तलाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तलाक हा इस्लाममधील घटस्फोट होय.

तलाकची प्रक्रिया पती किंवा पत्नी सुरू करु शकतात. याचे मुख्य पारंपारिक प्रकार तलाक (अस्वीकार), खुल् (परस्पर संमतीने), न्यायाला धरून आणि शपथ घेउन केलेला घटस्फोट होय. इस्लामिक जगातील घटस्फोटांची धारणा वेळ आणि स्थानानुसार वेगळी वेगळी दिसून येते. भूतकाळात, घटस्फोटांचे नियमन शरिया तथा पारंपारिक इस्लामिक न्यायशास्त्राद्वारे द्वारे होत होते. ऐतिहासिक पद्धती काहीवेळा कायदेशीर सिद्धांतापासून वेगळ्या दिसून येतात. आधुनिक काळात, वैयक्तिक स्थिती (कौटुंबिक) कायद्याची संहिताबद्धतेमुळे बदलताना दिसते.