विकिपीडिया:उल्लेखनीयता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लेखन चक्र.png

मराठी विकिपीडिया हा एक स्वतंत्र प्रकल्प असून मराठी प्रकल्प स्वत:चे ज्ञानकोशीय निकष लक्षात घेतो, इतर भाषी विकिपीडियाचे संकेत लक्षात घेतले तरी त्यांचे अंधानुकरण करत नाही. विकिमीडियाच्या उद्दिष्टास धरून मराठी आणि महाराष्ट्रीय आवश्यकता लक्षात घेऊन.हि एक प्रदिर्घ आणि नेहमीकरीताची प्रक्रीया आहे. या विषयावर मराठी विकिपीडियाची स्वतःची निती बनवण्याची आवश्यकता प्रतिपादीत केल्या गेली आहे या बद्दल आपले विचार चर्चा पानावर व्यक्त करा.

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता साशंकीत असलेल्या लेखांवर अथवा चर्चा पानांवर {{उल्लेखनीयता}} लावला जातो. ज्या चर्चा संपन्न झाल्या आहेत त्या चर्चांना सुयोग्य प्रचालकीय कार्यवाही नंतर साचा:उल्लेखनीयतासंपन्नचर्चा लघुपथ {{उसंच}} साचा लावला जातो.

उल्लेखनीयतेचे निकष

 • संबधीत विषयाच्या संदर्भाने विशेषता असणे
 • उल्लेखनीय विषयाचा अंगभूत गूणधर्म असणे
 • इतर विश्वासार्ह माहिती/ज्ञान स्रोतांनी दखल घेतलेली असणे
 • ललितेतर साहित्यातील/स्रोतातील संदर्भ उपलब्ध असणे.
 • ललित साहित्याचे समिक्षीत संदर्भ उपलब्ध असणे
 • स्वतंत्र लेखासाही किमान दोन ज्ञानकोशीय परिच्छेद होतील एवढा मजकुर उपलब्ध असावा. ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असूनही पुरेसा मजकुर उपलब्ध नसल्यास इतर एकत्रित लेखात विलिन करण्याचा विचार करावा.

सहसा सहज उल्लेखनीयता असलेले विषय

 • मोठ्या वस्त्या/गाव/शहर/जिल्हा/राज्य/देश
 • माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळा/ महाविद्यालये/ विद्यापिठे/ मान्यतापाप्त ॲटॉनॉमस शैक्षणिक संस्था/ शैक्षणिक संस्था संस्थापक प्रमुख/ प्राचार्य/ कुलगुरु / समसमिक्षा झालेल्या संशोधन प्रबंधांचे Phd. प्राप्त संशोधक आणि त्यांचे प्रबंध
 • समसमिक्षीत ज्ञान-विज्ञान विषय
 • नद्या, पर्वत, अभयारण्ये,
 • लोक समुह
 • आडनावे
 • पुस्तक प्रसिद्ध झालेले साहित्यिक, पुस्तक परिक्षण प्रकाशित झालेली, समसमिक्षीत, पुरस्कारप्राप्त, संदर्भात नमुद पुस्तके अथवा त्यांच्या आशयावर आधारीत विषय, दोन पेक्षा अधिक शाळा/महाविद्यालय/अभ्यासक्रमातील अथवा एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील पुस्तक
 • पुरस्कार प्राप्त व्यक्ति
 • वर्तमान अथवा इतिहासातील ख्यात (वि/कु) व्यक्ति
 • माध्यमे / वृत्तपत्रिय आणि माध्यमातील प्रमूख संपादक
 • नभोवाणी/नाट्य/दुरचित्रवाणी/चित्रपट ख्यात कलावंत; उल्लेखनीयता विषय समकक्ष क्षेत्रातील ख्यात व्यक्ती अथवा फालोअर्सचा दुजोरा प्राप्त लोककलावंत/ गायक/ कवि/ लेखक/ गुरु / महाराज
 • स्वातंत्र्य सैनिक
 • आमदार, खासदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंत्रि, महापौर,
 • राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे खेळाडू आणि कलावंत
 • वृत्तमाध्यमांनी विशेषत: सोबत संपादकीय स्तंभलेखक अथवा संपादकीयातून नोंद घेतल्या गेलेल्या ठळक व्यक्ति, संस्था, घटना आणि उल्लेख.
 • नभोवाणी / दुरचित्रवाणी इलेक्ट्रॉनीक माध्यमातून चर्चा मुलाखतींचा विषय असलेल्या ठळक व्यक्ति, संस्था, घटना आणि उल्लेख.
 • चित्रपट गृहातून प्रदर्शित चित्रपट आणि त्यातील मुख्य निर्माते/दिग्दर्शक/नट/नट्या/संगितकार/गायक
 • शास्त्रिय संगित घराण्यातील पब्लिक परफॉर्मन्स देणारे गायक अथवा इतर उल्लेखनीयता प्राप्त गायकांकडून दखल घेतले गेलेले गायक (संदर्भ नसल्यास शास्त्रिय संगित श्रोत्यांकडून दुजोरा हवा)
 • नाटक/दुरचित्रवाणी स्पर्धा जिंकणारे मुलाखत घेतलेले गेलेले /चित्रपटातील गायक, वृत्तपत्रिय अथवा इतर उल्लेखनीयता प्राप्त गायकांकडून दखल घेतले गेलेले गायक
 • उल्लेखनीयता प्राप्त संगित उत्पादक कंपन्याकडून वितरीत होणारे संगितकार आणि गायक

लवचिकता

ग्रामीण जीवनातील गोष्टींचा वेगळा विचार करावयास लागतो. खरोखरच विश्वकोशिय दखल घेण्याजोग्या व्यक्ती इतर माध्यमांच्या नजरेतून सुटलेल्या असू शकतात त्या शिवाय बर्‍याच व्यक्तींना प्रसिद्धी/माध्यम परांङमूख असण्याची परंपरा आहे किंवा त्यांच्या बद्दल फारच थोडे लिहिलेगेले पण व्यक्तीचे त्याच्या विवक्षीत क्षेत्रात योगदान मोठे होते. अशा व्यक्तींना ओळखणारी काही मंडळी प्रथमच अशा व्यक्तींबद्दल लिहिती होत असतील आणि त्यांनाही केवळ मराठी विकिपीडिया हेच संकेत स्थळ परिचयाचे असणेही शक्य आहे.

त्या शिवाय एखाद्या खेडे गावात होणारी वार्षिक जत्रे सारखी परंपरा किंवा नेमकी घेतली जाणारी पिके इत्यादी तत्सम माहिती करिता पडताळण्याजोगे संदर्भ उपलब्ध होतातच असे नाही.

ग्रंथ आणि काव्यांचे उल्लेखनीयता निकष

अभंग हा प्रकार कुठे असावा या संदर्भात, माहिती वर्गीकरण तसेच तत्सम दुवे देऊ शकाल काय?

ज्यानांकल्पना नाही त्यांना या सीमारेषा पुसट वाटतात. अभंग या विषयावर एक ज्ञानकोशीय लेखही होऊ शकतो पण त्यात अभंग/कविता कसा लिहावा हे विकिबुक्स या सहप्रकल्पात जावयास हवे आणि एखादा विशिष्ट अभंग/कविता लेखन मूळ लेखन असल्यास विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवे.

इथे हे लक्षात घ्यावयास हवे कि एखाद्दा अभंगाचे/कवितेचे/पुस्तकाचे विवीध समिक्षकांनी रसग्रहण/समिक्षण कसे केले त्या विशीष्ट कवितेची/ग्रंथाची/साहित्याची निर्मिती प्रक्रीया या गोष्टी विश्वकोशिय परिघात येतात पण प्रत्यक्षात कविता अभंग नाटक हे ललित साहित्य विश्वकोशिय परिघात येत नाही. अजून एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास बा सी मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" नावाची कविता आहे हि कविता विश्वकोशाचा हिस्सा होऊ शकत नाही ती (प्रताधिकाराचे प्रश्न नसतील तर विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवी) पण या कवितेची शेकड्याने अर्थ लावले गेले रसग्रहणे झाली आणि तेवढीच पिएचडी प्रबंधही एका कवितेवर झाले.[१]त्या कवितेचा उगम कशात असला पाहिजे ते नेमका अर्थ काय या संबधीच्या लेखनाचा मागोवा विश्वकोशिय लेखन संकेतास पाळून विकिपीडियात घेता येईल.आणि असा मागोवा घेताना अशा कवितेच्या/अभंगाच्या ओळी नमूद करावयास हरकत नाही. पण "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेचा अभ्यास कसा करावा असे प्रकरण आणि कविते संदर्भात प्रश्नोत्तर पद्धतीचे लेखन विकिबुक्स मध्ये जावयास हवे

"रूप पाहतां लोचनीं"चे विवीध लोकांनी रसग्रहण कसे केले विवीध संगितकारांनी वेगवेगळ्या चाली कशा लावल्या याची संदभासहित माहिती या लेखात मिळणार असेल तर "रूप पाहतां लोचनीं" हा लेख मराठी विकिपीडियात असू शकेल पण अजून एक काळजी घेणे जरूरी आहे कि ते तुमचे व्यक्तिगत रसग्रहण असूनये. माझे आवडलेल्या हिन्दीचित्रपटगिताचे माझे स्वतःचे रसग्रहण विकिपीडियावर लिहिणे अभिप्रेत नाही पण मनोगतावर अभय नातू किंवा उपक्रम मायबोलीवर संकल्प द्रवीडांनी केलेल्या ( अजून तसे ऐकिवात नाही मी गमतीने उदाहरण देत आहे) रसग्रहणाची माहिती ते विकिपीडियावर देऊ शकणार नाहित पण मी मात्र त्यांच्या विकिपीडियाबाहेर झालेल्या रसग्रहणाचे संदर्भ वापरून अभंग/चित्र्पट गीत या बद्द्ल विश्वकोशिय मर्यादेत बसणारा इतर लेखन संकेतांचे पालन करित एखादा लेख लिहू शकेन.

अभंग, कविता कोणतेही मूळ लेखन जसेच्या तसे लिहावयाचे झाल्यास विकिस्त्रोत या सहप्रकल्पात जावयास हवे. "एखादी गोष्ट कशीकरावी' अथवा गणिता सारख्या एखाद्या विषयास विहिलेले सबंध पुस्तक लिहिण्याकरिता विकिबुक्स हा सहप्रकल्प आहे.

विकिपीडिया आणि विकिबुक्स येथे लेखनात कुणीही बदल करू शकते उद्दा मी ज्ञानेशवरांच्या ओळी बदलून माझ्या टाकेन तर विकिपीडिया किंवा विकिबुक्स संकेतास चुकीचे नाही:) त्यामुळे विकिस्रोत या वेगळ्या सहप्रकल्पाची गरज आहे कि जिथे त्या लेखनाचे मूळ स्वरूप टिकवले जाते.

उल्लेखनीयता मर्यादा

व्यक्ति विषयक लेख

 • मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुन राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही. हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्‍या भक्तगणांची संख्य अगणीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे. हनुमानाच्या मंदीरांची शृंखला बांधवून घेणार्‍या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणाकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मजकुर असतो. पण अशा देवतांच्या पायरीवर नाव कोरुन घेणार्‍या व्यक्तींची भक्तीही विशेष असू शकेल परंतु १) इतर चारचौघांपेक्षा काही वेगळी नोंद होणे २) सहसा इतर माध्यमातून त्याची दखल घेतलेली असून तसा संदर्भ उपलब्ध असणे या निकषांना सर्वच भक्त पार करून ज्ञानकोशात स्थान मिळवू शकतील असे नाही.

काही वेळा काही व्यक्ती विशेषही असू शकतात की ज्याची ज्ञानकोशीय लेखक संपादकांना कल्पना असेलच असे नाही. पण अशी उल्लेखनीयता सिद्ध करण्याचा जिम्मा सर्वसाधारणपणे असे लेख तयार करणार्‍या व्यक्तीवरच सोडून अनुल्लेखनीय वाटणारे लेख सहसा वगळले जातात. श्री. भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्या बद्दल असाच एक लेख मराठी विकिपीडियावर आला इतर राजकारणी मंडळींपेक्षा काही विशेष उल्लेखनीयतेची नोंद उपलब्ध झाली तर कदाचित पुन्हाही मराठी विकिपीडियावर येऊ शकेल परंतु सद्य खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरतरी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही आहे म्हणून सदर लेख मराठी विकिपीडियातून वगळून त्यांचे बद्दल मराठी विकिपीडियावर प्रकाशित माहिती इतर मराठी संकेतस्थळावर येथे स्थानांतरीत करीत आहे.


 • केवळ काही जर्नल्स आणि लेख लिहिणे हे ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेस पुरेसे होईलच असे नाही. त्या साठी त्यांच्या उल्लेखनीय कार्यांची माहिती वगैरे द्यावई लागेल या बाबत घाई करण्या पेक्षा व्यक्ती विषयक लेखाचा खूप आग्रह न धरता त्यांनी ज्या विषयांवर लेखन केले आहे त्याच विषयावर मराठी विकिपीडियातील लेखात त्यांच्या लेखनातील मते उधृत करता येतील आणि त्यांच्या लेखनाचा नावाचा संदर्भ नमुद करता येईल. (अर्थात त्यांची मते नमुद करतानाही ती तुम्हाला तुमच्या शब्दात नमुद करावी लागतील अन्यथा कॉपीराईटचा प्रश्न उपस्थित होतो हे वेगळे सांगणे न लगे.)
 • संदर्भ स्रोतासाठी म्हणून उल्लेखनीय ठरलेली व्यक्ती ज्ञानकोशावर स्वतंत्र नोंद असावी एवढी उल्लेखनीय असेलच असे नाही. काही उल्लेखनीयता अथवा संदर्भमूल्य असलेले माहिती/ज्ञान सर्वसामान्य व्यक्तीकडेही असू शकते तेवढ्या विशीष्ट संदर्भात नमुद करण्या पलिकडे त्या व्यक्तीस स्वतंत्र ज्ञानकोशीय उल्लेख असणे अत्यावश्यक नसावे. त्या पलिकडे जाऊन त्यांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का आणि तशी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असल्यास स्वतंत्र लेख लिहिण्या इतपत स्वतंत्र मजकुर उपलब्ध आहे का, आणि मजकुर उपलब्ध असूनही लेख ज्ञानकोशात उपलब्ध आहे का या स्वतंत्र बाबी असतात.


हेही लक्षात घ्या

 • विकिपीडियात,दखलपात्रता म्हणजे... लेखातील विषय हे दखल घेण्याजोगे हवे, किंवा त्यात "नोंद घेण्याजोगी पात्रता" असावी. हे ध्यानात घ्यावयास हवे की दखलपात्रता ही एखादा विषय विख्यात असणे,महत्त्वाचा असणे किंवा प्रसिद्धी यावर अवलंबुनच ठरविल्या जाते असे नाही. ते फक्त त्या विषयाच्या स्विकारास हातभार लावतात.

देवनागरी शिवाय इतर लिपी लेखनाची उल्लेखनीयता

उल्लेखनीयता संपन्न चर्चा

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

... {{उल्लेखनीयता| कारण = पहिल्या ओळीतील '''( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) ''' हे परभाषी आणि परलिपी मजकुराची उल्लेखनीयता}}

लेख लिहिण्यात ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.
हा एक सुपरिचीत चित्रपट आहे ,चित्रपटाच्या उल्लेखनीयते बद्दल तीळमात्रही शंका नाही.पण यालेखाच्या अनुषंगाने लेखातील पहिल्या ओळीतील ( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) हे परभाषी आणि परलिपी उल्लेख खरेच गरजेचे आणि मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने कितपत विश्वकोशीय उल्लेखनीयता ठेवतात याचा पुन्हा विचार करता येऊ शकेल किंवा कसे.

जिथे एखादा विषय मुलत: परभाषेत आहे तर त्याच मूळ रूप दाखवण्याकरिता परभाषेतील पहिल्या ओळीतील नामोच्चार दर्शन उचीत ठरते.

 • हिंदी लेखन वेगळे दाखवावयास हरकत अशी नाही , पण मराठी आणि हिंदीतील उच्चारण लेखन वाचन एक सारखे असताना हिंदी असे लिहून पुन्हा लेखन दाखवण्या पेक्षा चक दे! इंडिया (हिंदी चित्रपट) अशा काही पर्यायाचा विचार होउ शकेल किंवा कसे ?
 • उर्दू आणि इंग्रजी या आता भारतीय भाषा आहेत यात दुमत नाही.हिंदी चित्रपट/किंवा इतर भाषेतील सर्व भाषात डब केले जाऊ शकतात किंवा त्यांची टायटल जगातील सर्व भाषा लिपीतून लिहिली जाऊ शकतात .पण या विशिष्ट लेख उदाहरणात इतर लिपी वापरून लेखन करून दाखवण्यात, विश्वकोशाचा वाचक म्हणून माझ्या माहितीत कोणतीही अधिकची भर पडते आहे ,
 • इतर लिपींशी द्वेष आहे अशातला भाग नाही पण त्यांच्या,मराठी विकिपीडियाच्या अंगणात या विशीष्ट लेखातील उपयोगाचे (मला) प्रयोजन लक्षात आले नाही.
हा चित्रपट आणि चित्रपटाचा विषय माझ्या विशेष आत्मियतेचा आहे.चांगला लेख लिहिल्या बद्दल सर्व संपादकांना पुन्हा एकदा धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:४०, १५ मे २०१३ (IST)
आपल्या म्हणण्याशी पूर्ण सहमती. उगाच ३-४ भाषांमध्ये चित्रपटाचे नाव देण्याची काहीच गरज नाही. - अभिजीत साठे (चर्चा) २२:३४, १५ मे २०१३ (IST)हे सुद्धा पहा

 1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27172:2009-11-27-12-58-45&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 [मृत दुवा]