Jump to content

"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Girish2k (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या संकल्प यांच्�
(चर्चा | योगदान)
ओळ ४८: ओळ ४८:
=== नाटके ===
=== नाटके ===


* [[अशी बायको हवी]]
* [[उद्याचा संसार]]
* [[उद्याचा संसार]]
* [[एकच प्याला-विडंबन]]
* [[कवडीचुंबक]]
* [[कवडीचुंबक]]
* [[गुरुदक्षिणा]]
* [[गुरुदक्षिणा]]
ओळ ५७: ओळ ५९:
* [[पराचा कावळा]]
* [[पराचा कावळा]]
* [[पाणिग्रहण]]
* [[पाणिग्रहण]]
* [[प्रल्हाद]]
* [[प्रीतिसंगम]]
* [[बुवा तेथे बाया]]
* [[ब्रम्हचारी]]
* [[भ्रमाचा भोपळा]]
* [[भ्रमाचा भोपळा]]
* [[मी उभा आहे]]
* [[मी मंत्री झालो]]
* [[मोरूची मावशी]]
* [[मोरूची मावशी]]
* [[वीरवचन]]
* [[लग्नाची बेडी]]
* [[लग्नाची बेडी]]
* [[वंदे भारतम]]
* [[वीरवचन]]
* [[शिवसमर्थ]]
* [[सम्राट सिंह]]
* [[साष्टांग नमस्कार]]
* [[साष्टांग नमस्कार]]



२०:४२, २३ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

प्रल्हाद केशव अत्रे
जन्म नाव प्रल्हाद केशव अत्रे
टोपणनाव केशवकुमार
जन्म ऑगस्ट १३, इ.स. १८९८
सासवड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून १३, इ.स. १९६९
परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्‍हेचे पाणी (आत्मचरित्र)
अपत्ये शिरीष पै, मीना देशपांडे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ - जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

कारकीर्द

पत्रकारिता

इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

चित्रपट

इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

शिक्षण

मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

पुस्तके

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

नाटके

काव्य

कथासंग्रह

आत्मचरित्र

कादंबरी

इतर


बाह्य दुवे