सदस्य चर्चा:Usernamekiran

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य चर्चा:KiranBOT II या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कामाची पावती[संपादन]

हल्ली कोणी कोणाला असे बार्नस्टार देताना फारसे दिसत नाहीत. पण आपण अल्पावधीत केलेल्या कामाबद्दल हा स्टार. बॉट कसा वापरावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपण सामान्य सदस्यांचे ऐकता, कंपूबाजी न करता त्यांना विश्वासात घेता, विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देता हे सर्व माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. Shantanuo (चर्चा) १२:४७, ५ एप्रिल २०२२ (IST)[reply]

शुद्धिचिकित्सक बॉटसाठी
Gnome-edit-redo.svgShantanuo: खूप खूप धन्यवाद. पण botचा जवळपास ९८% code आधीच तयार होता, त्यात मी फक्त २% वाढवला. आणि खरं तर मराठी विकिपीडियावर bot ची केवळ तांत्रिक प्रोग्रामिंग मी केली, त्यातील जास्तीत जास्त शब्द तुम्हीच सुचवले. ह्याव्यतिरिक तांत्रिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही खूप मदत केली. मी काही दिवसांपूर्वीच तुम्हाला औपचारिकरीत्या धन्यवाद म्हणणार होतो, पण राहून गेलं. मी त्यामध्ये तुम्ही म्ह्टल्याप्रमाणेच म्हणणार होतो कि स्वतःचा काही फायदा/हेतू नसतानासुद्धा तुम्ही भरपूर मदत केलीत. ह्याचा मी खूप आदर करतो.
मी मराठी विकिपीडियावर सक्रियरित्या कार्यरत नसलो तरी गेल्या २-३ वर्षांपासून मी mrwiki बघतोय. सध्या हेतू नसताना कार्य करणारे केवळ १० ते १५ संपादक आहेत, पण ते किती दिवस टिकतील त्याचा नेम नाही.
विकिपीडिया हा आपल्या सगळ्यांचाच आहे. मला वाटते त्यामध्ये कंपूबाजी नसावी. पारदर्शकता खूप महत्वाची आहे. तुमच्या मदतीसाठी पुन्हा एकदा आभार. —usernamekiran (talk) १५:१०, ५ एप्रिल २०२२ (IST)[reply]

शुद्धलेखनाचा बार्नस्टार[संपादन]

Grammar-star.png शुद्धलेखनाचा बार्नस्टार
किरणबॉट द्वारे केलेल्या अविरत परिश्रमाबद्दल.- संतोष गोरे ( 💬 ) २१:३९, १७ एप्रिल २०२२ (IST)[reply]