प्रीतिसंगम
Appearance
हा लेख प्रीतिसंगम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, प्रीतिसंगम (निःसंदिग्धीकरण).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कऱ्हाडच्या उत्तर सीमेवर परस्परांना १८० अंशात येऊन समोरासमोर भेटणाऱ्या कृष्णा-कोयनांचा प्रीतीसंगम जगात एकमेव असल्याचे सांगतात. कृष्णा नदीवर खोडशी येथे इ.स.१८६०-६६ मध्ये झालेल्या बंधाऱ्यामुळे कृष्णेचे पात्र कऱ्हाडपासून उत्तरेकडे सरकले.त्यामुळे नदीपलीकडे असलेले वीर मारुतीचे मंदिर अलीकडे आले. नदीकाठी म्हणून बांधलेले घाट नावापुरतेच राहिले तरी कराडचा प्रसिद्ध कृष्णाबाई उत्सवात आधुनिक प्रेक्षागृहासारखे उपयोगी पडतात. पुढे कोयनानगर व धोम येथे झालेल्या धरणांमुळे संगमाचा डोह सोडल्यास कृष्णेचे पात्र संथ व क्षीण झाले आहे.
स्थळे
[संपादन]- यशवंतरावांच्या निधनानंतर प्रीतिसंगमावर त्यांच्या समाधी नजीक 'प्रीतिसंगम उद्यान'
- कृष्णामाईचे मंदिर आहे.
महत्त्वपूर्ण घटना
[संपादन]- ८४वे अखिलभारतीय नाट्य संमेलन
- गणेशमूर्ती विसर्जन