Jump to content

व्यक्ती आणि वल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्यक्ती आणि वल्ली

लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार काल्पनिक व्यक्तिचित्रे
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९६६
चालू आवृत्ती २७

व्यक्ती आणि वल्ली (१९६६) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा कथासंग्रह आहे. मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध करण्यात आला होता. हे पुस्तक मराठीतल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रसिद्ध पुस्तकांमध्ये गणले जाते. बऱ्याच खाजगी संकेतस्थळांकडून याचा समावेश मराठीतल्या पहिल्या दहा पुस्तकांमध्ये केला गेला आहे.[१]

या पुस्तकावर आधारित नमुने नावाची दूरदर्शन मालिका सोनी सब या वाहिनीने तयार केली. [२][३]


पार्श्वभूमी:

इ.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु.लं.नी 'अण्णा वडगावकर' नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून इ.स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आवृत्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.

व्यक्तिरेखा

[संपादन]
 • अण्णा वडगावकर
 • अंतू बर्वा
 • गजा खोत
 • चितळे मास्तर
 • ते चौकोनी कुटंब
 • दोन वस्ताद
 • नंदा प्रधान
 • नाथा कामत
 • नामू परीट
 • नारायण
 • परोपकारी गंपू
 • बबडू
 • बापू काणे
 • बोलट
 • भैय्या नागपूरकर
 • रावसाहेब
 • लखू रिसबूड
 • सखाराम गटणे
 • हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका
 • हरीतात्या

संदर्भ

[संपादन]
 1. ^ "11 Best Marathi Books Of All Time - Must Reads | Cart91". www.cart91.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.
 2. ^ "नमुने". IMDb.
 3. ^ IWMBuzz (2018-07-13). "Sony SAB to bring legendary writer P. L. Deshpande alive on-screen in its upcoming show 'Namune'". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी पाहिले.