महाराष्ट्रातील पर्यटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र पर्यटन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
एलीफंटा लेणी

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा,वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना जसे पंढरपूर,शिर्डी ,पैठण, शनि शिंगणापूर आदी ठिकाणी भेटी देतात.[१] हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेटी देतात. परदेशी पर्यटकांत १९९०पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणारांचे प्रमाण वाढीस लागले.[ संदर्भ हवा ]

देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनाचा इतिहास माहिती[संपादन]

महाराष्ट्र राज्य ऐतिहासिक परंपरेने पूर्णतः सुसज्ज आहे. महाराष्ट्राला सातवाहन, वाकाटक, चालुक्य, मराठे, पेशवे इत्यादींचा महत्त्वाचा आहे. सातवाहनांच्या काळातील कैलास लेणी, शिव मंदिरे; मराठ्यांच्या काळातील गडकिल्ले (दुर्ग) विशेषतः त्यांतील जलदुर्ग,की जे महाराष्ट्राशिवाय इतर कोठेही सापडत नाहीत.तर पेशवा काळात तयार झालेले भुईकोट किल्ले इत्यादींनी महाराष्ट्र राज्याला पर्यटनाच्या इतिहासात समृद्ध केले.पायाभूत सुविधांचा अभाव आणि अडचणी[संपादन]

१९९० नंतर दळणवळण आणि रस्ते विकासाला महाराष्ट्रात चालना मिळाली. पर्यटकांसाठी खाजगी वाहतूक कंपन्या पुढे आल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतही सुधारणा झाली, बीओटी (बांधा-चालवा- हस्तांतरित करा) तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही काम झाले; तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा देतील अशा हॉटेल्सचा अभाव, नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठीचा सर्वसाधारण अनाग्रह, परभाषक आणि परदेशी पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांची या विषयीची उदासीनता,[२] आत्यंतिक लोकसंख्येमुळे पर्यटन स्थळांचे गर्दीच्या ठिकाणांत झालेले रूपांतर इत्यादी बाबी, महाराष्ट्रात निव्वळ पर्यटन उद्देशाने येणाऱ्या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने गोवा, केरळ, राजस्थान या इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत नकारात्मक ठरतात.[ संदर्भ हवा ]

ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची वैयक्ति स्वच्छतेच्या अल्पसुविधा, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, राहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपाहारगृहांतील अनारोग्यकारक पदार्थ आणि वातावरण, सेवादात्यांमध्ये व्यावसायिकतेचा, संवाद कौशल्याचा आणि सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात.[ संदर्भ हवा ]. पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल बाळगलेला कुत्सित नकारात्मक दृष्टिकोणही[ संदर्भ हवा ] क्वचित दिसतो.

==महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे==fdsdzfff

==व्यावसायिक आणि व्यापारउदीम==तुजारपूर दुध व्यवसाय साठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख ठिकाण हे सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर पासून 8 km अंतरावर आहे

शैक्षणिक व आरोग्य पर्यटन[संपादन]

धार्मिक पर्यटन[संपादन]

थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे[संपादन]

मुंबईपासूनची अंतरे:

अभयारण्ये[संपादन]

 • अनेर - धुळे
 • अंधेरी - चंद्रपूर
 • औट्रमघाट - जळगांव
 • कर्नाळा - रायगड
 • कळसूबाई - अहमदनगर
 • काटेपूर्णा -
 • किनवट - यवतमाळ
 • कोयना - सातारा
 • कोळकाज - अमरावती
 • गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
 • चांदोली - सांगली, कोल्हापूर
 • चापराला - गडचिरोली
 • जायकवाडी -
 • ढाकणा कोळकाज - अमरावती
 • ताडोबा - चंद्रपूर
 • तानसा - ठाणे
 • देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
 • नवेगांव - भंडारा
 • नागझिरा - भंडारा
 • नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
 • नानज - सोलापूर
 • पेंच - नागपूर
 • पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
 • फणसाड - रायगड
 • बोर - वर्धा
 • बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
 • भिमाशंकर - पुणे, ठाणे
 • मधमेश्वर - चंद्रपूर
 • मालवण -
 • माळढोक - अहमदनगर, सोलापूर
 • माहीम - मुंबई
 • मुळा-मुठा - पुणे
 • मेळघाट - अमरावती
 • यावल - जळगांव
 • राधानगरी - कोल्हापूर
 • रेहेकुरी - अहमदनगर
 • संजय गांधी - मुंबई
 • सागरेश्वर - सांगली

राखीव मृगया क्षेत्र[संपादन]

 • टिपेश्वर - यवतमाळ
 • मायणी - सातारा
 • मालखेड - अमरावती

कोकण आणि किनारपट्टी[संपादन]

हरणी बंदर

महाराष्ट्राच्या इतर प्रदेशातील पर्यटन[संपादन]

उदगीर जिल्हा लातूर येथे किल्ला उदगीर जवळील देवर्जन येथे हत्तीबेट सोमनाथपूर (तालुका उदगीर) येथील देवीचे मंदिर

औरंगाबादमधील बीवी का मकबरा

राज्यातले ग्रामीण पर्यटन[संपादन]

वारी, जत्रा, मेळे, धार्मिक उत्सव , पंढपूरवारी

चित्रदालन[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=93596:2010-08-13-18-35-09&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3.[मृत दुवा]It is a snapshot of the page as it appeared on 19 Jan 2011 22:22:49 GMT.
 2. ^ http://www.virtualtourist.com/travel/Asia/India/State_of_Maharashtra/Mumbai-1101422/Tourist_Traps-Mumbai-BEWARE-BR-1.html या गोष्टींचा पर्यटनावर विपरीत परिणाम होतो. संकेतस्थळ दिनांक १५ २ २०१११ रोजी भाप्रवे रात्रौ एक वाजता जसे दिसले.
 3. ^ "Haji ali". Mumbai Mirror. 2008-08-07. Archived from the original on 2007-10-24. 2008-08-17 रोजी पाहिले.

पय॔टन स्थळे