"अनंत आत्माराम काणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते. |
अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते. |
||
महाराष्टरा सरकार ललित लेख असलेल्या एखाद्या पुस्तकाला अनंत काणेकर यांच्या नावाचा पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार १. विनायकदादा पाटील यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या ललितलेखाच्या पुस्तकाला मिळाला आहे (१९९६). |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
ओळ ११०: | ओळ ११२: | ||
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[औरंगाबाद]], १९५७ |
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[औरंगाबाद]], १९५७ |
||
* पद्मश्री पुरस्कार,१९६५ |
* पद्मश्री पुरस्कार,१९६५ |
||
* सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१७:५४, २३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अनंत आत्माराम काणेकर | |
---|---|
जन्म नाव | अनंत आत्माराम काणेकर |
जन्म |
डिसेंबर २, इ.स. १९०५ मुंबई |
मृत्यू |
०४ मे १९८० वांद्रे , मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन |
साहित्य प्रकार | कवी, लेखक, पत्रकार |
वडील | आत्माराम काणेकर |
अनंत आत्माराम काणेकर (जन्म : डिसेंबर २, इ.स. १९०५ - मृत्यू : जानेवारी २२, इ.स. १९८०) हे मराठी कवी, लेखक, पत्रकार होते. १९३५ ते १९३९ अशी चार वर्षे `ते 'चित्रा’ आणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते.
अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली व वकिलीचा व्यवसाय केला. १९३३ मध्ये चांदरात या पहिल्या काव्यसंग्रहाचे आणि पुढील वर्षी पिकली पाने या लघुनिबंध संग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी १९३५ साली वकिली पैशाला रामराम ठोकला आणि साहित्य सेवेत स्वतःला वाहून घेतले.
इ.स. १९४१मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले.
`प्रभात’च्या `माणूस’ चित्रपटाचे ते संवाद लेखक आणि नाट्यमन्वंतर या नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.
अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
महाराष्टरा सरकार ललित लेख असलेल्या एखाद्या पुस्तकाला अनंत काणेकर यांच्या नावाचा पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार १. विनायकदादा पाटील यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या ललितलेखाच्या पुस्तकाला मिळाला आहे (१९९६).
प्रकाशित साहित्य
काव्यसंग्रह
- चांदरात, १९३३
लघुनिबंध
- अनंतिका
- उघड्या खिडक्या, १९४५
- तुटलेले तारे
- पाण्यावरल्या रेषा, १९६५
- पिकली पाने, १९३४
- प्रकाशाची वारे, १९७०
- शिंपले आणि मोती
ललित लेखसंग्रह
- आचार्य अत्रे विविधदर्शन
- उजेडाची झाडे
- घरकुल
- निवडक गणूकाका
- विजेची वेल
प्रवासवर्णन
- आमची माती, आमचे आकाश (१९४९, उत्तर भारत)
- खडक कोरतात आकाश (१९६४, अमेरिका)
- गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या (१९६९, युरोप)
- धुक्यातून लाल ताऱ्याकडे (१९३७, युरोप व रशिया)
- देशोदेशीच्या नवलकथा (माहितीपर)
- निळे डोंगर, तांबडी माती (१९५०, दक्षिण भारत)
- रक्ताची फुले (१९५९, पंजाब)
- सोनेरी उन्हात पाचूची बेटे (१९५९, कोलंबो, हॉंगकॉंग)
कथा संग्रह
- अनंत काणेकर निवडक कथा (भाग १, ..) (पॉकेट बुक्स)
- काळी मेहुणी व इतर कथा
- जागत्या छाया
- दिव्यावरती अंधार
- मोरपिसे
- रुपेरी वाळू (रूपककथा)
चित्रपट संवाद
- माणूस, १९३९
- आदमी, १९३९
नाटक
- धूर व इतर एकांकिका
- सांबर (एकांकिका)
- निशिकांताची नवरी
- पतंगाची दोरी
इतर
- नाट्यमन्वंतर या नाट्यसंस्थेची स्थापना
अनंत काणेकर यांनी लिहिलेली आणि गाजलेली ध्वनिमुद्रित गाणी
- आता कशाला उद्याची बात (गायिका : शांता हुबळीकर)
- आला खुशीत् समिंदर (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
- एकलेपणाची आग लागली (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
- तू माझी अन् तुझा मीच (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
- दर्यावर डोले माझं (गायिका : ज्योत्स्ना भोळे)
अनंत काणेकरांवरील साहित्य
- अनन्वय (अनंत काणेकर यांच्यावरील लेख, आत्मपर लेखन व भाषण) : (संपादित ग्रंथ)
- अनन्वय (अनंत काणेकर - जीवन व साहित्य) (संपादिका कमल काणेकर)
- अनंत काणेकर (चरित्र : लेखक -अच्युत बाळकृष्ण परमानंद)
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, औरंगाबाद, १९५७
- पद्मश्री पुरस्कार,१९६५
- सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार
संदर्भ
१. http://archive.india.gov.in/myindia/padmashri_awards_list1.php?start=2170