Jump to content

"त्र्यं.वि. सरदेशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''त्र्यंबक विनायक सरदेशमुख''' (१९२२-२००५): कादंबरीकार, कवी, समीक्षक.
'''त्र्यंबक विनायक सरदेशमुख''' (जन्म : अक्कलकोट, (सोलापूर जिल्हा, २२ नोव्हेंबर, १९२२; मृत्यू : पुणे, १२ डिसेंबर, २००५) हे एक मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि कवी होते.

==शिक्षण==
त्यांचे प्राथमिक शिक्षण [[अक्कलकोट]] येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण [[सोलापूर]] व नंतर [[पुणे]] येथे झाले.

==ललित लेखन==
त्र्यं.वि. सरदेशमुखांनी सुरुवातीला ज्योत्स्ना, वाङ्मयशोभा, धर्नुधारी इत्यादी मासिकातून लेखन केले. त्यानंतर ससेमिरा ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आपले काव्यलेखन त्यांनी वैशाख या टोपणनावाने केले. उत्तररात्र हा त्यांचा कवितासंग्रह १९५५ साली प्रसिद्ध झाला.

==समीक्षा लेखन==
सरदेशमुखांचे समीक्षात्मक ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. साहित्याची निर्मिती, आकलन, स्वरूप आणि आस्वाद या संदर्भात स्वतःचे चिंतन त्यांनी या ग्रंथांतील लेखातून मांडले आहेत.

मानवी जीवनात असलेले शोकात्मता हे सरदेशमुखांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहे. बालकवी, केशवसुत, गोविदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितांचा वेध त्यांनी आपल्या अंधारयात्रा या पुस्तकात घेतला आहे. तसेच [[गडकरी]], [[ग्रेस]], [[नारायण सुर्वे]], [[शरच्चंंद्र मुक्तिबोध]], [[कुसुमाग्रज]] यांच्या काव्याबद्दल मूळगामी चर्चा सरदेशमुखांनी केली आहे. सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्हीचा आत्मप्रत्यय सरदेशमुखांच्या लिखाणातून आपल्याला दिसतो.

==त्र्यं.वि. सरदेशमुख यांची पुस्तके==
* अंधारयात्रा (समीक्षा ग्रंथ)
* उच्छाद (कादंबरी)
* उत्तररात्र (कवितासंग्रह)
* कालिदास आणि शाकुंतल : एक अर्घ्यदान (समीक्षा ग्रंथ)
* डांगोरा एका नगरीचा (कादंबरी)
* बखर एका राजाची (कादंबरी)
* ससेमिरा (कादंबरी)

==पुरस्कार==
* साहित्य अकादमी पुरस्कार - २००३ (डांगोरा एका नगरीचा या पुस्तकाला) .



कवितासंग्रह:
* उत्तररात्र
कादंबर्‍या:
* ससेमिरा
* बखर एका राजाची
* उच्छाद
* डांगोरा एका नगरीचा (साहित्य अकादमी पुरस्कार २००३)


===संदर्भ===
===संदर्भ===

२३:०७, १६ जुलै २०१५ ची आवृत्ती

त्र्यंबक विनायक सरदेशमुख (जन्म : अक्कलकोट, (सोलापूर जिल्हा, २२ नोव्हेंबर, १९२२; मृत्यू : पुणे, १२ डिसेंबर, २००५) हे एक मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि कवी होते.

शिक्षण

त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण सोलापूर व नंतर पुणे येथे झाले.

ललित लेखन

त्र्यं.वि. सरदेशमुखांनी सुरुवातीला ज्योत्स्ना, वाङ्मयशोभा, धर्नुधारी इत्यादी मासिकातून लेखन केले. त्यानंतर ससेमिरा ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आपले काव्यलेखन त्यांनी वैशाख या टोपणनावाने केले. उत्तररात्र हा त्यांचा कवितासंग्रह १९५५ साली प्रसिद्ध झाला.

समीक्षा लेखन

सरदेशमुखांचे समीक्षात्मक ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. साहित्याची निर्मिती, आकलन, स्वरूप आणि आस्वाद या संदर्भात स्वतःचे चिंतन त्यांनी या ग्रंथांतील लेखातून मांडले आहेत.

मानवी जीवनात असलेले शोकात्मता हे सरदेशमुखांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहे. बालकवी, केशवसुत, गोविदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितांचा वेध त्यांनी आपल्या अंधारयात्रा या पुस्तकात घेतला आहे. तसेच गडकरी, ग्रेस, नारायण सुर्वे, शरच्चंंद्र मुक्तिबोध, कुसुमाग्रज यांच्या काव्याबद्दल मूळगामी चर्चा सरदेशमुखांनी केली आहे. सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्हीचा आत्मप्रत्यय सरदेशमुखांच्या लिखाणातून आपल्याला दिसतो.

त्र्यं.वि. सरदेशमुख यांची पुस्तके

  • अंधारयात्रा (समीक्षा ग्रंथ)
  • उच्छाद (कादंबरी)
  • उत्तररात्र (कवितासंग्रह)
  • कालिदास आणि शाकुंतल : एक अर्घ्यदान (समीक्षा ग्रंथ)
  • डांगोरा एका नगरीचा (कादंबरी)
  • बखर एका राजाची (कादंबरी)
  • ससेमिरा (कादंबरी)

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार - २००३ (डांगोरा एका नगरीचा या पुस्तकाला) .


संदर्भ