उस्मानाबाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उस्मानाबाद जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraOsmanabad.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय उस्मानाबाद
तालुके उस्मानाबादतुळजापूरउमरगालोहाराकळंबभूमवाशीपरांडा
क्षेत्रफळ ७,५१२ चौरस किमी (२,९०० चौ. मैल)
लोकसंख्या १६,६०,३११ (२०११)
लोकसंख्या घनता २२१ प्रति चौरस किमी (५७० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६.३३%
लिंग गुणोत्तर १.०८ /
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ उमरगा विधानसभा मतदारसंघउस्मानाबाद विधानसभा मतदारसंघतुळजापूर विधानसभा मतदारसंघपरांडा विधानसभा मतदारसंघ
खासदार ओमराजे निंबालकर
संकेतस्थळ


हा लेख उस्मानाबाद जिल्ह्याविषयी आहे. उस्मानाबाद शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. हैदराबादच्या 7 वा निजाम मीर उस्मान अली खान च्या सन्मानार्थ उस्मानाबादचे नाव देण्यात आले. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे.तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे .

जिल्ह्याचे भौगोलिक स्थान[संपादन]

अक्षांश : १७.३५ ते १८.४० उत्तर रेखांश : ७५.१६ ते ७६.४० पूर्व.

उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे.उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाडयात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात.उस्मानाबादच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत.जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे.जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).[१]

जिल्ह्याचे हवामान[संपादन]

जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.


जिल्ह्यातील तालुके[संपादन]

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे[संपादन]

उस्मानाबाद हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले दर्गा शहरातील मध्य भागी आहे दर वर्षी येथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक पर राज्यातुचन व विदेशातुन ऊर्सा साठी येतात

  • तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.
  • कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
  • परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे उस्मानाबाद पासून १५ कि. मी.श्रीक्षेत्र रुईभर येथे दत्तमहाराजांचं एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे.
  • रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते उस्मानाबाद पासून 20 KM च्या अंतरावर सोलापुर औरंगाबाद या रोडवरील येडशी या गावात आहे.येथे दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे.श्रावन महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात.तसेच भरपूर पाउस पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षन ठरू शकते.तसेच या प्रदेश हा डोंगराल प्रदेश आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वनराई आहे.त्यामुले या प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
  • इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर,श्री दत्तमंदिर, तसेच नळदुर्ग येथील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे.

तसेच तेर (ता. उस्मानाबाद) येथील पुराणवस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट

उस्मानाबाद येथील हातलाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.उस्मानाबाद जिल्हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट[संपादन]

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ५४ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ गट आहेत.

 • पारगाव  • पारा  • वाशी  • तेरखेडा

 • कानेगाव  • माकणी  • सास्तूर  • लोहारा  • जेवळी

 • ईटकूर  • डिकसळ  • नायगाव  • शिराढोण  • खामसवाडी  • मोहा  • येरमाळा

 • कवठा  • बलसूर  • दाळींब  • येणेगूर  • गुंजोटी  • आलूर  • कदेर

 • ढोकी  • पळसप  • कोंड  • तेर  • येडशी  • अंबेजवळगा  • उपळा  • सांजा  • पाडोळी  • केशेगाव  • बेंबळी  • वडगाव

 • ईट  • पाथरूड  • वालवड  • माणकेश्‍वर

 • लोणी  • डोंजा  • शेळगांव  • अनाळा  • जवळा

 • सिंदफळ  • काक्रंबा  • मंगरूळ  • काटी  • काटगाव  • अणदूर  • जळकोट  • नंदगाव  • शहापूर

वाहतूक[संपादन]

 राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 - हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 - गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो

 उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत

 उस्मानाबाद जिह्यात एस. टी. ची उत्तम वाहतूक आहे. उस्मानाबाद च्या मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. उस्मानाबाद बसस्थानका वरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते  उस्मानाबाद येथून अन्य राज्यातील मुख्यालये आणि प्रमुख शहरे पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत

संदर्भ[संपादन]