बुवा तेथे बाया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बुवा तेथे बाया हे प्र.के. अत्रे यांचे एक पुस्तक (नाटक) आहे.

खाेेटे बाबा-बुुुुवा या विषयावर प्र के अत्रेे यांनी निर्माण केलेली अजरामर कलाकृती.

अत्रे यांनी या नाटकात एखाद्याच्‍या देवभोळेपणाचा फायदा उठविणारे लोक कसे ठगतात आणि तेही किती चतुराईनेे याची विनाोदी पद्धतीने मांडणी केली आहे

पन्नास वर्षानंतरही हे लिखाण आजही अनेकांना जसेच्‍या तसे लागू पडते. त्‍याच पद्धतीने गंडवणारे अनेक बाबा बुवा आजही अस्तित्‍त्‍वात आहेत, देवभोळे लोक आणि अगदी तसेच आजही त्‍यांच्‍यावर अंधपणे विश्‍वास ठेवतात .

त्‍या काळी अश्या रितीचे लेखन करण्‍याला अतिशय धारिष्‍ट्यवान माणूस असणे आवश्‍यक होते, अत्रे हे लंडन येथे शिकून आल्‍याने त्‍यांना श्रद्धा व अंधश्रद्ध यांतील फरक लगेच कळत होता.

त्‍यांच्‍या स्‍वभावातील परखडपणा या नाटकात अतिशय प्राधान्‍याने जाणवतो. (नाटकातील मुख्य भूमिका करणारे कलावंत - विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, किशोरी अंबिये, जगन्नाथ लवंगारे