Jump to content

"सुषमा अंधारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९७: ओळ ९७:
===राजकीय कारकीर्द===
===राजकीय कारकीर्द===
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}

२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करणार केला, यापुर्वी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.


==साहित्य व विचार==
==साहित्य व विचार==

०१:२०, २९ जुलै २०२२ ची आवृत्ती

सुषमा अंधारे
जन्म ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६
पाडोली (कळंब तालुका, उस्मानाबाद जिल्हा)
निवासस्थान पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ
पेशा वकील, सामाजिक कार्यकत्या, बौद्ध कार्यकत्या, स्त्रीवादी अभ्यासक
धर्म बौद्ध धर्म
वडील दत्ताराव गूत्ते
नातेवाईक दगडू अंधारे (आजोबा)


सुषमा दगडू अंधारे (जन्म : पाडोली-कळंब, ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६ [काळ सुसंगतता?]) [ दुजोरा हवा][] ह्या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.[][][]

व्यक्तिगत जीवन

सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी कळंब तालुक्यातील पाडोळी (जिल्हा - उस्मानाबाद) येथे झाला. सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.[ दुजोरा हवा]

सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे वंजारी असून, आई कोल्हाटी समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सु़षमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.

सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत.[] त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. महात्मा फुले-शाहू महाराजबाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.

त्यांनी २ ऑक्टोबर, इ.स. २००६ रोजी भदंत नागार्जुन सुरई ससाई यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व ’उपरा’कार लक्ष्मण माने, एकनाथ आवाड यांच्यासह बौद्धधर्माची दीक्षा घेतली.[ दुजोरा हवा]

कारकीर्द

व्यावसायिक कारकीर्द

सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र इ.स. २००६ मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. इ.स. २००९ ते २०१० या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.

सामाजिक कारकीर्द

परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.

सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.[ संदर्भ हवा ] भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.[]

राजकीय कारकीर्द

इ.स. २००९ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.[ संदर्भ हवा ]

२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करणार केला, यापुर्वी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.

साहित्य व विचार

सुषमा अंधारे यांचा "शापित पैंजण" नावाचा कविता संग्रह इ.स. २०१० मध्ये पुण्याच्या देवाशीष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.[] शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह कोल्हाटी जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.

सुषमा अंधारे यांच्या मते दलित साहित्याने जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर चिकित्सा किंवा समीक्षा केली व ती आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटके यासारख्या साहित्यकृतींतून मांडली, तशी चिकित्सा ग्रामीण व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदिम प्रेरणांच्या रूपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपरिक भक्तिसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलीकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. मुस्लिम मराठी साहित्यामधील तलाक पीडितांचे किंवा बहुपत्‍नीकत्वाचे प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले, ते ही अत्यंत तुरळक व स्फुट आहे. मराठी वैचारिक साहित्यात धर्म आणि संस्कृती यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. वि.रा. शिंदे, सानेगुरुजी, लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य विनोबा भावे यांचे संस्कृती चिंतन म्हणजे धर्म चिकित्साच आहे. अगदी अलीकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "सदानंद मोरेंनी' केलेले भाष्य किंवा दिलीप चित्रे यांनी "तुकोबांच्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन मराठी संस्कृती विषयीच्या चर्चाविश्वाचा एक समृद्ध धर्मचिंतनाचा भाग आहे.

पुरस्कार व सन्मान

  • धम्मकन्या पुरस्कार - २००९ मध्ये उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने
  • भीमरत्‍न पुरस्कार - २०११ मध्ये यूथ रिपब्लिकनच्या वतीने मुलुंड (मुंबई) येथे आयकर आयुक्त सुबचन राम तसेच उत्तम खोब्रागडे यांच्या हस्ते प्रदान
  • सत्यशोधक समाजभूषण – शोधक विचार मंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी (कुसुम सभागृह) येथे आयोजित चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रदान.[]
  • बाबासाहेबांची लेक – ४ मे २०१५ रोजी गुजरात, दीव आणि दमण यांच्या संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ पहा चर्चा:सुषमा अंधारे
  2. ^ a b अंधारे, सुषमा. "नातं मातीचं, नातं मातेचं! (सुषमा अंधारे)". pp. सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्रमांक ?. २३ जून २०१५. भाप्रवे दुपारी १५ वाजून ४० मिनीटे. रोजी पाहिले.
    अवतरणे:
    १) "कबीर-फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापासून गॉर्की, श्‍वाइत्झर, लेनिन, मार्क्‍स, दक्षिण आफ्रिकेतली वर्णवादाची लढाई... एकेक पुस्तक वाचताना मनावरच ओझं हलकं होत होतं. आयुष्यभराच्या संघर्षाची पाळंमुळंही इथल्या विषमतावादी जातीय व्यवस्थेत आहेत, याची प्रचिती येत होती. ही व्यवस्थाच बदलली पाहिजे, अशी दिवास्वप्नं पडायची. कधी कधी संताप यायचा."
    More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) • पहा:चर्चा:सुषमा अंधारे
  3. ^ "कराडमध्ये समतावादी सा.संमेलन -Maharashtra Times". Maharashtra Times. 2010-12-14. 2018-03-16 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.esakal.com/esakal/20091207/5598677901593134836.htm
  5. ^ http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg
  6. ^ "AMAR HABIB : किसानपुत्र आंदोलन: कविता संग्रहांची यादी". AMAR HABIB. 2010-06-09. 2018-03-16 रोजी पाहिले.
  7. ^ http://www.esakal.com/esakal/20130126/5589279374426294115.htm