सूर्यास्त
Jump to navigation
Jump to search
संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावळणे किंवा सूर्यास्त असे म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे-परिवलनामुळे सूर्यास्त होतो. गावोगावांची सूर्यास्ताची वेळ ज्युलियन कॅलेंडरच्या तारखेवर, आणि गावाच्या अक्षांश-रेखांशावर अवलंबून असते. कोणत्याही विशिष्ट गावातील या वर्षीच्या सू्र्यास्ताची वेळ.पुढील वर्षाच्या त्या तारखेला होणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळापेक्षा फारशी वेगळी नसते.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणांवरील सूर्यास्त जास्त चांगले दिसतात. उदा० समुद्रकिनाऱ्यावरील किंवा वाळवंटातील सूर्यास्त.