सिंधुदुर्ग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंधुदुर्ग जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraSindhudurg.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरस
तालुके १.सावंतवाडी तालुका, २.कणकवली तालुका, ३ कुडाळ तालुका, ४. देवगड तालुका,५. दोडामार्ग तालुका, ६. मालवण तालुका,७. वेंगुर्ला तालुका, ८ वैभववाडी तालुका
क्षेत्रफळ ५,२०७ चौरस किमी (२,०१० चौ. मैल)
लोकसंख्या ८,४८,८६८ (२०११)
लोकसंख्या घनता १६३ प्रति चौरस किमी (४२० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १२.६%
साक्षरता दर ८६.५४%
लिंग गुणोत्तर १.०५ /
प्रमुख शहरे मालवण, कणकवली
जिल्हाधिकारी ई. रवींद्रन
लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ सावंतवाडीकणकवलीकुडाळ
खासदार विनायक राऊत
पर्जन्यमान ३,२८७ मिलीमीटर (१२९.४ इंच)
संकेतस्थळ


हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.

इतिहास[संपादन]

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा आधी रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवण्यात आलं. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

चतुःसीमा[संपादन]

जिल्ह्यातील तालुके[संपादन]

मासेमारी[संपादन]

सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि. मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. प्रमुख मासेमारी बंदरे (८) - विजयदुर्ग, देवगड, आचार, मालवण, सर्जेकोट, कोचरा, वेंगुर्ला आणि शिरोडा. मच्छिमार लोकसंख्या - २५३६५ उत्पादन - १९२७३ मे. ट. मच्छिमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 • सिंधुदुर्ग किल्ला
 • विजयदुर्ग किल्ला
 • कुणकेश्वर मंदिर देवगड
 • सुवर्ण गणेश मंदिर मालवण
 • आंबोली थंड हवेच ठिकाण
 • देवगड किल्ला व दिपगृह
 • राजवाडा सावंतवाडी
 • तेरेखोल किल्ला
 • आचार खाडी (बेकवाटर)
 • संत राऊळ महाराज मठ कुडाळ

समुद्र किनारे[संपादन]

 • पुरळ, देवगड
 • मिठबांव, देवगड
 • आचरा, मालवण
 • तारकर्ली, मालवण
 • चिवला राजकोट, मालवण
 • देवबाग, मालवण
 • निवती, वेंगुर्ला
 • भोगवे, वेंगुर्ला