टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
ब्रीदवाक्य एक्स्पीरियन्स सर्टन्टी
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र माहिती तंत्रज्ञान
स्थापना १९६८
संस्थापक जे. आर. डी. टाटा
मुख्यालय

Flag of India.svg मुंबई, भारत

मुंबई
महत्त्वाच्या व्यक्ती रतन टाटा (बोर्ड अध्यक्ष)
एन.चंद्रशेखरनं (मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक)
एस्‌. पद्मनाभन्‌
पी. वांद्रेवाला
महसूली उत्पन्न १५ अब्ज ५ कोटी अमेरिकन डॉलर (२०१४-१५)
निव्वळ उत्पन्न ३ अब्ज ५ कोटी
कर्मचारी ३,३५,६२० (ऑगस्ट २०१५ रोजी)
संकेतस्थळ टीसीएस्‌.कॉम

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी.सी.एस.) (बीएसई.532540, एनएसई.TCS) ही १९६८ साली स्थापन झालेली, माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टी.सी.एस. ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था आहे.[१]

इतिहास[संपादन]

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची स्थापना जे. आर. डी. टाटा यांनी १९६८ साली केली. टाटा उद्योगसमूहात संगणक तंत्रद्यान अंगिकृत करण्याच्या उद्देशाने टी.सी.एस.ची स्थापना झाली. टाटा कॉंप्यूटर सेंटर या नावाने टी.सी.एस. तेंव्हा ओळखली जात असे. टाटा समुहातील विविध उपकंपन्यांना संगणक विषयक सेवा पुरवणे हे टी.सी.एस.चे व्यावसायिक उद्दिष्ट होते. टाटा इलेक्ट्रिकमध्ये अभियंता म्हणून काम करीत असलेले फकिरचंद कोहली हे टी.सी.एस.चे पहिले व्यवस्थापकीय संचालक. थोड्याच काळात त्यांनी संगणकीकरण आणि तदनुषांगिक सेवांचे भविष्यातील महत्त्व ओळखले आणि टाटा समूहाबाहेर व्यवसायवृद्धीच्या संधी शोधण्यास सुरुवात केली. याच प्रयत्नातून १९७४ मधे टी.सी.एस.ला पहिला प्रणाली विकसनाचा निर्याताभिमुख प्रकल्प मिळाला. बरोज या अमेरिकी संस्थेबरोबर पुढे टी.सी.एस.ने विविध प्रकल्पांवर यशस्वीपणे काम केले.[२]

१९९० च्या दशकात टी.सी.एस.च्या व्यवसायात घसघशीत वाढ होऊ लागली. १९९० च्या दशकाच्या शेवटी Y2K आणि इ-बिझनेस या क्षेत्रातील संधींमुळे टी.सी.एस. नावारूपाला आली. २१व्या शतकाच्या सुरुवातीला बी.पी.ओ. आणि माहिती तंत्रज्ञान सल्ला-सेवा यात नवीन संधी निर्माण झाल्या.

जागतिक कार्यालये आणि विकसन केंद्रे[संपादन]

पुणे,

आशिया-प्रशांत[संपादन]

हॉंग कॉंग , जपान, मलेशिया, सिंगापुर, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड

युरोप[संपादन]

बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रांस, जर्मनी, हंगेरी, आइसलॅंड, आयर्लंड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंग्डम

उत्तर अमेरिका[संपादन]

कॅनडा, मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने

दक्षिण अमेरिका[संपादन]

आर्जेन्टिना, ब्राझिल, चिली, उरुग्वे

आफ्रिका-मध्य पूर्व आशिया[संपादन]

दक्षिण आफ्रिका, बहारीन, सौदी अरेबिया

सेवा आणि उत्पादने[संपादन]

माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रे (Information Technology Services)[संपादन]

माहिती तंत्रज्ञान पायाभूत सेवा (IT Infrastrcuture Services)
व्यापाराभिमुख प्रणाली विकसन सेवा (Business Solutions)
माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक सल्ला सेवा (IT and Business Consulting Services)
माहिती तंत्रज्ञान उपयोजीत सेवा (IT Enabled Services)
अभियांत्रिकी आणि उद्योग सेवा (Engineering and Industrial Services)

लघु आणि मध्यम व्यवसाय क्षेत्र (Small and Medium Businesses)[संपादन]

उद्योग क्षेत्रे[संपादन]

बँकिंग आणि वित्त सेवा (Banking and Financial Services)
उर्जा-साधनसंपत्ती सेवा (Energy, Resoruces and Utilities)
सरकार (Government)
आरोग्य आणि आयुर्शास्त्र (Healthcare and Life Science)
उच्च तंत्रद्यान (Hi-Tech)
विमा (Insurance)
उत्पादन (Manufacturing)
किरकोळ व्यापार आणि ग्राहकोपयोगी वस्तु (Retail and Consumer Goods)
दुरसंचार (Telecom)
प्रवास आणि परिवहन (Travel and Transportation)

बिझनेस प्रोसेस आउट्सोर्सिंग (Business Process Outsourcing)[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "TCS 50 Time Machine". www.tcs.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Tata Consultancy Services Ltd". Business Standard India. 2020-03-29 रोजी पाहिले.