Jump to content

"राम बाळकृष्ण शेवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४५: ओळ १४५:
* नागभूषण पुरस्कार
* नागभूषण पुरस्कार
* राष्ट्रसेवा पुरस्कार
* राष्ट्रसेवा पुरस्कार

==राम शेवाळकर यांच्या संबंधी पुस्तके==
* राम शेवाळकर - अमूताचा धनु (लेखक : नागेश सू शेवाळकर; प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड)


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

२३:५७, १३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

राम शेवाळकर
जन्म नाव राम बाळकृष्ण शेवाळकर
जन्म मार्च २, १९३१
अचलपूर, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मे ३, २००९
नागपूर, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, ललित, चरित्र
वडील बाळकृष्ण काशिनाथ शेवाळकर
आई गोपिका बाळकृष्ण शेवाळकर

राम शेवाळकर (मार्च २, १९३१ - मे ३, २००९) हे मराठी लेखक, कवी होते.

जीवन

राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. शेवाळकर घराण्यात कीर्तनाची परंपरा होती. त्यामुळे शेवाळकरांवर लहानपणापासून संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.
शेवाळकरांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृतमराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अंगारा कवितासंग्रह
अमृतझरी ललित
असोशी कवितासंग्रह पराग प्रकाशन, नागपूर १९५६
उजेडाची झाडे व्यक्तिवर्णन
दर्शन विनोबांचे व्यक्तिवर्णन
देवाचे दिवे व्यक्तिवर्णन
ध्यासशिखरे आत्मकथन
पाणियावरी मकरी आत्मकथन
पूर्वेची प्रभा ललित
प्रवास आणि सहवास व्यक्तिवर्णन
प्रसन्नतेचा मुक कटाक्ष व्यक्तिवर्णन
भावबंध व्यक्तिवर्णन
महर्षी विनोबा चरित्र
माझी दृष्टी माझी सृष्टी आत्मकथन
माहेरचे दिवस आत्मकथन
मोरपीस व्यक्तिवर्णन
रांगोळी आत्मकथन
रेघा कवितासंग्रह
वर्तुळ आणि क्षितिज व्यक्तिवर्णन
साम्ययोगी विनोबा चरित्र
सोयरे लेखसंग्रह
स्नेहगोत्री आत्मकथन

संपादित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अक्षरमाधव
आमचे विनोबा
चित्रगुप्त
तूलाधार
त्रिविक्रम आणि संचित
दर्शन विनोबांचे
निवडक मराठी आत्मकथा
निरूपणचंद्रिका
यशोधन
रूपे तीर्थरूपांची
लोकमान्य टिळकांचे निबंध
विचक्षणा
विचारशासन
विनोबांचे धर्मसंकीर्तन
विनोबासारस्वत
शिक्षणविचार

पुरस्कार आणि सन्मान

  • 'मॅन ऑफ द इयर ' हा अमेरिकेचा पुरस्कार[]
  • 'साहित्य धुरंधर' पुरस्कार बोस्टन येथील संस्थेतर्फे[]
  • स्वामी विवेकानंद पुरस्कार
  • श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य पीठ पुरस्कार
  • दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा कुसुमाग्रज पुरस्कार
  • नागपूर विद्यापीठाची डी. लिट्.
  • डॉ. राधाकृष्णन पुरस्कार
  • समाजभूषण पुरस्कार
  • विदर्भ गौरव पुरस्कार
  • विदर्भ भूषण पुरस्कार
  • जीवनव्रती पुरस्कार
  • नागभूषण पुरस्कार
  • राष्ट्रसेवा पुरस्कार

राम शेवाळकर यांच्या संबंधी पुस्तके

  • राम शेवाळकर - अमूताचा धनु (लेखक : नागेश सू शेवाळकर; प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b म.टा. विशेष प्रतिनिधी. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/---/articleshow/4478403.cms?. १९ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)