कळंब तालुका (उस्मानाबाद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कळंब तालुका (उस्मानाबाद)
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१८° ३१′ १२″ N, ७६° ००′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ उस्मानाबाद
तहसील कळंब तालुका (उस्मानाबाद)
पंचायत समिती कळंब तालुका (उस्मानाबाद)
कोड
पिन कोड

• ४१३५०७


कळंब तालुका (उस्मानाबाद) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्याच्या उत्तर भागातून मांजरा नदी वाहते. बीड व उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे.या मांजरा नदीला वाशिरा ही प्रमुख नदी मिळते. तसेच तेरणा नदीही या तालुक्यातून वाहते. कळंब शहर मांजरा नदीच्या तीरावर वसले असून याच नदीवर मांजरा धरण बांधण्यात आले आहे. या धरण भरल्यानंतर जलाशयाचे बॅकवॉटर कळंब शहरापर्यंत येते. कळंब शहर हे कपडा बाजारासाठी प्रसिद्ध असून शहरात नामांकित वस्त्रदालने आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून कळंब बाजार समितीची ओळख आहे. तालुका खाजगी साखर कारखानदारीत नावलौकिकप्राप्त असून रांजणी, हावरगाव व चोराखळी येथे खाजगी साखर कारखाने तर वाठवडा येथे गूळपावडर उद्योग उभारण्यात आला आहे. कळंब शहरातुन निघनारी शिवजयंती ही राज्यात प्रसिद्ध आहे येथिल शिवजयंती पाहण्यासाठी शेजारील जिल्ह्यातुन देखील लोक येतात.

》तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट  • इटकूर  • डिकसळ  • नायगाव  • शिराढोण  • खामसवाडी  • मोहा  • येरमाळा

》तालुक्यातील महसूल मंडळे १)इटकूर. २)मोहा ३) येरमळा ४) शिराढोण ५) कळंब ६)गोविंदपूर

》तालुक्यातील आरोग्य सुविधा.. ग्रामीण रूग्णालये -

  • कळंब
  • शिराढोण..प्रस्तावित

प्राथमिक आरोग्य केंद्रे - १)इटकूर २) मोहा ३)येरमळा ४)मंगरूळ ५) दहिफळ ६)शिराढोण

आरोग्य उपकेंद्रे----२७

आपत्कालीन सेवा १०८...येरमळा, शिराढोण..

पोलिस ठाणी...५ :-

  • उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,. कळंब
  • कळंब...पोलिस ठाणे
  • शिराढोण पोलिस ठाणे
  • येरमाळा पोलिस ठाणे
  • येरमाळा महामार्ग पोलिस ठाणे
कळंब is located in India
कळंब
कळंब
कळंब (India)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके
उस्मानाबाद | तुळजापूर | उमरगा | लोहारा | कळंब | भूम | वाशी | परांडा