Jump to content

चर्चा:सुषमा अंधारे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जन्म तारीख आणि शिक्षण

[संपादन]
"प्रा सुषमा अंधारे - अल्पपरिचय
जन्म - 8 नोव्हेंबर 1979
शिक्षण - एम ए बि एड पिएचडी"
उपरोक्त सही न केलेला प्रतिसाद विशेष:योगदान/136.185.109.232 या अंकपत्त्याच्या योगदानान्वये आला असावा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:५५, २२ जुलै २०१५ (IST)[reply]
@, Adinath kapale, आणि Salveramprasad: आणि अंकपत्ता 136.185.109.232
आंतरजालावरील उपलब्ध माहितीतील अपूर्णता अथवा अंशत: तफावतीमुळे लेखात दिलेल्या माहितीचा नेमकेपणाची खात्री करण्याची आवश्यकता आहे असे प्रथमदर्शनी जाणवते.
१) विशेष:योगदान/136.185.109.232 अंकपत्ता म्हणत असलेल्या २००९ विधानसभा निवडणूकीतील शपथपत्रात वय ३३ वर्षे असल्याचा उल्लेख आहे. इ.स. २००९ उणे ३३ वर्षे केले असता जन्म वर्ष १९७६ ला जाण्याचा संभव आहे जे की विशेष:योगदान/136.185.109.232 म्हणत असलेल्या १९७९ पासून वेगळे आहे[काळ सुसंगतता?]. त्यामुळे या संदर्भात उपलब्ध संदर्भाची खात्री पटवली जाण्यासाठी अद्यापही उपलब्ध संदर्भांची पुर्नपडताळणी अथवा वेगळ्या दुजोऱ्याची आवश्यकता आहे. असे प्रथमदर्शनी वाटते.
२) त्यांच्या Phd च्या वर्षाच्या संदर्भाने मी आंतरजालावर द्रूत शोध घेतला त्यात २००९ सालचे अफेडेव्हीट Phd साठीची केवळ नोंदणी झाल्याचा उल्लेख करते. डॉ.आ.ह. साळुंखे यांच्या (ब्लॉग)साइटवरील सुषमा अंधारे यांचा २०१०चा एक लेख छोट्या प्रबंधाची प्रस्तावना अथवा समारोपा सारखा वाटतो पण त्या लेखात त्यांचा उल्लेख डॉ. असा झालेला नाही. अंदाजे २०१३ पासून डॉ. असे उल्लेख वृत्तपत्रीय लेखात दिसत आहेत. पण वर्षांचे उल्लेख अंशत: मागे पुढेतर होत नाहीएत असे वाटत राहीले. २०१०चा लेख त्यांच्या Phd प्रबंधाचा भाग आहे का ? किंवा त्यांचे Phd प्राप्त होण्याचे वर्ष आणि Phd प्रबंधाचा विषय या बद्दल अधिक माहिती उपलब्ध होऊ शकल्यास लेखातील माहिती नेमकी आणि अद्ययावत करणे सोपे जाईल.
३) २००९ विधानसभा निकाल बाबत आंतरजालावर उपलब्ध या pdf दस्तएवज पृष्ठक्रमांक ३८३ अनुसार प्रा. (डॉ.) 'अंधारे सुषमा दगडू' यांचे नाव क्रमांक ७ वर दिले असले तरी दस्तएवजात दिलेल्या मतमोजणीनुसार ४४९ मते (०.२७ टक्के) घेऊन ९ व्या क्रमांकावर दिसते. (चु.भू.दे.घे.) तेव्हा लेखातील सध्याच्या माहितीशी हि माहिती जुळत नाही. तेव्हा माहिती इतर माहिती दस्तएवज पडताळून माहितीत सुयोग्य सुधारणा करावी.
दुव्यातील दस्तएवजातील माहिती बरोबर असल्यास लेखातील वाक्य, सन २००९ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे पालवे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्या निवडणूकीत पराभव झाला. एवढेच वाक्य ठेवावे असे सूचवावेसे वाटते.
आपणा सर्वांच्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:२६, २३ जुलै २०१५ (IST)[reply]
२००९ मध्ये येथील शपथ पत्रात त्यांचे वय ३३ वर्षे असे दिलेले असून, एबीपी माझा (व्हिडिओ) वरील ८ ऑक्टोबर २०२२ च्या मुलाखतीत त्यांनी आपली जन्म तारीख ८ नोव्हेंबर १९८४ अशी सांगितली असून ही बातमी मटा सहित अनेक वृत्तपत्रात छापून आलेली आहे.-संतोष गोरे ( 💬 ) १०:३९, १४ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]

सुषमा अंधारे यांच्या विषयीच्या लेखातील संदर्भ आणि विकिकरण

[संपादन]

सुषमा अंधारे यांच्या लेखात दैनिक सकाळ सप्तरंग पुरवणी मधील त्यांच्या 'मी कात टाकली' स्तंभाच्या १३ जानेवारी २०१३ च्या लेखाचा हा संदर्भ दिला आहे (मी सुद्धा सध्या तो संदर्भ वापरला आहे परंतु,). हा लेख ललित लेखन शैलीने असल्यामुळे त्यात त्यांनी त्रयस्थ 'सारंगी' नावाच्या व्यक्तीरेखेची माहिती दिली आहे की त्यात त्यांच्या स्वत: विषयीच्या आत्मकथनाचाही समावेश आहे ? हे अद्याप पुरेसे स्पष्ट होऊ शकले नाही. (सुस्प्ष्टता नसल्यामुळे तुर्तास काही माहिती वगळावीही लागली आहे, तरीपण ज्ञानकोशीय परिघात संबंधीत लेखास जमेल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, लेखन करण्यासाठी त्यांच्या बद्दल शोध घेताना, आंतरजालावर पुरेशा सुस्प्ष्ट नोंदी आणि संदर्भांचा अभाव जाणवतो आहे.)

दैनिक सकाळ मधील नातं मातीचं, नातं मातेचं! लेख पुन्हा एकदा तपासून त्या लेखात सुषमा अंधारे यांच्या स्वत: विषयी काही माहिती आहे अथवा नाही याची खात्रीशीर सुस्पष्ट माहिती मिळाल्यास जाणकारांनी कळवावे.

त्या शिवाय आंतरजालावर शोध घेतला असता सुषमा अंधारे हे नाव परळी आणि पुणे या दोन ठिकाणचे दिसते आहे, या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का वेगवेगळ्या या विषयी दुजोरा हवा आहे. त्या शिवाय लेखात आधी दिलेल्या जन्मवर्षा पेक्षा वेगळे जन्मवर्ष लेखाच्या चर्चा पानावर कुणीतरी नोंदविले आहे. त्या माहितीची सुद्धा पडताळणी आणि दुरुस्ती केली जाण्याची आवश्यकता आहे.


@:

सुषमा अंधारे यांच्या बद्दल जाणकारांसाठी अधीक माहितीची विनंती दिली आहे. मी या लेखात संदर्भ विचारपूर्वक देतो आहे, (बहुधा अन्वधानाने) आपल्याकडून संदर्भांची मोडतोड घडते आहे या संदर्भात आपण अत्याधीक घाई टाळल्यास लेखाचे ज्ञानकोशीय स्वरुप टिकवण्याच्य दृष्टीने अधीक साहाय्यकारक राहील.

दुसरे त्यांच्या 'शापित पैंजन' या काव्य संग्रहाच्या नावात, (सध्या उपलब्ध संदर्भानुसार) बहुधा 'न' च असण्याची शक्यता अधीक आहे, विशेषनामात 'न' चा 'ण' हे प्रमाणीकरण परस्पर लादण्याची तुर्तास आवश्यकता नसावी.

धन्यवाद आणि शुभेच्छा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:०४, २० जुलै २०१५ (IST)[reply]

सुषमा अंधारे यांनी उल्लेखीलेले खानोलकर कोणते ?

[संपादन]

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या शोध निबंधातील विचार विमर्शात खानोलकरांचा उल्लेख केला आहे ते खानोलकर नेमके कोणते; गंगाधर देवराव खानोलकर की चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४५, २० जुलै २०१५ (IST) ---[reply]

शापित पैंजण

[संपादन]

पहा - कवितासंग्रहांची यादी .... (चर्चा) १३:०९, २० जुलै २०१५ (IST)[reply]

@: मी अमर हबिब यांचाही दुवा पाहीलेला होता पण आणखी एका अंबेजोगाइच्या दुसऱ्या एका ग्रंथालयाच्या यादीत 'शापित पैंज ' आहे. याबाबत सांशक असल्यामुळे मी [ दुजोरा हवा] हा साचा लावला आणि माहितीतल्या संदिग्धता आणि विसंगतींचे एकुण प्रमाण पाहता संदर्भ हवा आणि दुजोरा हवा साचे काढण्याची घाई करू नये असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३८, २० जुलै २०१५ (IST)[reply]

नमस्कार.
मी इथे लिहायला अगदीच नवखी आहे. लिहिण्याचे नियम मला निटसे माहित नाहीत. परंतु सुषमा अंधारे यांना जवळून ओळखत असल्याने लिहावेसे वाटले. त्यांचे जन्मवर्ष 8 नोव्हेंबर 1979. शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह कोल्हाटी जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे. शिवाय सकाळ मधील नातं मातीचं नातं मातेचं हा लेख म्हणजे त्यांच्या आत्मकथनाचाच भाग होय.
उपरोक्त सही न केलेला प्रतिसाद विशेष:योगदान/136.185.109.232 या अंकपत्त्याच्या योगदानान्वये आला असावा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:११, २३ जुलै २०१५ (IST)[reply]
@ विशेष:योगदान/136.185.109.232
दैनिक लोकसत्ताच्या या लेखामध्ये सुषमा अंधारे यांच्या विचारांबद्दल एक परिच्छेद आहे. त्या परिच्छेदातील सुयोग्य अंश सुषमा अंधारे#सुषमा अंधारे यांचे साहित्य आणि विचार अथवा दलित स्त्रीवाद मध्ये (टंकीत करून) लेख अद्ययावत करण्यात आपले साहाय्य मिळाल्यास आभारी राहीन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०२:०६, २३ जुलै २०१५ (IST)[reply]

नमस्कार आपल्या सकारात्मक प्रतिसादा बद्दल धन्यवाद. सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र 2006मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. 2009ते 2010 या काळात मुंबई हून प्रकाशीत होणाऱ्या दै लोकनायक या आंबेडकरी चळवळी च्या वृत्तपत्रात पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून ही काम पाहिले आहे. याशिवाय पिएचडी साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय " भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण" असा आहे.

हिंदुत्ववादी

[संपादन]

@Shreyas190: तुम्ही सातत्याने या लेखामध्ये पुरोगामी शब्द काढून "हिंदुत्ववादी" शब्द जोडत असतात. यासाठी तुम्ही कोणताही ठोस संदर्भ दिला नाही, केवळ एका भाषणाचा उल्लेख करीत आहात, जो की त्यांना हिंदुत्ववादी ठरवण्यास अपात्र आहे. यापुढे लेखात हिंदुत्ववादी हा शब्द जोडू नये, ही विनंती वजा सुचना मी तुम्हाला करीत आहे. --संदेश हिवाळेचर्चा ११:१९, १० नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]