सदस्य चर्चा:Girish2k
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
[संपादन]
|
|
|
नमस्कार Girish2k, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार ०७:२७, ५ डिसेंबर २००९ (UTC)
समर्थ रामदास स्वामी
[संपादन]समर्थ रामदास स्वामी हा लेख कृपया बघावा.
वि. नरसीकर (चर्चा) १०:५४, ७ डिसेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
[संपादन]नमस्कार Girish2k
- आपण मराठी विकिपीडियात थोड्याच अवधीत मराठी विकिपीडियावर चांगले योगदान केलेत याबद्दल अभिनंदन. समर्थ संप्रदाय आणि वै़ज्ञानिक आणि मराठी विक्शनरी या बद्दल मला व्यक्तिगत पातळीवर विशेष आत्मियता आहे त्या संदर्भाने आपण टाकलेली माहितीत भर पाहून छान वाटले.माहितगार ०५:२८, ११ डिसेंबर २००९ (UTC)
- काही टिप्स
- नि:संदिग्धीकरण विषयक माहिती पहावी. शंकर श्रीकृष्ण देव (निसंदग्धीकरण) मध्ये काही बदल करावयाचे असतील तर उपयोग होईल.
- आपण #REDIRECT [[Article Name]] चा उपयोग बरोबर केला आहे. REDIRECT चे एवजी मराठीत #पुर्ननिर्देशन असे लिहिले तरी चालते.
- नानासाहेब धर्माधिकारी बद्दल बरेच संदर्भ गूगलवर शोध घेतलातरी आढळत आहेत असे दिसते. त्यातील सुयोग्य संदर्भाचे दाखले देऊ शकाल तर दूधात साखर.
- शक्य झाल्यास विश्वकोश संकल्पना पुन्हा एकदा नजरेखालून घालावी.
वेलकम
[संपादन]- नवीन सदस्यांना सर्व सूचना एकदम न देऊन गोंधळून न टाकता टप्प्या टप्प्याने टिपा आणि सहाय्य मिळावे असा उद्देश आहे. माहितगार ०६:५९, ११ डिसेंबर २००९ (UTC)
टिप शिर्षक लेखन संकेत
[संपादन]- सध्याच्या मराठी विकिपीडिया संकेतानुसार व्यक्तिंबद्दलच्या लेखांची नावे सहसा पदवी title इत्यादी न लिहिता जिथे उपलब्ध असतील तीथे संपूर्ण नाव जसे श्रीधर व्यंकटेश केतकर लिहावे. प्रचलीत अथवा समाजमान्यरूप वेगळे असल्यास त्या नावाचे पान बनवून ते पूर्ण नाव असलेल्या लेखाकडे #पुर्ननिर्देशन करावे.
- या संकेता नुसार शंकरराव देव हा लेख शंकर श्रीकृष्ण देव येथे स्थानांतरीत करणे अधीक उचित ठरेल लेख नावाचे स्थानांतर करताना पुर्ननिर्देशन आपोआप होते.
- विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत येथे अधीक माहिती उपलब्ध असेल. शंका शक्यतो विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत येथे मांडल्यास अधीक चांगले.
व्यक्तिबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे .उपनामे, उपाख्य, पदवी सह शक्यतो शीर्षक सुरू करू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते (alphabetical categorisation)] .प्रचलीत नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलीत नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमुद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मुळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.
जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. भीमराव रामजी आंबेडकर हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इ. चे पुनर्निर्देशन भीमराव रामजी आंबेडकरकडे करावे.
शक्यतो अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखनाकडे स्थानांतरीत करावीत ; आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे परंतु लोक मोठ्या प्रमाणावर अशुद्धलेखनाचे शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहीले तर ते पान मात्र तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःनिर्देशीत करावे.
माहितगार १३:०२, १७ डिसेंबर २००९ (UTC)
अभिनंदन
[संपादन]नमस्कार Girish2k,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- ~~~~
भक्तराज महाराज - दृष्टिकोन साचा
[संपादन]नमस्कार गिरीश,
मी भक्तराज महाराज लेखाच्या चर्चापानावर लिहिल्याप्रमाणे तेथे घातलेला साचा तुम्ही केलेल्या लिखाणाला कमी लेखण्यासाठी नसून त्याला अधिक वजन येण्यासाठी घातला आहे. लेखातील assertions घालवून टाकून तेथे पडताळण्याजोगी माहिती घातल्यास लेख जास्त चांगला होईल.
अभय नातू १७:२५, १७ डिसेंबर २००९ (UTC)
विकिपीडियावर चित्रे चढवण्याबद्दल
[संपादन]नमस्कार गिरीश,
आपण नुकतीच चढवलेली चित्र:Prabodhankar.jpg ही संचिका पाहिली. या चित्राच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर चालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला संचिकेच्या पानावर मांडावे लागते.
कृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा; जेणकरून ती संचिका ठेवावी की काढावी, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे, यांबद्दल ठरवता येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५६, १६ डिसेंबर २००९ (UTC)
- नमस्कार गिरीश,
- आपण नुकतीच काही चित्रांच्या स्रोतांसंबंधी माहिती त्या-त्या संचिकांमध्ये भरल्याचे पाहिले. त्यातील बहुतांश चित्रे आपण अन्य कुठल्यातरी संस्थळावरून मिळवल्याचे व तेथे कोणतीही प्रताधिकार नोटीस नसल्याचे आपले म्हणणेही वाचले. सहसा ही चित्रे ज्या संस्थळांवर होती, त्या संस्थळांवरील सर्व आशयावर (मजकूर, लेख, चित्रे, व्हिडिओ, गाणी, ऍनिमेशने) बहुतांश वेळा त्या-त्या लेखक / कलाकारांचा किंवा प्रकाशक या नात्याने संस्थळाचा प्रताधिकार असतो. काही वेळा कित्येक संस्थळांवरही मूळ लेखक/चित्रकार/प्रकाशचित्रकार यांच्याकडून कसलीही परवानगी न घेता ढापलेला व प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन करून संस्थळावर चढवलेला आशय असतो. त्यामुळे प्रताधिकार नोटीस किंवा स्पष्टपणे प्रताधिकारविषयक जाहीर प्रकटन नसलेल्या संस्थळांवर / ब्लॉगांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडील चित्रे आपल्या विकिपीडियावर चढवू नयेत. जर आपल्याला मूळ लेखक / चित्रकार / प्रकाशचित्रकार यांच्याकडून थेट परवानगी मिळाली असेल (लेखी किंवा ईमेलावर) किंवा जर आपण स्वतःच काढलेले चित्र/फोटो असेल किंवा जर चित्राचे/प्रकाशचित्राचे कायदेशीररित्या प्रताधिकार बाळगणार्या प्रकाशकांकडून / संस्थळांकडून आपल्याला लेखी/ ईमेलावर परवानगी मिळाली असेल, तर अशी चित्रे प्रताधिकारमुक्त म्हणून विकिपीडियावर वापरावीत. यांहून इतर चित्रे ही (डीफॉल्ट) प्रताधिकारित समजावीत.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:०७, १८ डिसेंबर २००९ (UTC)
टपाल तिकिटांवरील प्रताधिकारांबद्दल
[संपादन]नमस्कार गिरीश!
आपण काही टपालतिकिटांची चित्रे चढवल्याचे पाहिले. परंतु विकिमीडिया कॉमन्स संस्थळावरील (विकिमीडिया = विकिपीडियाचे पालक संकेतस्थळ) या वर्णनानुसार भारतीय टपालतिकिटांची चित्रे खालील परिस्थितीमध्ये प्रताधिकारमुक्त समजली जातात :
- ६० वर्षांहून जुनी भारतीय टपालतिकिटे (म्हणजे इ.स. २००९ सालात इ.स. १९४९ सालापूर्वीची तिकिटे) प्रताधिकारमुक्त मानली जातात.
- टपालतिकिटांविषयी एखादे प्रकाशन (पुस्तक इ.) किंवा लेख असल्यास, टपालतिकिटांचे कृष्णधवल चित्र चालू शकते. (याचा अर्थ : अन्य विषयांसाठी, उद., विकिपीडियावरील व्यक्तिविषयक लेख सजवायला तिकिटांची चित्रे वापरू नयेत. टपालतिकिटांविषयी विकिपीडियावरील लेखात तिकिटांची कृष्णधवल चित्रेच चालू शकतील; रंगीत नाहीत.) तिकितांची रंगीत चित्रे वापरण्यासाठी टपाल खात्याच्या जनरल डायरेक्टरांची (लेखी) अनुमती मिळवावी लागेल.
त्यामुळे सहसा अशी चित्रे व्यक्तिपर लेखांसाठी वापरू नयेत, असा निष्कर्ष काढता येतो. तूर्तास मी तुम्ही आज चढवलेली चित्रे 'प्रताधिकारित संचिका' वर्गात वर्ग केली आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४५, १८ डिसेंबर २००९ (UTC)
प्रताधिकारांबद्दल अधिक
[संपादन]- नमस्कार,
- जिथे कॉपीराईटचा आणि लेखकाचे नाव मेंशन नसते त्या स्थितीत प्रकाशन तारखे पासून ६०वर्षे प्रताधिकार लागू रहातो. जर कॉपीराईट होल्डर (बहुतेक बाबतीत लेखक किंवा छायाचित्रकार) च्या मृत्यूपासून ६०वर्षे कॉपीराईट लागू रहातो.
- गेल्या दशकभरात भारतात कॉपीराईट कायद्यात खूप कदक असे बदल घेडवले गेले.सामान्य लोकांना त्या बद्दल खूप कमी एज्यूकेट केले गेले आहे त्यामुळे कॉपीराईट्सचे सर्रास उल्लंघन होते.
- विकिपीडियावर आपल्याला याबाबत अधिक सजगतेची आवश्यकता याकरिता आहे कि येथील माहिती इतरत्र प्रकाशकांना प्रकाशनाकरिता मुक्त्स्वरूपात उपलब्ध करून देताना त्यात अनवधानाने प्रताधिकारयूक्त माहिती शक्यतोवर रहाणार नाही याची कालजी घेतलेली बरी.
- जिथे कॉपीराईट फ्री असल्याचे नमुदकेलेले नाही त्या बाबतीत शक्यतोवर छायाचित्रांचे आणि बाकी माहितीचे बाह्य दुवे द्यावेत हे अधिक श्रेयस्कर ठरते.
- या संदर्भाने अधीक माहितीकरिता विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प अभ्यासावा
- माहितगार ०५:४४, १८ डिसेंबर २००९ (UTC)
- ता.क. विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रकल्पही सवडीने पहावा.माहितगार १०:०६, १८ डिसेंबर २००९ (UTC)
copyright?
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विषयः प्रताधिकार संदर्भात
आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.
मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.
साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.
आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.
आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
आपले विनीत,
ता.क.:
सिडॅकच्या संकेतस्थळावरूनचे कॉपी पेस्टींग त्वरीत थांबवावे
[संपादन]नमस्कार गिरिश, सिडॅकच्या संकेतस्थळावरून आपण महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मराठी विश्वकोशातून करत असलेले जसेच्या तसे कॉपी पेस्टींग हे भारतीय कॉपीराइट कायद्याम्चे उल्लंघन ठरते त्यामुळे असे कॉपी पेस्टींग त्वरीत थांबवावे हि नम्र विनंती.
विकिपीडिया:चावडी#कॉपीराईट आणि प्रयोजन विषयक आव्हाने येथे हा विषय चर्चेस घेतला आहे तेथे आपण आपल्या शंका मांडू शकता.
आपण ज्या वेगाने कॉपी पेस्टींग करत आहात त्यामुळे प्रचालंकांचे आणि इतर सदस्यांचे नंतरचे काम बिकट व वेळखाऊ ठरण्याची शक्यता असल्यामुळे आपण अशा कॉपीराईट भंग ठरणार्या संपादनांना किमान तात्पूरता विराम विनाविलंब देणे जरूरी आहे.
आपण या विनंतीची दखल न घेतल्यास हि सूचना आपणाकडून वाचलि जावी या साठी काही मर्यादीत कालावधीकरता आपले खाते संपादनांकरीता प्रतिबंधीत सुद्धा केले जाऊ शकते.असे करावे लागल्यास आपण मनात गैरसमज अथवा आकस बाळगू नये हि नम्र विनंती माहितगार ०६:१७, १ नोव्हेंबर २०११ (UTC)
माफ करा
[संपादन]मी आपली माफी मागतो. आपले लेख अनवधानाने माझेकडून वगळल्या गेलेत.त्ती माझी चुक होती हे प्रांजळपणे कबुल करतो.ते आता माहितगारांनी पुनर्स्थापित केले आहेतच.आपणास मानसिक त्रास झाला असल्यास त्याबद्दल मी खरोखरीच क्षमाप्रार्थी व दिलगीर आहे. आपण मन मोठे ठेउन मला क्षमा कराल ही अपेक्षा.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:३३, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
देवनागरी आकडे
[संपादन]नमस्कार गिरीश.
रॉन पॉल या लेखात काही सुधारणा केल्या आहेत; त्या एकवार पाहाव्यात, अशी विनंती.
खेरीज एक सूचना : मराठी विकिपीडियावर माहिती भरताना मजकुरात देवनागरी मराठी लिपी व देवनागरी मराठी अंक वापरावेत. रॉन पॉल या लेखात तुम्ही केलेल्या आधीच्या संपादनात रोमन आकडे होते, ते मला दुरुस्त करावे लागले.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३८, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
व्यक्तिलेख
[संपादन]नमस्कार,
तुम्ही व्यक्तींबद्दलचे, विशेषतः पाश्चात्य संगीतकारांबद्दलचे लेख लिहीत असलेले पाहिले. ही भर घातल्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे धन्यवाद.
सहसा व्यक्तीबद्दलचा लेख लिहिताना खालील संकेत आपण पाळतो.
'''प्रथमनाव मधलेनाव आडनाव''' (ऑक्टोबर ४८, इ.स. ३०००:जन्मस्थान - फेब्रुवारी ३५, इ.स. ३१००:मृत्युस्थान) हा/ही [येथे एका ओळीत व्यक्तीचे जीवनकार्य] होता/होती. याशिवाय आडनाव [इतर कार्ये] सुद्धा होता/होती.
{{विस्तार}}
[[वर्ग:योग्य ते वर्ग येथे]]
[[en:इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचे नाव]]
यासाठी एक उदाहरण म्हणून लॉर्ड एडवर्ड आयर्विन हा लेख पहावा व आपण तयार केलेल्या लेखांमध्ये योग्य त्या सुधारणा कराव्या ही विनंती.
अभय नातू १८:०७, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
ता.क. याचबरोबर आपण लिहिताना पूर्ण वाक्ये लिहावीत. उदा - बौद्ध तत्व ज्ञानातील माध्यमिक संप्रदायाचा प्रमुख नागार्जुन याने मांडलेला मध्यवर्ती सिद्धांत . च्या ऐवजी शून्यवाद हा बौद्ध तत्व ज्ञानातील माध्यमिक संप्रदायाचा प्रमुख नागार्जुन याने मांडलेला मध्यवर्ती सिद्धांत आहे.
Machine translation
[संपादन]नमस्कार, आपण चावडीवरील मागील चर्चेत Machine translation चा उल्लेख केलात, खरेतर मशिन ट्रांसलेशनचा कुणी समर्थक भेटला पाहून अत्यंत आनंद झाला. मशिन ट्रान्सलेशचे मराठी विकिपीडियावरील टप्पे पुढे जाण्याकरीता काही सजेशन मांडतो आहे त्यातील जी आवडतील त्यावर सवडीनुसार काही काम पुढे नेता आल्यास पुढाकार घ्यावा ही नम्र विनंती
१)मराठी व्याकरण किंवा भाषाशास्त्र या विषयांवर अधिक लेखन करणे
२) मराठी विकिपीडियावर भाषांतरीत झालेल्या लेखांचा व्याकरनीय दृष्तीकोणातून अभ्यास करून नेहमी होणार्या व्याकरण विषयक चूकांचा अभ्यास आणि त्या दुरूस्त करण्याकरता बॉट तयार करणे आणि वापरणे
३)इंग्रजी विकिपीडियातील एखादा विषय गट निवडून त्यात नेहमी येणारी वाक्ये घेऊन त्याचे भाषांतर सुकर करणारे बॉट बनवणे
४)गूगल ट्रांसलेटर टूलकीट करता या फेसबूकपानावरील मंडलींना प्रोत्शाहन देऊन इंग्रजी विकिपीडियावरून लेख भाषांतरीत करणारी टीम बनवणे व गूगल ट्रान्सलेटरकीट च्या सहाय्याने भाषांतरे करवून घेणे
माहितगार १८:१९, ३ नोव्हेंबर २०११ (UTC)
थोडा विचार करावा, अशी विनंती
[संपादन]नमस्कार गिरीश, आपण बहुधा यांत्रिक अनुवादाने नवीन लेख बनवत आहात, असे त्या लेखांतील मजकुराच्या काहीशा कृत्रिक/अजैविक ढंगाच्या मराठीवरून वाटते. अर्थात ही माझी गैरसमजूतही असू शकते. आपण या संबंधाने कृपया खुलासा करू शकाल काय ?
जर माझी अटकळ खरी असेल, तर आपल्याला एक विनंती आहे : सध्या यांत्रिक अनुवादाने बनवलेले लेख/मजकूर थेट मुख्य नामविश्वात येत आहे. त्यामुळे मुख्य नामविश्वातील लेखांची भाषिक गुणवत्ता एकसंधशी चांगली राहत नाहीय. तसेच, हे लेख/मजकूर मुख्य नामविश्वात असल्याने त्यावर शुद्धलेखन व व्याकरणाचे संस्कार लवकरात लवकर करण्याची जबाबदारी वाढून बसते. म्हणून यांत्रिक अनुवादाने बनवलेला मजकूर धूळपाटी पानांवर (जी आपण आपल्या सदस्यपानांतर्गत उपपाने म्हणून बनवू शकता) लिहावा व अन्य विकिपीडियन सदस्यांकडून मराठी व्याकरण व शुद्धलेखनासाठी तपासून घ्यावा. हा मजकूर तपासून झाल्यावर, मग तो मुख्य नामविश्वातील लेखांत हलवावा. असे केल्यामुळे मुख्य नामविश्वातील लेख व त्यांतील मजकू भाषिक गुणवत्ता व वाचनीयतेच्या दृष्टीने चांगला व एकसंध राहील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५८, १४ नोव्हेंबर २०११ (UTC)
मराठी व्याकरण व शुद्धलेखन
[संपादन]नमस्कार गिरीश ! कृपया संपादनातील आशय मराठी शुद्धलेखन व व्याकरणाच्या अपेक्षित दर्जानुसार राहील, हे तपासून पाहात जावे. यासाठी काटेकोर दर्जात्मक निकष नसले, तरीही मराठी भाषा संचालनालयाच्या मराठी शुद्धलेखननियमावलीप्रमाणे किमान काही निकष पाळले जातील, असे पाहावे.
काही मदत लागल्यास, जरूर कळवावी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५१, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
- गिरीश,
- एव्हाना आपणास कळलेच असेल कि संकल्प द्रविड हा तुच्छ भाषेत सभासदांना दमदाट्या करणारा गुंड प्रवृतीचा मराठी विकिपीडिया वरील विवादित सदस्य आहे. त्यास लोकास फुकट शहाणपण शिकवण्याची, मोठ मोठी शब्दे वापरून आपण खूप ज्ञानी आहोत असे दाखवण्याची सवय आहे. आपण त्याच्या लिखाणाने विचलित नहोता आपणास जसे जमेल तसे योगदान द्यावे काम करत असतांना किमान दर्जा पाळण्याचा प्रयत्न असावा अट्टहास नाही. येथील शुद्धलेखन चिकित्सक J ह्यांना संदेश दिल्यास ते आपले लिखाण तपासून तसेच दिरुस्त करून देतात.
- ता. क. - काही काळाने आपणास द्रविड धमक्या वजा संदेश सुद्धा देण्याची शक्यता नाकारता येत नाही
- मी राजाराम बोलतोय
लिंकन मेमोरियल चे संपादन - धूळपाटी
[संपादन]लिंकन मेमोरियल हे स्मारक संयुक्त राज्य अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपति व अमेरिकी नागरी (यादवी) युद्धाच्या दरम्यान देशाचे नेतृत्व केलेल्या अब्राहम लिंकन, यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ बांधण्यात आले आहे. हे स्मारक वॉशिंग्टन, डीसी मधील नॅशनल मॉल येथे असून ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. याचे बांधकाम १९१४ साली सुरु होऊन १९२२ साली ते देशाला अर्पण करण्यात आले. अब्राहम लिंकन यांचा डॅनियल चेस्टर फ्रेंच या शिल्पकाराने बनवलेला १९ फूट उंचीचा भव्य पुतळा हि येथे आहे.
[[चित्र:Lincoln_memorial.jpg|thumb|अब्राहम लिंकन (१९२०)
बाह्य दुवे
[संपादन]/धुळपाटी/प्रतिबंधित शहर
[संपादन]प्रतिबंधित शहर (इंग्रजी : Forbidden City) हा एक चिनी राजवाडा असून तो बीजिंग, चीन मधे स्थित आहे. सध्या तो पॅलेस संग्रहालय म्हणून ओळखला जातो. एक विशाल ऐतिहासिक राज-महाल व एक कला संग्रहालय असलेले हे स्थळ एक यूनेस्को विश्व-वारसा स्थळ म्हणून घोषीत केले आहे. ऐतिहासिक व वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्वाचे आहे.
भाषाभगिनी हिंदी
[संपादन]नमस्कार गिरीश,
भांडाभांडीच्या चावडीवर (वादनिवारण चावडी) तुम्ही लिहिलेत -- हिंदी ही आपली राष्ट्रभाषा व मराठीची भाषा-भगिनी असतांना. मला यावर तुम्हाला विचारायचे आहे की याबद्दल तुम्हाला माहिती कोठे मिळाली? हा फक्त माझ्या माहिती/ज्ञानाकरता विचारलेला प्रश्न आहे. भांडायचा किंवा वादावादी करण्याचा मुळीच उद्देश नाही. मूळ भांडणातही मला (शक्यतो) पडायचे नाही.
माझ्या माहितीनुसार मराठी मुख्यत्वे संस्कृतोद्भव भाषा आहे आणि त्यावर काही प्रमाणांत द्रविडी भाषांचाही प्रभाव (अगदी थोडा) आहे. तर हिंदी ही पूर्णपणे synthetic भाषा असून ती फारसी, पश्तो या मध्यपूर्वेतील तसेच उर्दू, प्राकृत, अर्धमागधी या एतद्देशीय भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. तरी मराठी-हिंदी भगिनी कशा ठरतील?
असे, पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की वरील प्रश्न केवळ माझ्या माहितीकरता आहे, यात कोणताही तिरकस हेतू नाही.
क.लो.अ.
अभय नातू २१:३६, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)
- तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. त्याने समाधान झाले नाही पण अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन.
- आणखीन एक म्हणजे, आपल्या साने गुरुजींच्या विशाल दृष्टीच्या 'आंतर-भारती' च्या कल्पनेप्रमाणे भारतात जन्मलेल्या सर्वच भाषा या आपल्या सर्वांच्याच भाषा भगिनी म्हणायला हरकत काय आहे ?
- साने गुरुजी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते यात वाद नाही, पण त्यांच्याप्रमाणेच इतर अनेक (आदरणीय) व्यक्तींची याबद्दलची मते भिन्न असू शकतात व त्यातील कोणते मत स्वीकारायचे हा वैयक्तिक प्रश्न ठरतो. भावनेपोटी किंवा प्रेमाखातर सत्य नजरेआड करुन चालत नाही. अर्थात, याचा अर्थ हिंदी-मराठी भाषाभगिनी नाहीत हे सिद्ध होत नाही तर हे मत साने गुरुजींचे होते, कोणा भाषाशास्त्रज्ञाचे नव्हे इतकेच. सत्य हे facts वर आधारित असावे हा विकिपीडियाचा (व माझा स्वतःचाही) दृष्टिकोन आहे.
- तुम्ही मूळ वादाकडे अंगुलीनिर्देश केलात. त्यात (सध्या तरी) मी न पडण्यामागे दोन-तीन कारणे आहेत.
- १. गेल्या काही आठवड्यांत मी काहीही लिहिले (धोरणात्मक) तर त्यात काही सदस्यांना राजकारण, गुंडागर्दी, इ. ridiculous गोष्टी दिसून येत आहेत. तरी मी कमीत कमी बोललेलेच बरे.
- २. आपल्याकडे आता अनेक सक्रीय प्रचालक आहेत. त्यांचे ही मत मला अजमावून पहायचे आहे.
- ३. सध्या पोटापाण्याच्या उद्योगात अतिव्यग्र असल्याने वादावादीत पडून आधीच कमी पडणारा विकिवेळ त्यात खर्च करू इच्छित नाही. तसेच लोकांच्या मुद्द्यांना वेळीच उत्तर देता येईल अशी खात्री नाही.
- अर्थात, वाद हाताबाहेर जायला लागला तर उडी मारणे कर्तव्यच आहे पण आशा आहे आपले सुज्ञ सदस्य ही वेळ येऊ देणार नाहीत.
- अभय नातू ०६:११, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)
namskar
[संपादन]तुमचा ईमेल पत्ता हवा आहे माहितगार ०५:३१, २१ नोव्हेंबर २०११ (UTC)
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, Girish2k
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी
[संपादन]नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, १ जानेवारी २०१२ (UTC)
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
[संपादन]नमस्कार Girish2k,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
- ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले