"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ७६: | ओळ ७६: | ||
* पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.{{संदर्भ हवा}} |
* पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.{{संदर्भ हवा}} |
||
* पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर [[महेश मांजरेकर]] 'भाई' - व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट काढीत आहेत. |
* पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर [[महेश मांजरेकर]] 'भाई' - व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट काढीत आहेत. |
||
* पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत. शिवाय त्यांच्या साहित्यावर आधारित ‘नमुने’ नावाची हिंदी मालिका येत असून अभिनेते [[संजय मोने]] मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘सोनी सब’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ ही मालिका आधारित आहे. यामध्ये सुबोध भावे आणि इतर काही मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज दिसणार आहे. |
|||
==पुलंची काही टोपणनावे== |
==पुलंची काही टोपणनावे== |
२२:२७, २६ जून २०१८ ची आवृत्ती
पु.ल. देशपांडे | |
---|---|
बडोदरा, गुजरात | |
जन्म नाव | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे |
टोपणनाव | पु.ल., भाई |
जन्म |
नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ मुंबई |
मृत्यू |
जून १२, इ.स. २००० पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
नाटककार, साहित्यकार, संगीतकार विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक |
वडील | लक्ष्मण देशपांडे |
आई | लक्ष्मीबाई देशपांडे |
पत्नी | सुनीता देशपांडे |
अपत्ये | मानसपुत्र दिनेश ठाकूर |
पुरस्कार |
पद्मश्री सन्मान महाराष्ट्र भूषण साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष |
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.[ संदर्भ हवा ]
गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले.[ संदर्भ हवा ]
जीवन
देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी भागात झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पारले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.[ संदर्भ हवा ]
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.[ संदर्भ हवा ]
१२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले.[ संदर्भ हवा ]
बालपण आणि शिक्षण
देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.[ संदर्भ हवा ]
देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसर्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.[ संदर्भ हवा ]
देशपांडे यांना खूप घरात वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.[ संदर्भ हवा ]
वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.[ संदर्भ हवा ]
कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.[ संदर्भ हवा ]
लेखक-अभिनेते-नाटककार म्हणून कारकिर्दीची सुरुवात
१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या पैजार या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भट्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. २०१४ मध्ये[ संदर्भ हवा ] प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5609444904589598898&PreviewType=books
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या ललितकलाकुंज व नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]
१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.[ संदर्भ हवा ]
चित्रपटसृष्टीत पदार्पण
१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटां त्यांनी अष्टपैलू कामगिरीकेली. या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते.[ संदर्भ हवा ]
१९४७सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर या चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली.[ संदर्भ हवा ]
नभोवाणी आणि दूरचित्रवाणी
१९३७पासून पुलंचा नभोवाणी संबंध आलाच होता. आता१९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.[ संदर्भ हवा ]
१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.[ संदर्भ हवा ]
उल्लेखनीय [ संदर्भ हवा ]
- दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.[ संदर्भ हवा ]
- साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.[ संदर्भ हवा ]
- मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPAच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.[ संदर्भ हवा ]
- पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.[ संदर्भ हवा ]
- पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर 'भाई' - व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट काढीत आहेत.
- पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत. शिवाय त्यांच्या साहित्यावर आधारित ‘नमुने’ नावाची हिंदी मालिका येत असून अभिनेते संजय मोने मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘सोनी सब’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ ही मालिका आधारित आहे. यामध्ये सुबोध भावे आणि इतर काही मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज दिसणार आहे.
पुलंची काही टोपणनावे
- धोंडो भिकाजी कडमडे जोशी
- मंगेश साखरदांडे
कार्य [ संदर्भ हवा ]
चित्रपट [ संदर्भ हवा ]
वर्ष-इसवी सन | चित्रपटाचे नाव | भाषा | कामगिरी |
---|---|---|---|
१९४७ | कुबेर | मराठी | अभिनय |
१९४८ | भाग्यरेषा | मराठी | अभिनय |
१९४८ | वंदे मातरम् | मराठी | अभिनय |
१९४९ | जागा भाड्याने देणे आहे | मराठी | पटकथा, संवाद |
१९४९ | मानाचे पान | मराठी | कथा-पटकथा-संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); संगीत |
१९४९ | मोठी माणसे | मराठी | संगीत |
१९५० | गोकुळचा राजा | मराठी | कथा, पटकथा, संवाद |
१९५० | जरा जपून | मराठी | पटकथा, संवाद |
१९५० | जोहार मायबाप | मराठी | अभिनय |
१९५० | नवरा बायको | मराठी | कथा, पटकथा, संवाद, संगीत |
१९५० | पुढचं पाऊल | मराठी | पटकथा, संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); अभिनय |
१९५० | वर पाहिजे | मराठी | कथा (अच्युत रानडे यांच्यासह); संवाद |
१९५० | देव पावला | मराठी | संगीत |
१९५२ | दूधभात | मराठी | कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत |
१९५२ | घरधनी | मराठी | पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत |
१९५२ | संदेश | हिंदी | कथा, पटकथा, संवाद (संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली) |
१९५३ | देवबाप्पा | मराठी | पटकथा, संवाद, संगीत, गीतरचना(ग.दि.माडगूळकरांसह) |
१९५३ | नवे बिऱ्हाड | मराठी | संवाद, संगीत |
१९५३ | गुळाचा गणपती | मराठी | कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन |
१९५३ | महात्मा | मराठी, हिंदी, इंग्रजी | कथा |
१९५३ | अंमलदार | मराठी | पटकथा, संवाद, संगीत, अभिनय |
१९५३ | माईसाहेब | मराठी | पटकथा, संवाद |
१९६० | फूल और कलियाँ | हिंदी | कथा, पटकथा |
१९६३ | आज और कल | हिंदी | कथा, पटकथा |
लेख/कथा/कादंबरी [ संदर्भ हवा ]
विनोद
- अघळ पघळ (पुस्तक) (१९९८)
- असा मी असामी (१९६४)
- उरलं सुरलं (१९९९)
- कोट्याधीश पु.ल. (१९९६)
- खिल्ली (१९८२)
- खोगीरभरती (१९४९)
- गोळाबेरीज (१९६०)
- नस्ती उठाठेव (१९५२)
- पुरचुंडी (१९९९)
- बटाट्याची चाळ (१९५८)
- मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास (१९९४)
- हसवणूक (१९६८)
विशेष पुस्तके
- आपुलकी
- अघळ पघळ
- अपूर्वाई
- असा मी असामी
- बटाट्याची चाळ
- भाग्यवान
- भावगंध
- चार शब्द
- दाद
- द्विदल
- एक शून्य मी
- एका कोळीयाने
- गणगोत
- गाठोडं
- गोळा बेरीज
- गुण गाईन आवडी
- हसवणूक
- जावे त्याच्या देशा
- खिल्ली
- मैत्र
प्रवासवर्णन
- अपूर्वाई (१९६०)
- पूर्वरंग (१९६३)
- जावे त्यांच्या देशा (१९७४)
- वंगचित्रे (१९७४)
व्यक्तिचित्रे
- गणगोत (१९६६)
- गुण गाईन आवडी (१९७५)
- व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६)
- मैत्र (१९९९)
- आपुलकी (१९९९)
- स्वागत (१९९९)[ संदर्भ हवा ]
कादंबरी (अनुवाद)
- काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली)
- एका कोळियाने (१९६५) (मूळ कथा: The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे)
- [[कान्होजी आंग्रे|कान्होजी आंग्रे[ संदर्भ हवा ]]]
चरित्र
गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)[ संदर्भ हवा ]
संकीर्ण
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २
[[रवींद्रनाथ : तीन व्याख्याने|रवींद्रनाथ : तीन व्याख्याने[ संदर्भ हवा ]]]
रंगमंच
एकपात्री प्रयोग
- बटाट्याची चाळ (१९६१-- )[ संदर्भ हवा ]
नाटक
- तुका म्हणे आता (१९४८)
- अंमलदार (नाटक) (१९५२) (मूळ लेखक - निकोलाय गोगोल)
- भाग्यवान (१९५३)
- तुझे आहे तुजपाशी (१९५७)
- सुंदर मी होणार (१९५८)
- पहिला राजा/आधे अधुरे (१९७६) (मूळ लेखक: जगदीशचंद्र माथुर)
- तीन पैशाचा तमाशा (१९७८) (मूळ लेखक - बेर्टोल्ट ब्रेश्ट्)
- राजा ओयदिपौस (१९७९) (मूळ लेखक - सोफोक्लीझ)
- ती फुलराणी (१९७४) (मूळ लेखक - जॉर्ज बर्नार्ड शॉ) (मूळ नाटक - पिग्मॅलियन)
- एक झुंज वार्याशी (१९९४)
- वटवट (१९९९)[ संदर्भ हवा ]
एकांकिका-संग्रह
- मोठे मासे आणि छोटे मासे (१९५७)
- विठ्ठल तो आला आला (१९६१)
- आम्ही लटिके ना बोलू (१९७५)[ संदर्भ हवा ]
लोकनाट्य
- पुढारी पाहिजे (१९५१)
- [[वार्यावरची वरात|वार्यावरची वरात[ संदर्भ हवा ]]]
काही विनोदी कथा
- एका रविवारची कहाणी
- बिगरी ते मॅट्रिक
- मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?
- म्हैस. या कथेवर मराठी्त एक चित्रपट बनत आहे. (२-४-२०१३ची बातमी)
- मी आणि माझा शत्रुपक्ष
- पाळीव प्राणी
- काही नवे ग्रहयोग
- माझे पौष्टिक जीवन
- [[उरलासुरला (कथा)|उरलासुरला[ संदर्भ हवा ]]]
व्यक्तिचित्रे
- नारायण
- अंतू बरवा
- हरी तात्या
- पानवाला
- पेस्तन काका
- रावसाहेब
- सखाराम गटणे
- [[नामू परीट (कथा)|नामू परीट[ संदर्भ हवा ]]]
पु.ल. आणि त्यांच्या लिखाणाबद्दल लिहिली गेलेली पुस्तके
- पु.ल. : एक साठवण (संपादक जयवंत दळवी)
- पु. ल. देशपांडे यांचे निवडक विनोद (तुषार बोडखे)
- पु. ल. नावाचे गारुड (लेखक मुकुंद टांकसाळे)
- विस्मरणापलीकडील पु.ल. (गंगाधर महांबरे)[ संदर्भ हवा ]
- विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. पु.ल.देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
बाह्य दुवे
- पु. ल. देशपांडे फेसबुक पेज
- पु. ल. देशपांडे संकेतस्थळ
- पु.ल.प्रेम एक सुंदर ब्लॉग
- पु.ल.देशपांडे - मराठीचे मानदंड - मराठीमाती
- पु ल साठवण संकेतस्थळ
पहा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार
[ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ][ संदर्भ हवा ]
- Pages with empty citations
- मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)
- इ.स. १९१९ मधील जन्म
- इ.स. २००० मधील मृत्यू
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
- पद्मश्री पुरस्कारविजेते
- पु.ल. देशपांडे
- मराठी गायक
- मराठी गीतकार
- मराठी चित्रपटअभिनेते
- मराठी पटकथाकार
- मराठी नाटककार
- मराठी नाट्यअभिनेते
- मराठी लेखक
- मराठी संगीतकार
- मराठी संवादलेखक
- महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्काराने सन्मानित
- महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
- संवादिनी वादक
- साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
- संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
- पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
- पद्मभूषण पुरस्कारविजेते
- महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते