जंगली महाराज रस्ता (पुणे)
Appearance
(जंगली महाराज रस्ता या पानावरून पुनर्निर्देशित)

जंगली महाराज रस्ता पुण्यातील हमरस्ता आहे. हा रस्ता डेक्कन जिमखान्यापासून शिवाजीनगर पर्यंत पूर्व-पश्चिम जातो. या रस्त्यावर अनेक उपहारगृहे आहेत.या रस्त्यावर मॉडर्न प्रशाला व महाविद्यालय ही आहे.
हा रस्ता पुण्यातील अत्यंत गजबजलेले व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या मार्गावर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची व्यापारी दालने, वस्त्रप्रावरणांची दुकाने, तसेच उपाहारगृहे व हॉटेल्स मोठ्या संख्येने आहेत. या रस्त्याला लागूनच असलेले छत्रपती संभाजी महाराज उद्यान (संभाजी पार्क) हे शहरातील प्रमुख सार्वजनिक उद्यानांपैकी एक आहे. तसेच, या रस्त्याच्या उत्तरेकडील टोकाला बाल गंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |