"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ६७: | ओळ ६७: | ||
* हनुमान टेकडी |
* हनुमान टेकडी |
||
'''नद्या आणि नाले ''' |
'''नद्या, तलाव, हौद आणि नाले ''' |
||
* |
* आंबील ओढा |
||
* इंद्रायणी |
* इंद्रायणी |
||
* करपे तलाव(हा कॉंग्रेस हाउससमोर होता) |
|||
* कात्रजचा तलाव |
* कात्रजचा तलाव |
||
* पेशवेकालीन कात्रजचा पाट |
* पेशवेकालीन कात्रजचा पाट |
||
* खडकवासला उजवा कालवा |
* खडकवासला उजवा कालवा |
||
* टिळक तरणतलाव |
|||
* देव नदी |
* देव नदी |
||
* नाग नदी |
* नाग नदी |
||
ओळ ८५: | ओळ ८७: | ||
* मुळा नदी |
* मुळा नदी |
||
* भैरोबा नाला |
* भैरोबा नाला |
||
* शाहू तरणतलाव |
|||
* शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले) |
|||
* सदाशिव पेठ हौद |
* सदाशिव पेठ हौद |
||
* साततोटी हौद |
|||
* सारसबाग तळे |
|||
=== पेठा === |
=== पेठा === |
||
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून ठेवली गेली आहेत. पुण्यातील पेठांची नामावली अशी:</br> |
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून ठेवली गेली आहेत. पुण्यातील पेठांची नामावली अशी:</br> |
||
[[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]], [[रविवार पेठ, पुणे|रविवार पेठ]], [[सोमवार पेठ, पुणे|सोमवार पेठ]], [[मंगळवार पेठ, पुणे|मंगळवार पेठ]], [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठ]], [[गुरुवार पेठ, पुणे|गुरुवार पेठ]], [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठ]], [[शनिवार पेठ, पुणे|शनिवार पेठ]], [[गंज पेठ, पुणे|गंज पेठ (महात्मा फुले पेठ)]], [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठ]], [[नवी पेठ, पुणे|नवी पेठ]], [[नारायण पेठ, पुणे|नारायण पेठ]], [[भवानी पेठ, पुणे|भवानी पेठ]], [[नाना पेठ, पुणे|नाना पेठ]], [[रास्ता पेठ, पुणे|रास्ता पेठ]], [[गणेश पेठ, पुणे|गणेश पेठ]], [[वेताळ पेठ, पुणे|वेताळ पेठ]] (आज अस्तित्वात नाही), [[सेनादत्त पेठ, पुणे|सेनादत्त पेठ]] |
[[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]], [[रविवार पेठ, पुणे|रविवार पेठ]], [[सोमवार पेठ, पुणे|सोमवार पेठ]], [[मंगळवार पेठ, पुणे|मंगळवार पेठ]], [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठ]], [[गुरुवार पेठ, पुणे|गुरुवार पेठ]], [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठ]], [[शनिवार पेठ, पुणे|शनिवार पेठ]], [[गंज पेठ, पुणे|गंज पेठ (महात्मा फुले पेठ)]], [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठ]], [[नवी पेठ, पुणे|नवी पेठ]], [[नारायण पेठ, पुणे|नारायण पेठ]], [[भवानी पेठ, पुणे|भवानी पेठ]], [[नाना पेठ, पुणे|नाना पेठ]], [[रास्ता पेठ, पुणे|रास्ता पेठ]], [[गणेश पेठ, पुणे|गणेश पेठ]], [[वेताळ पेठ, पुणे|वेताळ पेठ]] (आज अस्तित्वात नाही), [[सेनादत्त पेठ, पुणे|सेनादत्त पेठ]], डेक्कन जिमखाना, नागेश पेठ. |
||
=== उपनगरे === |
=== उपनगरे === |
१७:०८, ७ मे २०११ ची आवृत्ती
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
?पुणे महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
गुणक: Coordinates: Unknown argument format |
|
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ७०० चौ. किमी |
जिल्हा | पुणे |
तालुका/के | Haveli taluka |
लोकसंख्या • घनता |
५०,५०,००० (2008) • ७,२१४/किमी२ |
महापौर | मोहनसिंग राजपाल |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 411 0xx • +त्रुटि: "91(20)" अयोग्य अंक आहे • MH 12 (Pune) MH 14 (PCMC) |
पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे.
शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ].समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी';शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानली जाते.पुणे शहर उद्दोग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.
नाव
पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी त्याला 'पूना' संबोधण्यास सुरुवात केली. आता हे शहर पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.
इतिहास
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशाहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.
भूगोल
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.
पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅंप भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मी (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदू वेताळ टेकडी (समुद्रसपाटीपासून ८०० मी)वर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची उंची (१३०० मी) आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना पुण्याच्या दक्षिणेस १०० कि.मी.वर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रि. स्केल चा भूकंप झाला.
डोंगर आणि टेकड्या
पुणे शहरात आणि आजूबाजूला बर्याच टेकड्या आहेत.
- कात्रजची टेकडी
- गुलटेकडी
- चतुःशृंगी
- तळजाई
- पर्वती
- फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
- येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
- राम टेकडी
- वाघजई
- वेताळ टेकडी
- सिंहगड
- हनुमान टेकडी
नद्या, तलाव, हौद आणि नाले
- आंबील ओढा
- इंद्रायणी
- करपे तलाव(हा कॉंग्रेस हाउससमोर होता)
- कात्रजचा तलाव
- पेशवेकालीन कात्रजचा पाट
- खडकवासला उजवा कालवा
- टिळक तरणतलाव
- देव नदी
- नाग नदी
- नागझरी
- नाना हौद
- पंचहौद
- पवना नदी
- पाषाण तलाव
- भामा नदी
- मानस सरोवर
- मुठा नदी
- मुळा नदी
- भैरोबा नाला
- शाहू तरणतलाव
- शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
- सदाशिव पेठ हौद
- साततोटी हौद
- सारसबाग तळे
पेठा
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून ठेवली गेली आहेत. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, गंज पेठ (महात्मा फुले पेठ), सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, गणेश पेठ, वेताळ पेठ (आज अस्तित्वात नाही), सेनादत्त पेठ, डेक्कन जिमखाना, नागेश पेठ.
उपनगरे
पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, कात्रज, औंध, शिवाजीनगर, वाकडेवाडी, कोरेगाव पार्क, येरवडा, कल्याणीनगर, विमाननगर, धनकवडी, बालाजी नगर (सातारा रस्ता), बिबवेवाडी, कँप, कोंढवा, वारजे माळवाडी, खडकी, दापोडी, पाषाण, बाणेर, खराडी, विठ्ठलवाडी, वडगांव (बुद्रुक), आनंदनगर (सिंहगड रस्ता), धायरी, पद्मावती, अरण्येश्वर, पर्वती, दत्तवाडी, गुलटेकडी, सॅलिसबरी पार्क, अप्पर इंदिरा नगर, आंबेगाव, भुसारी कॉलनी, बावधन, गोखलेनगर, वडारवाडी, पिसोळी, वानवडी, घोरपडी, वडगांव शेरी, वाघोली, विश्रांतवाडी, सांगवी, बोपखेल, सुस, मुंढवा
हवामान
पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बर्यापैकी थंड असतात.
जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणार्या मॉन्सून वार्यांनी पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरी पुणे शहरातील जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.
मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. हा काळ पुण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°से च्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. नुकतेच जानेवारी १९९१ला पुण्याचे तापमान २.८°से होते.
जैवविविधता
इथे पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.
अर्थकारण
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स ,अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्ज् इंडिया, फोर्ब्स मार्शल, थर्मेक्स इत्यादी.
विद्युत व गृहोपयोगी वस्तुनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.
महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जियोमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.
महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजिस, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., युजीएस, कॉग्निझंट, सिमॅंटेक, सनगार्ड, वर्संट, झेन्सार टेक्नालॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यु.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या महत्त्वाच्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.
पुण्यातील महत्त्वाच्या कंपन्यांची मुख्यालये -
- बजाज ऑटो लिमिटेड
- कमिन्स इंडिया लिमिटेड
- बॅंक ऑफ महाराष्ट्र
- पर्सिस्टंट सिस्टम्स
- नीलसॉफ्ट
कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्स, इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आयबीएम,कॉग्निझंट सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
बाजारपेठ
मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई ही ठिकाणे कृषी उत्पादनांकरिता तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे. बुधवार पेठ विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाराकरिता माहीत आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हाँगकाँग-लेन महिलांमध्ये लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागातील अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता कपडा आणि तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कँप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट हे पाश्चात्यवळणाच्या उत्पादनांसाठी माहीत आहेत. त्या प्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, कर्वे रस्ता या भागातसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.
प्रशासन
नागरी प्रशासन
पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.
जिल्हा प्रशासन
अधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा
पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
महानगर पोलीस यंत्रणा
पुणे पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो. हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
वाहतूक व्यवस्था
पुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूर व दुबईला जाणार्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.
नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकण व राजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे.
शहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळ्यादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरी, खडकी व चिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्गाची अडचण आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसर्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.
पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे सुधारली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबई, हैद्राबाद व बंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.
पुणे शहर हे २०१० पर्यंत महत्त्वाचे आय.टी केंद्र होण्याच्या मार्गावर आहे. पुण्याचे चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे. पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वैगरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. व पी.सी.एम.टी. या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे सम्मीलन होऊन आता पी.एम.पी.एल. ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. तीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.
लोकजीवन
पुणे शहराच्या लोकसंखेत गेल्या २० वर्ष पासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारतातील सातवे सर्वांत मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.
पुण्यात राहणार्यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेअर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.
पुण्याची भगिनी शहरे
ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -
- ट्रोम्सो, नॉर्वे
- ब्रेमेन, जर्मनी
- सान होजे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
- फेरबँक्स, अलास्का, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
संस्कृती
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते. पुण्यात बोलली जाणारी भाषा ही मराठी भाषेची प्रमाणबोली (standard) मानली जाते. पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुणेकरांना संगीत, कला, साहित्याची जबरदस्त आवड आणि जाण आहे.
गणेशोत्सव
इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणार्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशा-परदेशातून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिवल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.
- कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
- तांबडी जोगेश्वरी
- गुरूजी तालीम
- तुळशीबाग
- केसरी वाडा (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलीली मूर्ती विसर्जित करून उत्सव मूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.
दरवर्षी हिवाळ्यामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा अभिजात संगीत मैफलीचा कार्यक्रम पुण्यात होतो. तीन दिवस चालणार्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत हिंदुस्तानी व कर्नाटक संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीतच महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणार्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.
रंगभूमी
पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुदर्शन रंगमंच व पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते.
चित्रपट
पुण्यात अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता व कोथरूड येथील सिटीप्राइड, कल्याणीनगर येथील गोल्ड ऍडलॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश व्हिजन ही पुण्यातील मल्टीप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात.
धर्म- अध्यात्म
चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतु:शृंगी देवस्थान पाहते.दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते. शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
पुण्याजवळील आळंदी व देहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरात वारी पोहोचते.
पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. प्ण्यात ओहेल डेविड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे. पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन बागा व मोठे ध्यानगृह आहे.
खवय्येगिरी
काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, सुजाता व कावरे कोड्रिंक्स यांची मस्तानी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. जंगली महाराज रस्ता, कँप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्गसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली खूप प्रसिद्ध आहे. अमृततुल्ये ही चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.
पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी हे इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहे. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.
पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज नावाच्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत.
प्रसारमाध्यमे
सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी ,महाराष्ट्र टाइम्स, व केसरी ही मराठी वृत्तपत्रे तर इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया,सकाळ टाइम्स, व महाराष्ट्र हेराल्ड ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, रेडियो मिर्ची व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. झी मराठी, ई टीव्ही मराठी, सह्याद्री दुरदर्शन या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील उपलब्ध आहेत. अनेक संस्था आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आहेत.
शिक्षण
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालय, स.प.महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासून नामांकित होतेच.
पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकीत शिक्षण संस्था आहेत. पुण्यात शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकर देखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.
शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IIUCA), आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI), सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसुण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतिय विज्ञान आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वणस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), भलीमोठी मीटरवेव रेडिओ दुर्बीण (GMRT) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.
प्राथमिक व विशेष शिक्षण
पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्यात असतो. पुण्यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (आयसीएसई/सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापिठाबरोबर अनेक संस्था जपानी भाषेत शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियाँस फ्राँसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मन व फ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात.
उच्च शिक्षण
पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न असतात. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत. पुणे ही विद्यार्थी संख्येनुसार जगातील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.
पुण्यातील महत्त्वाची महाविद्यालये
महाविद्यालये | अभियांत्रिकी महाविद्यालये | वैद्यकीय महाविद्यालये | व्यवस्थापन महाविद्यालये | इतर | शाळा |
फर्ग्युसन महाविद्यालय | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय | बी.जे. मेडिकल कॉलेज | सिंबायोसिस | राष्ट्रीय विमा अकादमी (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी) | नू.म.वि. |
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स | ए.आय.एस.एस.एम.एस.चे अभियांत्रिकी महाविद्यालय | लष्कराचे ए.एफ.एम.सी. | इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड | आय.एल.एस. विधि महाविद्यालय | साधना विद्यालय हडपसर |
आबासाहेब गरवारे महाविद्यालय | भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय | भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय | पुणे विद्यापीठाचे पुम्बा | डेक्कन कॉलेज (पुरातत्त्व व भाषाशास्त्र) | |
नौरोसजी वाडिया महाविद्यालय | एम.आय.टी. | आय.एम.डी.आर. | टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (संस्कृत) | ||
स.प. महाविद्यालय | व्ही.आय.टी. | भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे) | |||
नेस वाडिया महाविद्यालय | गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड सोशल सायन्सेस |
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.
संशोधन संस्था
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडियो ऍस्ट्रोफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ति संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटि रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.
लष्कर शिक्षण व संशोधन संस्था
लष्कर शिक्षण देणार्या अनेक संस्था पुण्यात आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग, आर्मी इन्स्टिट्युट ऑफ फिजीकल ट्रेनींग तसेच लष्कराचे ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रुजु होतात. त्याचबरोबर आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लीशमेंट, डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलोजी, एक्स्प्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गेनायझेशन व आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलोजी या लश्कराशी संबंधित संशोधन करणार्या संस्था देखील पुण्यात आहेत.
खेळ
क्रिकेट हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हॉकी, फुटबॉल, टेनिस, कबड्डी व खोखो हे खेळ देखील खेळल जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजीत केली जाते. पुण्यातील नेहरु स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४चे राष्ट्रीय खेळ झाले होते व इ.स. २००८ मध्ये कॉमनवेल्थ खेळ होणार आहेत.
मूळ पुण्यातील असलेले प्रसिध्द खेळाडू- हेमंत व हृषीकेश कानेटकर, राधिका तुळपुळे व नितीन कीर्तने (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी हे पुण्याचे खासदार आहेत.
पर्यटन स्थळे
पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, राजा दिनकर केळकर संग्रहालय, पानशेत धरण, बालगंधर्व रंगमंदिर, लाल महाल, आगाखान पॅलेस, सारसबाग, विश्रामबाग वाडा, कात्रज सर्प उद्यान,महात्मा फुले वाडा, फिल्म आणि टेलीविजन इंस्तीट्युट, पाताळेश्वर मंदिर, बंड गार्डन, शिंदे छत्री
पुणे शहराच्या आसपास व पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकरीता पहा- पुणे जिल्हा