अक्कलकोट
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अक्कलकोट हे महाराष्ट्राच्या सोलापुर जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले शहर आहे. हे अक्कलकोट तालुक्याचे तहसील मुख्यालय आहे.
?अक्कलकोट महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सोलापूर |
जिल्हा | सोलापूर |
तालुका/के | अक्कलकोट तालुका |
लोकसंख्या | ३८,२१८ (2001) |
पार्श्वभूमी
[संपादन]सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे असून अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. अक्कलकोटची २००१ सालची लोकसंख्या ३८,२१८ आहे[१].
धार्मिक महत्व
[संपादन]अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.
अक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात.ह्या हवनसाठी दूरवरून लोक येतात यावर संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासक ही भेट देतात
अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत. अक्कलकोट मध्ये आता नवीन अन्नछत्र उभारण्यात आले आहे.
अक्कलकोट संस्थान संपादन करा
स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१ च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.
इ.स. १७०८ मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही. संस्थातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.
अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले १९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
२००१ च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती. पुरुष ५१ % आणि स्त्रिया ४९ % होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३ % लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९ % पुरुष आणि ४१ % स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या १४% सहा वर्षे वयाखालील मुले होती.
हे सुद्धा पहा संपादन करा अक्कलकोट येथील कारंजा चौक माणिक चौक तत्कालीन उपसेनापती माणिक माने यांच्या नावे ओळखले जाते हे खरे आहे काय? माणिक माने हे अक्कलकोट संस्थानात दरबार उपसेनापती होते व राज्य विलीनीकरण झाल्यावर त्यांना 192 पोलिसांच्या वरच्या पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला होता. त्यांनी अक्कलकोट मध्ये उपद्रव माजविणारे समाजकंटक यांचा बंदोबस्त करून स्वतः या उपद्रवी लोकांना घोड्याच्या पायाला बांधून तेथील कारागृहात आणले. म्हणून त्यांच्या गौरवासाठी सदर चौकाला माणिक चौक हे नाव देण्यात आले असे म्हणले जाते. याचा काही पुरावा अक्कलकोट येथील संस्थानच्या कागद पत्रांमध्ये उपलब्ध असल्यास संदर्भासह नमूद करावा. अक्कलकोट रोड रेल्वे स्थानक संदर्भ आणि नोंदी
धार्मिक महत्त्व
[संपादन]अक्कलकोट स्वामी समर्थांची नगरी आहे. अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.
अक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात. ह्या हवनसाठी दूरवरून लोक येतात. यावर संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासकही भेट देतात.
अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत. अक्कलकोटमध्ये आता नवीन अन्नछत्र उभारण्यात आले आहे.
अक्कलकोट शेजारीच पाच किलोमीटरवर दहिटणे नावाचे गाव आहे त्या गावात बाराशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंती शैलीचे बांधकाम असलेले श्री मल्लिकार्जुन हे जागृत देवस्थान आहे. तसेच या गावात वीरभद्रेश्वर मंदिरही आहे. श्री वीरभद्रेश्वरांची यात्रा दसऱ्या दिवशी चालू होऊन पौर्णिमे दिवशी संपते. पारंपारिक जीवन जगत असलेल्या या गावात श्री मल्लिकार्जुन श्री वीरभद्रेश्वर यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. दहिटणे सारखेच श्री मल्लिकार्जुन मंदिर दहिटणे पासून तीन किलोमीटरवर असलेल्या चपळगावात देखील आहे. चपळगावात देखील श्री मल्लिकार्जुन महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे.
अक्कलकोट संस्थान
[संपादन]स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१ च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.
इ.स. १७०८ मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही. संस्थानातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.
- अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक
- १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले
- १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले
- १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले
- १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले
- १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले
- १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले
- १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले
- १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले
- १९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले
- १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
२००१ च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती.पुरुष ५१ % आणि स्त्रिया ४९ % होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३ % लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९ % पुरुषा आणि ४१ % स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या १४ % सहा वर्षे वयाखालील मुले होती.
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |