ''माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?'', ''मूक मिरवणूक'', ''लोकमंत्र्यांचा दौरा'', ''खापऱ्या चोर'', ''बिलंदर बडवे'' यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील ''गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला'' हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध फक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘याची मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्य अविस्मरणीय असेल.


[[चित्र:Annabhau Sathe2.jpg|इवलेसे|डावे|]]
[[चित्र:Annabhau Sathe2.jpg|इवलेसे|डावे|]]

== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
=== कादंबरीवर आधारित चित्रपट ===
=== कादंबरीवर आधारित चित्रपट ===

१५:२१, १ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

अण्णा भाऊ साठे
चित्र:10121 MahaS.jpg
जन्म तुकाराम
ऑगस्ट १, इ.स. १९२०
मृत्यू जुलै १८, इ.स. १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय


तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिले [ संदर्भ हवा ]. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले.

जीवन

ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.

कार्य

अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापऱ्या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध फक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘याची मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्य अविस्मरणीय असेल.

चित्र:Annabhau Sathe2.jpg

कारकीर्द

कादंबरीवर आधारित चित्रपट

अनुक्रमांक कादंबरी चित्रपट संस्था
वैजयंता वैजयंता १९६१ रेखा फिल्म्स
आवडी टिळा लावते मी रक्ताचा १९६९ चित्र ज्योत
माकडीचा माळ डोंगरची मेना १९६९ विलास चित्र
चिखलातील कमळ मुरली मल्हारी रायाची १९६९ रसिक चित्र
वारणेचा वाघ वारणेचा वाघ १९७० नवदिप चित्र
अलगूज अशी ही साताऱ्याची तऱ्हा १९७४ श्रीपाद चित्र
फकिरा फकिरा चित्रनिकेतन

प्रकाशित साहित्य

कादंबऱ्या

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
अग्निदिव्य विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
अलगूज
अहंकार विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
आग विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
आघात
आवडी
केवड्याचे कणीस
कुरूप विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
गुलाम चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
१० चंदन चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
११ चिखलातील कमळ चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
१२ चित्रा विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
१३ जिवंत काडतूस
१४ ठासलेल्या बंदुका
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ तास विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
१७ धुंद रानफुलाचा
१८ पाझर
१९ फकिरा
२० फुलपाखरू विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२१ मंगला चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२२ मथुरा चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२३ माकडीचा माळ
२४ मास्तर चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२५ मूर्ती चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२६ रत्ना विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२७ रानगंगा
२८ रानबोका विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२९ रूपा विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
३० वारणेचा वाघ
३१ वारणेच्या खोऱ्यात विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
३२ वैजयंता
३३ वैर
३४ संघर्ष विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
३५ सैरसोबत

कथासंग्रह

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
आबी दुसरी आवृत्ती
कृष्णाकाठच्या कथा
खुळंवाडी
गजाआड पाचवी आवृत्ती
गुऱ्हाळ
चिरानगरची भुतं प्रथम आवृत्ती
नवती
निखारा
पिसाळलेला माणूस
फरारी
१० बरबाद्या कंजारी प्रथम आवृत्ती विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
११ भानामती
१२ लाडी दुसरी आवृत्ती


नाटके

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
इनामदार प्रथम आवृत्ती, मे १९५८ चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
पेंग्याचं लगीन
सुलतान

शाहिरी

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
शाहीर दुसरी आवृत्ती १९८५ मनोविकास प्रकाशन, मुंबई

तमाशा

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
अकलेची गोष्ट चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
कलंत्री
खापऱ्या चोर
दुष्काळात तेरावा
देशभक्त घोटाळे विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
निवडणुकीतील घोटाळे
पुढारी मिळाला
पेंग्याचं लगीन
बिलंदर बुडवे
१० बेकायदेशीर
११ माझी मुंबई
१२ मूक मिरवणूक्
१३ लोकमंत्र्यांचा दोरा
१४ शेटजीचं इलेक्शन

प्रवासवर्णने

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
माझा रशियाचा प्रवास सुरेश एजन्सीज ,पुणे

प्रसिद्ध पोवाडे

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
नानकीन नगरापुढे
स्टलिनग्राडचा पोवाडा
बर्लिनचा पोवाडा
बंगालची हाक
पंजाब-दिल्लीचा दंगा
तेलंगणाचा संग्राम
महाराष्ट्राची परंपरा
अंमळनेरचे अमर हुतात्मे
मुंबईचा कामगार
१० काळ्या बाजाराचा पोवाडा

अधिक वाचन

  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्‌मय - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
  • अण्णा भाऊ साठे (लोकवाङ्‌मय) - लेखक बाबुराव गुरव, प्रकाशक: लोकवाङ्‌मय गृह प्रा. लि.
  • अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या : प्रकाशक : लोकवाङ्‌मय गृह