झी मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी
झी मराठी नवीन लोगो
Alphamarathi.gif
सुरुवात इ.स. १९९९[१]
मालक झी नेटवर्क
ब्रीदवाक्य मी मराठी, झी मराठी
देश भारत
प्रसारण क्षेत्र जगभर
मुख्यालय झी टिवी

१३५, काँटीनेंटल बिल्डींग, डॉ. ॲनी बेसंट मार्ग,

वरळी, मुंबई ४०००१८.[२]
जुने नाव झी मराठी अल्फा टिव्ही मराठी
बदललेले नाव झी मराठी
भगिनी वाहिनी झी च्या इतर प्रादेशिक वाहिन्या आणि हिंदी
प्रसारण वेळ २४ तास
संकेतस्थळ [१]
अल्फा मराठी

झी मराठी ही झी नेटवर्क समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाहिनी आहे.

झी मराठी वाहिनीची सुरुवात इ.स. १९९९ मध्ये झाली. इ.स. २००४ पर्यंत ही वाहिनी अल्फा मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन कथामालिका, चर्चा, पाककृती, प्रवासवर्णनपर मालिका, बातम्या, मराठी चित्रपट आणि क्रीडाविषयक कार्यक्रम दाखवतात.[१]


प्रसारण[संपादन]


कार्यक्रम[संपादन]

मालिका[संपादन]

झी मराठी वाहिनीवर अनेक दैनंदिन कथामालिका दाखवण्यात येतात. आभाळमाया, अवंतिका, श्रीयुत गंगाधर टिपरे, वादळवाट,तु तिथे मी ,राधा हि बावरी ,मला सासू हवी ,उंच माझा झोका, अशा अनेक मालिकांनी या वाहिनीच्या लोकप्रियतेत मोठा वाटा उचलला आहे.[१]
मुख्य पान - झी मराठीवरील मालिकांची यादी

गाजलेल्या (पुर्वीच्या) मालिका[संपादन]

 1. आभाळमाया
 2. अवंतिका
 3. श्रीयुत गंगाधर टिपरे
 4. वादळवाट
 5. माझीया प्रियाला प्रीत कळेना
 6. एका लग्नाची दुसरी गोष्ट
 7. तु तिथे मी
 8. अवघाची संसार
 9. कुलवधू
 10. आभास हा
 11. कळत नकळत
 12. कुंकू

चालू मालिका[संपादन]

सोम ते शनी[संपादन]

सोम ते मंगळ[संपादन]

 • 9.30 pm चला हवा येऊ द्या

बुध ते शनी[संपादन]

 • 9.30 pm अस्मीता

आगामी मालिका व कार्यक्रम[संपादन]

लवकरच भेटायला येत आहे एक नवी मालिका

चित्रपट[संपादन]

प्रत्येक महिन्यातील एका रविवारी "महासिनेमा" अंतर्गत एका लोकप्रिय नवीन मराठी सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येते. आतापर्यंत महासिनेमा मध्ये श्वास, अगं बाई अरेच्चा!, आई, सातच्या आत घरात हे चित्रपट दाखवण्यात आले आहेत.[१]

विशेष कार्यक्रम[संपादन]

इ.स. २००३ मध्ये या वाहिनीने "झी मराठी अ‍ॅवॉर्ड्‌स" या नावाने मालिकांमधील प्रेक्षकांनी मते देऊन निवडलेल्या लोकप्रिय अभिनेत्यांना पुरस्कार देण्याचे चालू केले. मराठी नाटके, चित्रपट, पारितोषिके वितरण कार्यक्रम( झी गौरव पुरस्कार)फु बाई फु , खुपते तिथे गुप्ते ,एका पेक्षा एक ,हे कार्यक्रम विशेष लोकप्रिय आहेत.

हेसुद्धा पहा[संपादन]


संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. १.० १.१ १.२ १.३ "झी मराठी - आमच्याबद्दल"[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
 2. "झी मराठी - संपर्क"[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती