सुशीलकुमार शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे

एका कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे


कार्यकाळ
जानेवारी १६, इ.स. २००३ – नोव्हेंबर १, इ.स. २००४
मागील विलासराव देशमुख
पुढील विलासराव देशमुख

कार्यकाळ
इ.स. १९७४ – इ.स. १९९२

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील सुभाष देशमुख
मतदारसंघ सोलापूर
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील सुशीलकुमार शिंदे
पुढील सुभाष देशमुख
मतदारसंघ सोलापूर
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील लिंगराज वल्याळ
पुढील सुशीलकुमार शिंदे
मतदारसंघ सोलापूर

जन्म सप्टेंबर ४, इ.स. १९४१
सोलापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय कांग्रेस
पत्नी उज्ज्वला शिंदे (महाजन)
अपत्ये ३ मुली (प्रणिती शिंदे)
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

सुशीलकुमार संभाजीराव शिंदे (सप्टेंबर ४, इ.स. १९४१; सोलापूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १६ जानेवारी इ.स. २००३ ते १ नोव्हेंबर, इ.स. २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात गृह खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.

सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेता होत..

खडतर प्रवास[संपादन]

सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना त्या वेळी शाळेत बसविलेल्या नाटकातही काम केले. न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्‍लार्कची जागा मिळाली. १९६५ मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली, तिच्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्‌‍एल्‌‍बीचे शिक्षण पूर्ण केले.

राजकीय कारकीर्द[संपादन]

पोलिस निरीक्षक असल्याने सुशिलकुमार शिंदे यांचा राज्यकर्त्यांशी संबंध यायचा. पुढे मुंबईत एके दिवशी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट झाली. परिचय वाढत गेला. घट्ट मैत्री झाली. राजकारणात प्रवेश करण्याविषयी विचारणा झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीत कामास सुरुवात करण्याची तयारी दाखविली. पुन्हा नोकरीचा राजीनामा दिला. पवारांनी पुढे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार केले.

६ नोव्हेंबर १९७१ ला शिंद्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ९ नोव्हेंबरपासून सोशॅलिस्ट फोरमचा निमंत्रक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

१९७२मध्ये सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघातून तिकीट मिळणार होते. मात्र, ते ऐनवेळी मिळाले नाही. पुढे या मतदारसंघाचे आमदार ताराप्पा सोनवणे यांचे आकस्मित निधन झाले. पोटनिवडणूक लागली. शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. विजय संपादन करून ते २३ एप्रिल १९७३ रोजी प्रथमच आमदार झाले.[१][२][३]

वादग्रस्त विधाने[संपादन]

  • "हा अतिशय गंभीर विषय आहे. सिनेमाचा विषय नाही. तुम्‍ही बसा," श्री.सुशीलकुमार जया बच्चन यांना उद्देशून राज्यसभेत बोलले. नंतर त्यांनी जया बच्चन यांची माफी मागितली.[४]
  • "लोक बऱ्याच गोष्टी विसरत असतात. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झालेले पेट्रोल पंपवाटपाचे प्रकरणही लोक विसरले. त्यामुळे कथित कोळसा प्रकरणही विसरायला वेळ लागणार नाही. कोळशाचे तर असे आहे, तो धुतला की पुन्हा स्वच्छ................ ' -कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना [५]

धर्मानुकरण[संपादन]

  • तिरूपती दर्शनाला

१) राज्यपाल झाल्यावर [६]

२) केंद्रसरकारमध्ये गृहमंत्री झाल्यावर

  • कुंभमेळा

तसे आपले राजकारणी संवेदनहीनच आहेत. घाटकोपर येथे बॉम्बस्फोट झाले , तेव्हा जखमी वा मृतांच्या नातेवाईकांना धीर द्यायचे सोडून शिंदे कुंभमेळ्याच्या उद्‌घाटनाला गेले होते. तेथील साधूंबरोबर या संधिसाधूंची छायाचित्रे साऱ्या महाराष्ट्राने पाहिली. आता कुपोषणाने बालमृत्यूचे थैमान सुरू असताना आमचे मुख्यमंत्री बँकॉकला गेले होते. या लोकांना आधुनिक नीरो म्हटल्यास वावगे ठरू नये! [७]

चरित्र[संपादन]

सुशील कुमार शिंदे यांची पाच-सात चरित्रे प्रकाशित झाली आहेत, त्यांतली ही तीन :-

  • सुशीलकुमार : एक प्रवास (रविकिरण साने)
  • ’सुशीलकुमार शिंदे - एका संघर्षाची वाटचाल’ (चरित्रग्रंथ) मराठी अनुवादक : संतोष शेणई, प्रकाशक : अमेय प्रकाशन. (मूळ इंग्रजी पुस्तक-हू रोट माय डेस्टिनी, लेखक: डॉ.पी.आर.सुबास चंद्रन)
  • ’Sushilkumar Shinde: a child of destiny’ - लेखक एन.बी. घोडके

पुरस्कार[संपादन]

  • सुशीलकुमार शिंदे आणि पत्‍नीला - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंत-वेणू पुरस्कार (३-१०-२०१७)

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]


मागील:
विलासराव देशमुख
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
जानेवारी १६, इ.स. २००३नोव्हेंबर १, इ.स. २००४
पुढील:
विलासराव देशमुख