"दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ९: | ओळ ९: | ||
==विख्यात समीक्षक== |
==विख्यात समीक्षक== |
||
प्राचीन ते अर्वाचीन अशा दीर्घ पटावर पसरलेल्या मराठी वाङ्मय प्रवाहाचे एक मर्मज्ञ व विचारवंत भाष्यकार, मराठी भाषा आणि साहित्याचे व्रतस्थ-निष्ठावंत अध्यापक, वाङ्मयविश्वातील नवागतांचे मार्गदर्शक, नितांतसुंदर वक्ते म्हणून दभि ख्यात होते. १९६० नंतरची जवळजवळ गेली पाच दशके हा दभिंचा साहित्यप्रवास होता. |
प्राचीन ते अर्वाचीन अशा दीर्घ पटावर पसरलेल्या मराठी वाङ्मय प्रवाहाचे एक मर्मज्ञ व विचारवंत भाष्यकार, मराठी भाषा आणि साहित्याचे व्रतस्थ-निष्ठावंत अध्यापक, वाङ्मयविश्वातील नवागतांचे मार्गदर्शक, नितांतसुंदर वक्ते म्हणून दभि ख्यात होते. १९६० नंतरची जवळजवळ गेली पाच दशके हा दभिंचा साहित्यप्रवास होता. |
||
कादंबरीची समीक्षा करताना ‘स्वामी’, ‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबऱ्यांतील त्रुटीही त्यांनी दाखवल्या तर फडके आणि खांडेकरांच्या मर्यादाही. (कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा) आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, माधवी देसाई आदींच्या आत्मचरित्रांच्या निमित्ताने आत्मचरित्र या लेखनप्रकाराचे नवे आकलन दभिंनी केले (पस्तुरी). |
|||
ओळ ४४: | ओळ ४६: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
==द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य== |
==द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य== |
१४:१०, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (जुलै २५, १९३४ - मृत्यू : २७ जानेवारी, इ.स. २०१६) हे मराठी कवी व साहित्य समीक्षक आहेत. नागपूर विद्यापीठाचे ते १९६८ सालचे पीएच.डी. आहेत. विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.
अध्यापन
१९६४ ते १९९४ अशी ३१ वर्षे नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात दद. भि. कुलकर्णी यांनी मराठीच्या अध्यापनाचे कार्य केले. नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदीपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले.
सुरुवात
१९५५च्या सुमारास मराठी कवितेवरील "आई : दोन कविता‘ हे तुलनात्मक टिपण दभिंनी वयाच्या विशीतच लिहिले व पु. शि. रेगेंच्या "छंद‘मध्ये ते प्रकाशित झाले. पुढे ते समीक्षक म्हणून विख्यात झाले, तरी शालेय-महाविद्यालयीन जीवनात कथा, कविता व लघुनिबंध यांच्या रूपाने त्यांनी प्रारंभीची साहित्यनिर्मिती केली.
विख्यात समीक्षक
प्राचीन ते अर्वाचीन अशा दीर्घ पटावर पसरलेल्या मराठी वाङ्मय प्रवाहाचे एक मर्मज्ञ व विचारवंत भाष्यकार, मराठी भाषा आणि साहित्याचे व्रतस्थ-निष्ठावंत अध्यापक, वाङ्मयविश्वातील नवागतांचे मार्गदर्शक, नितांतसुंदर वक्ते म्हणून दभि ख्यात होते. १९६० नंतरची जवळजवळ गेली पाच दशके हा दभिंचा साहित्यप्रवास होता.
कादंबरीची समीक्षा करताना ‘स्वामी’, ‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबऱ्यांतील त्रुटीही त्यांनी दाखवल्या तर फडके आणि खांडेकरांच्या मर्यादाही. (कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा) आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, माधवी देसाई आदींच्या आत्मचरित्रांच्या निमित्ताने आत्मचरित्र या लेखनप्रकाराचे नवे आकलन दभिंनी केले (पस्तुरी).
दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी | |
---|---|
जन्म नाव | दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी |
जन्म |
२५ जुलै,१९३४ नागपूर (महाराष्ट्र) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | समीक्षा |
प्रसिद्ध साहित्यकृती | पहिली परंपरा, दुसरी परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, पार्थिवतेचे उदयास्त, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना वगैरे. |
वडील | भिकाजी |
पत्नी | शिवरंजनी |
अपत्ये | अभिनंदन |
पुरस्कार | महाराष्ट्र शासन पुरस्कार,१९८३, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार १९९७ |
द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य
- अंतरिक्ष फिरलो पण..
- अन्यनता मर्ढेकरांची
- अपार्थिवाचा यात्री
- अपार्थिवाचे चांदणे (आठवणी)
- कादंबरी : स्वरूप व समीक्षा
- चौदावे रत्न
- जीएंची महाकथा
- जुने दिवे, नवे दिवे (ललित लेख)
- दुसरी परंपरा
- देवदास आणि कोसला
- द्विदल
- पस्तुरी
- पहिली परंपरा
- पहिल्यांदा रणांगण
- पार्थिवतेचे उदयास्त,
- पोएट बोरकर
- प्रतीतिभेद
- बालकांचा बगीचा (बालवाङ्मय)
- मराठी वाङ्मयाचा इतिहास (४ खंड)
- मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
- महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
- मेरसोलचा सूर्य (कवितासंग्रह)
- युगास्त्र
- समीक्षेची चित्रलिपी
- समीक्षेची वल्कले
- समीक्षेची सरहद्द
- सुरेश भट - नवे आकलन
- स्फटिकगृहीचे दीप
- बालकांचा बगिचा
- हिमवंतीची सरोवरे
- हिमवंतीची शिखरे (?)
- ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती
- ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद
गौरव
- नागपूर विद्यापीठाचे ना.के. बेहेरे सुवर्णपदक
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, पुणे, मार्च २०१०
पुरस्कार
- न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
- १९८३मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डी.लिट.शी समकक्ष असलेली 'साहित्य वाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
- महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
- कादंबरी : स्वरूप व समीक्षा"ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
- पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार, २००७
- 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे.
संकीर्ण
- डॉ. द.भि.कुलकर्णी हे कारंजा लाड येथे १९९०मध्ये आणि नागपूर येथे १९९१ मध्ये झालेल्या विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदी होते.
- २०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. द.भि.कुलकर्णी होते.
- डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.
- श्यामला मुजुमदार यानी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा ’द.भि. कुलकर्णी गौरवग्रंथ’ लिहिला आहे.
- डॉ. द.भि. कुलकर्णी यांचा गौरव करणारा ’सप्तपर्णी स्त्रीसंवेदन’ नावाचा एक ग्रंथ आहे. त्याचे संपादन स्मिता लाळे यांनी केले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |