"चिंतामणी त्र्यंबक खानोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १२२: | ओळ १२२: | ||
==बाहय दुवे== |
==बाहय दुवे== |
||
* [http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Arati_Prabhu चि.त्र्यं खानोलकरांची ‘आठवणीतील गाणी‘वरील गीते] |
|||
* [http://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=772 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावरील {{लेखनाव}} यांची माहिती] |
* [http://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=772 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावरील {{लेखनाव}} यांची माहिती] |
||
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2983265.cms महाराष्ट्र टाइम्स - कवितेच्या गावातला वेडापीर - आरती प्रभू] |
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2983265.cms महाराष्ट्र टाइम्स - कवितेच्या गावातला वेडापीर - आरती प्रभू] |
२३:५८, ३ मार्च २०१२ ची आवृत्ती
आरती प्रभू | |
---|---|
जन्म नाव | चिंतामणी त्र्यंबक खानोलकर |
टोपणनाव | आरती प्रभू |
जन्म | मार्च ८, इ.स. १९३० |
मृत्यू | एप्रिल २६, इ.स. १९७६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | कवी |
साहित्य प्रकार | कविता, कादंबरी |
वडील | त्र्यंबक खानोलकर |
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स. १९३०- एप्रिल २६, इ.स. १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणाऱ्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज'मधे छापण्यास पाठवून दिल्या. 'मौज'च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना ...
खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.
कुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या.
प्रकाशित साहित्य
- अजगर (कादंबरी, १९६५)
- अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
- अभोगी (नाटक)
- अवध्य (नाटक, १९७२)
- आपुले मरण
- एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६)
- कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२)
- कोंडुरा (कादंबरी, १९६६)
- गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
- चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
- जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
- त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
- दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
- नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
- पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
- पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
- रखेली (नाटक)
- राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
- रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
- श्रीमंत पतीची राणी (नाटक)
- सगेसोयरे (नाटक, १९६७)
- सनई (कथा संग्रह, १९६४)
- हयवदन (नाटक)
अप्रकाशित नाटके
१. अंधा युग(अनुवाद) २. असाही एक अश्वत्थामा ३. आई ४.आषाढातला एक दिवस ५. इस्तू जागा ठेव ६. एकनाथ मुंगी ७. एका नाटकाचा अंत ८. एका भुताचे भागधेय ९. एका राघूची गोष्ट १०. गुरू महाराज गुरू ११. चव्हाटा १२. थंडीच्या एका रात्री १३. दायित्व (अनुवाद) १४. देवाची आई(केळीचे सुकले बाग) १५. देवाचे पाय १६. पुनश्च एक बॉबी १७. प्रतिमा १८. प्रेषित १९. भूत कोण माणूस कोण? २०.माकडाला चढली भांग २१. येईन एक दिवस २२. रात सवतीची २३. ललित नभी चार मेघ २४. विखाराणी २५. शाल्मली २६. श्रीरंग प्रेमरंग २७. होती एक शारदा.
गाजलेली भावगीते
- कसे? कसे हासायाचे
- गेले द्यायचे राहून
- ती येते आणिक जाते
- दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभही
- नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
- ये रे घना ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना
- विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण
- समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
- ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन् शुद्ध व्हा.
गाजलेली चित्रपटगीते
- कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (चित्रपट : सामना)
- तुम्ही रे दोन, दोनच माणसं (चित्रपट : चानी)
- तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी (चित्रपट : निवडुंग)
- तो एक राजपुत्र, मी एक रानफूल (चित्रपट : चानी)
- बंद ओठांनी निघाला, पेटलेला एकला (चित्रपट : सर्वसाक्षी)
- मीच मला पाहते, पाहते आजच का (चित्रपट : यशोदा)
- लवलव करी पात, डोळं नाही थार्याला (चित्रपट : निवडुंग).
पुरस्कार
१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे'साठी.
बाहय दुवे
- चि.त्र्यं खानोलकरांची ‘आठवणीतील गाणी‘वरील गीते
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावरील चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांची माहिती
- महाराष्ट्र टाइम्स - कवितेच्या गावातला वेडापीर - आरती प्रभू