संस्‍कृत भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संस्कृत भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
आरुवर्तिया संस्कृत भाषा
संस्कृतम्
स्थानिक वापर भारत
प्रदेश भारत
पर्व अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० (वैदिक संस्कृत). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
लोकसंख्या सुमारे १४,०००
क्रम 701
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी पाली
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत (उत्तराखंड) हिमाचल प्रदेश, (महाराष्ट्र)
भाषा संकेत
ISO ६३९-१ 701
ISO ६३९-२ sanskrit
ISO ६३९-३ san[मृत दुवा]
250px

संस्कृत ही एक प्राचीन भाषा असून ती समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू , बौद्ध ,आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले व इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे.कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.कवी कालिदास या कवीची मेघदूत खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् ऋतुसंहार ही काव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.

प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा[संपादन]

‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.

संस्कृत भाषेत एकेका देवाला अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णुसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही काही जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.

संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६०च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १००च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८०च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत.

मोगल आणि संस्कृत[संपादन]

मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउन्टर्स – संस्कृत अ‍ॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.

लिपी[संपादन]

संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखिते अनेक लिप्यांत लिहिलीले जात असत; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.

अक्षरमाला[संपादन]

स्वर[संपादन]

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ

व्यञ्जने[संपादन]

क् ख् ग् घ् ङ्

च् छ् ज् झ् ञ्

ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्

प् फ् ब् भ् म्

य् र् ल् व् श्

ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् (शेवटवी दोन जोडाक्षरे असली, तरी सातत्याने लागत असल्याने व्यंजने समजली जातात.)

रूपे आणि वाक्यशास्त्र[संपादन]

संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्‍येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्‍यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.

संस्कृतचा अभ्युद्धार[संपादन]

संस्‍कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.

ग्रंथ संपदा[संपादन]

  • वेद
  • ऋक्‌संहिता
  • उपनिषद्
  • बृहत्‌संहिता
  • रसार्णव
  • अगस्त्य संहिता
  • वैशेषिक संहिता
  • दर्शने
  • न्यायदर्शने
  • न्यायकंदली
  • सूर्यसिद्धान्त
  • सिद्धान्त शिरोमणी

भारतात संस्कृतचा प्रचार करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती[संपादन]

  • श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र, नासिक. (प्रा. श्री. अतुल तरटे सर)
  • श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ (पुणे)
  • अजित मेनन
  • आनंद-पत्रिका (नियतकालिक)
  • आनंदाश्रम (पुणे)
  • Dr Ambedkar Hindi Sanskrit Vidyapeeth Bihar Cum Education And Training (ब्रेगुसराई, बिहार)
  • उषा (नियतकालिक)
  • कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक, महाराष्ट्र)
  • श्रीकाशी पत्रिका (नियतकालिक)
  • कौशलेन्द्र संस्कृत विद्यापीठ (दुर्ग, मध्य प्रदेश)
  • गाण्डीवम्‌ (नियतकालिक)
  • गीर्वाण (नियतकालिक)
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे, वगैरे)
    • Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत)
    • श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८)
  • डेक्कन कॉलेज (पुणे)
  • दिव्यज्योति (नियतकालिक)
  • नेपाळ संस्कृत विश्वविद्यालय
    • रूरू संस्कृत विद्यापीठ (ऋदी, नेपाळ)
    • शारदा संस्कृत विद्यापीठ (महेंद्रनगर, नेपाळ)
    • हरिहर संस्कृत विद्यापीठ (खिदीम, नेपाळ)
    • जनता संस्कृत विद्यापीठ (बिजौरी, नेपाळ)
    • कालिका संस्कृत विद्यापीठ (नेपाळ)
    • संस्कृत पाठशाळा (राजेश्वरी-काठमांडू, नेपाळ)
    • वाल्मीकी विद्यापीठ आणि राणीपोखरी संस्कृत माध्यमिक शाळा (काठमांडू, नेपाळ)
      • तीनधारा संस्कृत हॉस्टेल (काठमांडू, नेपाळ)
  • प्रभातम्‌ (नियतकालिक)
  • प्रसाद प्रकाशन (पुणे)
  • ब्राह्मण महा-सम्मेलनम्‌ (नियतकालिक)
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (पुणे)
  • भारतधर्म (नियतकालिक)
  • भारतश्री (नियतकालिक)
  • मिथिला संस्कृत विद्यापीठ (बिहार)
  • जगद्गुरु रामानन्दाचार्य राजस्थान संस्कृत विश्वविद्यालय (मडाऊ, जयपूर)
  • राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती)
  • राष्ट्रीय संस्कृत संस्थान (देवप्रयाग, उत्तराखंड); (नवी दिल्ली)
  • श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)
  • लोक संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • पं. वसंतराव गाडगीळ
  • विद्या (नियतकालिक)
  • विश्व संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • वेदशास्त्रोत्तेजक सभा (पुणे)
  • वैदिक संशोधन मंडळ (पुणे)
  • व्रजगंधा (नियतकालिक)
  • शारदा मासिक
  • शारदा (पत्रिका)
  • शारदा संस्था (प्रकाशन संस्था, वाराणशी)
  • श्यामला (नियतकालिक)
  • श्री श्रद्धा संस्कृत विद्यापीठ (लक्ष्मणगढ-सीकर, राजस्थान)
  • श्री (नियतकालिक)
  • कै. श्री.भा. वर्णेकर
  • सम्भाषण सन्देश (मासिक)
  • दैनिक संस्कृत (नियतकालिक, कानपूर)
  • संस्कृत अध्ययन केंद्र (तळेगाव-पुणे)
  • संस्कृत कॉलेज (बनारस)
  • संस्कृत गुरूकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.)
  • संस्कृत ग्रंथमाला
  • संस्कृत पाठशाळा (या अनेक आहेत, ८०हून अधिक पाठशाळांना केंद्र सरकारचे अनुदान आहे.)
  • संस्कृत प्रसारिणी सभा (पुणे)
  • संस्कृत भवितव्यम्‌ (नियतकालिक)
  • संस्कृत भारती (अखिल भारतीय संस्था, मुख्यालय - नवी दिल्ली)
  • संस्कृत महाविद्यालय (आणि विद्यापीठ, कलकत्ता) - स्थापना इ.स. १८२४)
  • संस्कृत विद्यापीठ (विशालखंड, गोमतीनगर, लखनौ)
  • संस्कृत श्री (नियतकालिक)
  • संस्कृत साकेत (नियतकालिक)
  • महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान (भरतपूर, उज्जैन)
  • सुप्रभातम्‌ (नियतकालिक)
  • स्विद्‌ (नियतकालिक)
  • हरियाणा संस्कृत अकादमी

बाहेरील दुवे[संपादन]

हिन्दी/इंग्रजी दुवे[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

  • मणिप्रवाळम (संस्कृत आणि तमिळ भाषेच्या संगमाने तयार झालेली प्राचीन भाषा)