सदस्य चर्चा:अभय नातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४
चर्चा २७ (Archive 27) सप्टेंबर २, इ.स. २०१४ नोव्हेंबर १६, इ.स. २०१५
चर्चा २८ (Archive 28) नोव्हेंबर १६, इ.स. २०१५ सप्टेंबर १४, इ.स. २०१६
चर्चा २९ (Archive 29) सप्टेंबर १४, इ.स. २०१६ मार्च २०, इ.स. २०१७
चर्चा ३० (Archive 30) मार्च २०, इ.स. २०१७ जून ३०, इ.स. २०१७

माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न, इ. येथे नोंदवा.

अभ्युदय व नि:श्रेयस===[संपादन]

'अभ्युदय व नि:श्रेयसची दीक्षा देणारा जैन धर्म' या विषयावरील लेखाची मी सुरुवात केली होती.पण हा लेख बदलला किंवा वगळला असे म्हंटले आहे. पण त्यामागचे कारण समजू शकेल का? कारण संदर्भासहीत लिखाण अपेक्षित असते हे मला माहित आहे. ही फक्त सुरुवात होती .मी नेहमी लिहित नाही त्यामुळे कृपया मार्गदर्शन करावे .

त्वक्‌ स्नेह ग्रंथी[संपादन]

मराठीच्या १९६२च्या नियमांनुसार शब्दाच्या शेवटी हलन्त अक्षर आल्यास ते पूर्र्ण करून लिहितात. उदा० अकस्मात्‌, अर्थात्‌, कदाचित्‌, दैववशात्‌, परिषद्‌ भगवान्‌, विद्युत्‌, विद्वान्‌, सम्यक्‌, सम्राट्‌, संसद्‌ असले शब्द लिहिताना शेवटच्या अक्षराचा पाय मोडत नाहीत. तसेच बायरन्‌, वॉटसन्‌, बँक्‌ आदी शब्द लिहितानाही तोच संकेत पाळतात. (अपवाद - ‘आणि’ या अर्थी येणारे न्‌ आणि अन्‌ हे शब्द!)

शब्दातल्या शेवटच्या अक्षराचा पाय मोडू नये असा नियम असल्याने शब्दाच्या मधल्या भागात हलन्त व्यंजन आले तर त्याचा पाय मोडायला हरकत नाही, नव्हे तो मोडलाच पाहिजे. उदा० एल्‌एल.बी., कीट्‌स, घरन्‌घर, पीएच्‌डी, फूड्‌ज, लॉर्ड्‌स, वाङ्‌मय, विद्युत्‌प्रवाह, स्पोर्ट्‌स, वगैरे.

‘त्वक्‌स्नेहग्रंथी’मध्ये क्‌ हे अक्षर शब्दाच्या मधल्या भागात आल्याने ते तसेच हलन्त लिहिता येते. ... (चर्चा) २२:३९, १२ जुलै २०१७ (IST)

@:
उत्तराबद्दल धन्यवाद.
याच्याशी निगडीत शंका - जर शब्दाच्या मधले अक्षर हलन्त असले तर मग त्याची संधी का होत नाही, उदा, एल्एलबीचे एलेलबी किंवा घरन्‌घरचे घरन्घर (अथवा घरंघर) असे का नाही लिहिले जात? त्यासाठी काही नियम आहेत का?
अभय नातू (चर्चा) २२:४४, १२ जुलै २०१७ (IST)

---

संधी करता येतो[संपादन]

संधी करता येतो पण असे करण्याने शब्दातल्या अक्षरांच्या मूळ रूपाला आणि अर्थाला धक्का बसणार नाही याची काळजी घेतली की झाले. एल्‌एल.बी ऐवजी एलेल.बी. लिहिले तर या लघु रूपातली मूळ अक्षरे कोणती ते समजणार नाही. गप्‌शार हा शब्द गप्शार असा लिहिला तर मूळ गप्‌ (म्हणजे निपचित, न बोलणारा) हा शब्द असल्याचे जाणवणार नाही. संस्कृतमध्येही मा उदकैः ताडय ऐवजी मोदकैः ताडय म्हटले की ‘माझ्यावर पाणी फेकू नकोस’ या मूळ अर्थाऐवजी ऐवजी ‘माझ्यावर मोदक फेक’ असा अर्थ विचित्र अर्थ होतो. त्यामुळे शक्य असेल आणि जरूर असेल तर संधी टाळावेत, निदान मराठीत तरी.

वाङ्‌मय हा शब्द वाङ्मय असा लिहिला तरी चालतो, तसेच विद्युत्‌प्रवाहाऐवजी विद्युत्प्रवाह. या दोनही उदाहरणांत संधी करण्याने काही तोटा झालेला नाही.. तसे एलेल्बी किंवा पीएच्डीमध्ये होत नाही. त्वक्‌ स्नेह ग्रंथी हा शब्द त्वक्स्नेहग्रंथी असा लिहिता येईल, पण त्याचा उच्चार करणे काहींना जड जाईल.

आपण ज्या चिन्हाला पाय मोडायचे चिन्ह म्हणतो त्याला संस्‍कृत, हिंदी आणि तमाम अन्य भारतीय भाषांमध्ये ‘विराम चिह्न’ म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे, तो असा की जेव्हाजेव्हा देशी शब्दात हे चिन्ह दिसेल तेव्हातेव्हा विराम (पॉज) घेऊन पुढचे अक्षर उच्चारायचे. घरन्‌घर हा शब्द घरन्‌ (पॉज) घर असा उच्चारतात. घरन्घर किंवा घरंघर लिहिले की हा पॉज घेतला जात नाही. बालोद्यान हा शब्द बालोद्‌यान असा लिहिला तर उच्चार बालोद्‌ (पॉज) यान (हे कुठले यान?) असा होऊन अर्थ विपर्यास होईल. जेव्हा विराम घेतल्याने अर्थविपर्यास होत नसेल तरच पायमोडके अक्षर लिहितात. विद्वांस या शब्दाचा उच्चार विद्‌(पॉज)वांस असा होत असल्याने तो विद्‌वांस असा लिहिणे फारसे चुकीचे नाही. मात्र ‘सध्या’ हा शब्द सध्‌या असा लिहिता येणार नाही. कारण शब्दाच्या उचित उच्चारात ध्‌ नंतर विराम नाही. सद्‌गती, भगवद्‌गीता, सत्‌चिदानंद हे शब्द असे लिहिले तरी चालते, कारण त्यांतील हलन्त अक्षरानंतर नैसर्गिक विराम आहे..... (चर्चा) ००:४६, १३ जुलै २०१७ (IST)

@:,
वा! व्याकरणातील खोचा अशा उलगडून सांगितल्यात की लगेचच कळले.
आमच्या शालेय जीवनातही असेच स्पष्टीकरण मिळत गेले असते तर काय बरे झाले असते! असो, तेव्हा नाही तर नाही, आता तरी कळते आहे (आणि वळते आहे).
पुन्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:५४, १३ जुलै २०१७ (IST)

मुखपृष्ठ[संपादन]

मुखपुष्ठात लेफ्ट साईड मध्ये काही खाली दिसते जागा त्यात जर खलील कोड टाकला तर कसे दिसेल ते पहा.

|-
! <div style="position: absolute; margin-top: -6px; margin-left: 4px;">[[चित्र:Wikipedia-logo.png|37px|link=|alt=]]</div><div style="margin: 0; background: #cedff2; font-size: 120%; text-align: left; font-weight: bold; -moz-border-radius:1em; -webkit-border-radius:1em; border-radius:1em; solid #f5faff; padding: 0;"><div style="margin-left: 50px;">[[सहाय्य:संपादन|<span style="color: #000000;">नवीन लेख कसा लिहावा?</span>]]</div></div>
|-
|{{मुखपुष्ठ नवीन पान २०१७}}

एक उधारण माझे धूळपाटी वर आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:१६, १७ जुलै २०१७ (IST)

बहुवचन[संपादन]

List of Caves चे मराठी भाषांतर कसे असेल? लेणींची यादी की लेण्यांची यादी ? --संदेश हिवाळेचर्चा २२:३१, १७ जुलै २०१७ (IST)

@संदेश हिवाळे:
बहुवचन लेण्यांची यादी असे होईल.
Cavesचे भाषांतर गुहा होते. लेणे हे कलाकुसर (चित्र, शिल्प, इ.) असलेल्या गुहांना म्हणतात.
अभय नातू (चर्चा) २२:५९, १७ जुलै २०१७ (IST)