कोल्हाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोल्हाटी ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात आहे. कर्नाटकात आणि मध्य प्रदेशातही त्यांची वस्ती आढळते, पण प्रदेशानुरूप त्यांच्यात भेद आहेत. महाराष्ट्रात यांना कबुतरी, खेळकरी, डोंबारी, दांडेवाले, बांसबेरिया वगैरे नावांनी ओळखतात. खंडोबा, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा या त्यांच्या देवता आहेत.

कोल्हाटी लोकांमध्ये काठे, दांडेकर, दुर्वे, देवळकर, निकनाथ, पाटेकर, लाखे, सोनटक्के आदी आडनावे असतात.

कोल्हाटी जमात अनेक जमातींच्या मिश्रणाने बनलेली आहे. यांच्यात मुख्य पोटभेद नऊ आहेत; ते म्हणजे मराठा, गुजराती, आरे, गोपाळगणी, डुकरे ऊर्फ पोटरे, पाल ऊर्फ काणे, वळे ऊर्फ वळियार, हरका . कोल्ह्याट्यात पश्चिम महाराष्ट्रात राहणारी माळी किंवा लाखे कोल्हाटी व विदर्भ-मराठवाड्यातील भातू कोल्हाटी हे प्रमुख प्रकार आहेत.

माळी कोल्ह्याट्यात मुलींची लग्ने होतात. काही कोल्हाट्यांना त्यांच्या कसरती कामातील नैपुण्यामुळे पेशव्यांनी इनामी जमिनी दिल्या आहेत. नृत्य, गायन व तमाशा यांमध्ये कोल्हाटणी भाग घेतात..

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

किशोर शांताबाई काळे

यमुनाबाई वाईकर

मधु कांबीकर

राजश्री नगरकर

सुषमा अंधारे पहा : भटके कलावंत आणि भिक्षेकरी

बाह्य दुवे[संपादन]

कोल्हाटी