Jump to content

गणगोत (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गणगोत या पानावरून पुनर्निर्देशित)
गणगोत
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार व्यक्तिचित्रे
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
(प्रथम दोन आवृत्या रा. ज. देशमुख आणि कंपनी)
प्रथमावृत्ती १९८० (तिसरी आवृत्ती)
चालू आवृत्ती १२

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्ड्‌सवर्थच्या 'यारो री व्हिजिटेड' सारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या वेव्हलेंथ्स पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणाचा भार अलगत खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे 'गणगोत' फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे 'इथे सखेनी सोबती कुणी इथे कुणी तिथे!
-प्रस्तावनेतून

गणगोत पुस्तकांत वर्णिलेल्या व्यक्तिरेखा (कंसात पूर्वप्रसिद्धीचे वर्ष)

[संपादन]