परळी विधानसभा मतदारसंघ
Appearance
परळी विधानसभा मतदारसंघ - २३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यातील
- परळी तालुका आणि
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. परळी हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] हा मतदारसंघ इ.स. २००९ साली अस्तित्वात आला. त्याआधी याचा बहुतांश भाग रेणापुर विधानसभा मतदारसंघत मोडत असे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री.धनंजय पंडितराव मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
वर्ष | आमदार[५] | पक्ष | |
---|---|---|---|
२०२४ | धनंजय मुंडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१९ | धनंजय पंडितराव मुंडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | पंकजा मुंडे-पालवे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | पंकजा गोपीनाथराव मुंडे | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
परळी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
पंकजा गोपीनाथ मुंडे | भाजप | ९६,२२२ |
प्राध्यापक टी.पी. उर्फ त्र्यंबक पाटलोबा मुंडे | काँग्रेस | ६०,१६० |
संजय संतराम वाव्हळे | बसपा | ३,६६२ |
माधव लिंबराव जाधव | शिपा | १,९१५ |
शेख लाल शेख मिस्किन | अपक्ष | १,६८३ |
रामराव शेशेराव नागरगोजे | रिपाई (A) | १,१४४ |
दत्ता किसनराव दहिवळ | अपक्ष | ८१६ |
बाजीराव शंकर काळे | अपक्ष | ८०० |
सुशमा दगडू अंधारे | अपक्ष | ४४९ |
संजय नाज्ञानोबा रोडे | प्ररिप | ३२५ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ [परळी वैजनाथ "परळी विधानसभा मतदार संघ"] Check
|url=
value (सहाय्य). - ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |