पोवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो.

पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हटले जाते. पोवाड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये "पवद" असा केलेला आढळतो.

मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. यात ऐतिहासिक घटना समोर ठेऊन गीत रचना केली जाते आणि वेगळ्या धाटणीने मनोरंजक पद्दतीने गायली जाते. या गीत प्रकाराची रचना करणारे आणि जे गातात त्यांना शाहीर असे संबोधले जाते. हा गीत प्रकार अलीकडील काळातील अगदी नजरेसमोरील आहे. त्यात अनेक इतिहासातील घटना प्रकार सामावलेले आहेत.[१]

अलीकडे व्यवसाय म्हणून जे गायक समोर आलेत त्यांना गोंधळी म्हणून ओळखले जाते. अलीकडील स्मरणातील पोवाडा म्हणजे १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझल खाणाचा वध केला त्यावर आधारित अग्निदास यांनी गायला होता. दूसरा स्मरणात राहील असा पोवाडा म्हणजे तुलसीदास यांचा तानाजीने सिंहगड सर केला त्यावेळचा तानाजी मालुसरे वरील केलेला पोवाडा ! शिवाय बाजी पासलकर यांचेवर यमाजी भास्कर यांनी केलेला पोवाडा.

पेशवे जेव्हा राज्य करत होते तेव्हा राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होणाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) यांनी अगणित पोवाडे रचना केली.[२]

हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रीयांचे पोवाडे’ हे नामकरण करून १८९१ मध्ये प्रसिद्ध केले.[३] यापैकी १० पोवाडे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ‘बललाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडा)नावाने प्रसिद्ध केले.

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.[४]

महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले याची नोंद ब्रिटिश रेकोर्डवर आहे.[५]

महानुभाव संप्रदायामध्ये भानुकवी जामोदेकर यांनी पोवाडयाला सर्वप्रथम सुरूवात केली. स्वातंन्न्याचा पोवाडा ,रझाकाराचा पोवाडा त्यानी केला.त्यांचा जन्म 1923 साली नांदेड जिल्हयात झाला. याबरोबरचा त्यांनी काही काळ शाहीरी व कलगीतुÚयाचे अनेक प्रयोग केले.

संदर्भ[संपादन]

  1. "महाराष्ट्रीयन लोकगीते एक संग्रहण", पोवाडे.कॉम, २५ जुलै २०१६. 
  2. "पोवाडा", ट्रान्सलिटरल.ऑर्ग, २५ जुलै २०१६. 
  3. "अक्वोर्थ-शालिग्राम मराठी पोवाडे संग्रह", बुक्स.गूगल.कॉ.इन, २५जुलै २०१६. 
  4. "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधील पोवाडा गीत", बीएचमुव्हीजन्यूज.ब्लॉगस्पॉट.इन, ६ सप्टेंबर २०१०. 
  5. "महात्मा फुले यांची साहित्यिक पुस्तके", झेलशीनगरामटेके.ब्लॉगस्पॉट.इन, ५ जून २०११.