क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


क्रिकेट
Pollock to Hussey.jpg
गोलंदाज शॉन पोलॉकफलंदाज मायकल हसी. पाढंऱ्या रंगाची खेळपट्टी दिसत आहे.
सर्वोच्च संघटना आयसीसी
उपनाव द जंटलमन्स गेम ("The Gentleman's game")
सुरवात १८ वे शतक
माहिती
संघ सदस्य ११ खेळाडू संघागणिक
बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी
मिश्र हो, वेगळ्या स्पर्धा
वर्गीकरण सांघिक, काठी-चेंडू
साधन क्रिकेट चेंडू, क्रिकेट बॅट,
यष्टी
मैदान क्रिकेट मैदान
ऑलिंपिक १९०० उन्हाळी ऑलिंपिक केवळ
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड दरम्यान २००५ मध्ये झालेला कसोटी सामना. काळी पँट घातलेले पंच आहेत. कसोटी सामने, प्रथम श्रेणी सामन्यां मध्ये खेळाडू पांढरे कपडे घालतात, चेंडू लाल असतो तर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळाडू रंगीत कपडे घालतात व पांढरा चेंडु वापरल्या जातो.
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत दरम्यानचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना. फलंदाजांनी पिवळे कपडे घातले आहेत तर क्षेत्ररक्षण करणारया संघाने आकाशी रंगाचे कपडे घातले आहेत.
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडFlag of Sri Lanka.svg श्रीलंका दरम्यान आंतरराष्ट्रीय २०-२० सामना. सहसा हे सामने संध्याकाळी खेळवले जातात व अडीच ते तीन तास चालतात.
पारंपारिक क्रिकेट चेंडू. पांढरया दोरयाला सीम असे म्हणतात. एकदिवसीय सामने सहसा प्रकाश झोतात खेळवले जातात, त्यामुळे पांढरा चेंडू वापरल्या जातो.
क्रिकेट बॅट

क्रिकेट हा क्रिकेट मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड-लांबीची मुख्य खेळपट्टी असते, ज्याच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ अशा लाकडी यष्टी असतात. एका संघाला फलंदाजी संघ म्हणून नियुक्त केले जाते, जो जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता म्हणून घोषित केला जातो.

प्रत्येक सामन्याच्या सुरवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसर्‍या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (स्ट्रायकर) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्ट्यांसमोर चार फुटांवर क्रिजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करुन चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापुर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज, नॉन-स्ट्रायकर, खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाला गोलंदाजाजवळ क्रिजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करु न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दीष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर एक षटक पुर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसर्‍या बाजूने टाकतो.

सामान्यतः बाद होण्याच्या पद्धती आहेत त्रिफळाचीत, जेव्हा गोलंदाजाचा चेंडू थेट यष्ट्यांवर जावून आदळतो, पायचीत, जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करुन चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो आणि झेल, जेव्हा फलंदाजाने टोलाविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक अडवतो. धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून सीमारेषेपार करुन किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरुन दुसर्‍या जागी पोहोचून. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला धावचीत असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन पंच पार पाडतात.

क्रिकेटचे कायदे करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC) यांच्यावर आहे. क्रिकेटचे ट्वेंटी२० (ज्यामध्ये १ डाव हा २० षटके म्हणजेच १२० चेंडू इतका असतो) पासून ते कसोटी क्रिकेट (जो पाच दिवस आणि अमर्यादित षटकांचा असतो आणि प्रत्येक संघ प्रत्येकी दोन डाव खेळतो) पर्यंत अनेक प्रकार आहेत. परंपरागत क्रिकेट संपुर्णतः सफेद रंगाची साधने (कपडे, पॅड, ग्लोव्ह्ज) वापरुन खेळले जाते, परंतू मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळताना, खेळाडू क्लब किंवा संघाच्या रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचाशिवाय, काही खेळाडू चेंडू लागून होणार्‍या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी, संरक्षक साधने वापरतात, जी कॉर्क पासून बनवलेली, कातडी अच्छादन असलेली आणि अगदी टणक असतात. क्रिकेटची उत्पत्ती कधी झाली हे अनिश्चित असले तरीही, सर्वप्रथम १६व्या शतकात दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या नोंदी केल्या गेल्या. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारामुळे क्रिकेटचा प्रसार जगभरात झाला, आणि पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९व्या शतकाच्या मध्यावर खेळवला गेला. क्रिकेट नियामक मंडळ-आयसीसीचे १०० हून अधिक सभासद आहेत, त्यापैकी १० पूर्ण सभासद आहेत जे कसोटी क्रिकेट खेळतात. ऑस्ट्रेलेशिया, ब्रिटन, भारतीय उपखंड, दक्षिणी आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. स्वतंत्रपणे आयोजन आणि खेळल्या जाणार्‍या, महिला क्रिकेटने सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे.

अनुक्रमणिका

व्युत्पत्ती[संपादन]

"क्रिकेट" ह्या संज्ञेबद्दल अनेक शब्द स्त्रोत म्हणून सुचवले गेले आहेत. खेळाबद्दल सर्वात आधीचा निश्चित संदर्भ मिळतो तो १५९८ मध्ये, जेव्हा खेळाला creckett म्हटले जात असे.[१] जुन्या इंग्रजी भाषेत नावाचा एक संभाव्य स्त्रोत आहे, cricc किंवा cryce म्हणजेच crutch किंवा काठी.[२] प्रसिद्ध लेखक सॅम्युएल जॉन्सनच्या शब्दकोशामध्ये, त्याने "cryce, Saxon, a stick" वरुन क्रिकेट हा शब्द तयार केला.[३] जून्या फ्रेंच भाषेत, criquet ह्या शब्दाचा अर्थ एका प्रकारची छडी किंवा काठी असा असावा असे दिसते.[२] दक्षिण-पुर्व इंग्लंड आणि बुरुंडी किंवा बूर्गान्यच्या सरदाराच्या ताब्यातील मुलूख आणि तेव्हाचा फ्लँडर काऊंटी यांच्यामध्ये असलेल्या घनिष्ट मध्ययुगीन व्यापारासंबंधावरुन, असे दिसते की हे नाव मिडल डच वरुन घेण्यात आले असावे[४] krick(-e), म्हणजे बाक असलेली काठी.[२] आणखी एक संभाव्य स्त्रोत म्हणजे मिडल डच शब्द krickstoel, म्हणजे चर्च मध्ये गुडघे टेकवण्यासाठी वापरले जाणारे लांब कमी उंचीचा स्टूल किंवा बाक, ज्याचे साम्य पुर्वी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्‍या दोन यष्टी असणारी लांब खेळपट्टीशी होते.[५] बॉन विद्यापीठातील युरोपीय भाषांचे तज्ञ हेनर गिलमेइस्टरच्या मते, हॉकी साठी वापरला जाणारा वाक्प्रचार met de (krik ket)sen (अर्थात, "काठीसह पाठलाग") ह्यावरुन "cricket" हा शब्द घेतला गेला असावा.[६] डॉ गिलमेइस्टर यांच्या मते फक्त नावच नाही तर हा खेळच मूळतः फ्लेमिश आहे.[७]

इतिहास[संपादन]

असे समजले जाते की, या खेळाची सुरवात इंग्लंड मधील प्रांतात झाली. तेराव्या शतकात इंग्लंडचे युवराज एडवर्ड यांनी नेवेन्डन, केंट येथे क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये १९५८ मध्ये सर्व प्रथम क्रिकेट या शब्दाची लिखित नॊंद झाली.

सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूप वाढली. १८०० मध्ये खेळात बरेच परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला.

१९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिद्ध झाला. २००० साली क्रिकेटचा नवीन प्रकार ट्वेंटी-२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली. या खेळाची मुख्यत्वे दोन अंगे आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी. कसोटी क्रिकेटमध्ये ४ डाव, तर इतर प्रकारांत २ डाव खेळले जातात. दोन्ही संघ आलटून-पालटून फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कप्तानांन समोर नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम डावात फलंदाजी करायची अथवा गोलंदाजी, याची निवड करतो. फलंदाजी करणाऱ्या संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या यष्टी पर्यंत जातात तेव्हा १ धाव पूर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या फळीला लागतो तेव्हाच धाव घेतात. फलंदाजाने चेंडू सीमापार केल्यास, यष्टींदरम्यान धाव घेण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी चेंडूचा पहिला टप्पा सीमेवर अथवा सीमेपार पडला तर सहा धावा (षटकार), नाहीतर चार धावा (चौकार) फलंदाजाच्या खात्यात जमा होतात. ह्या शिवाय गोलंदाजाने गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणाऱ्या संघास धाव मिळते.

गोलंदाजी करणाऱ्या संघाचा उद्देश दुसऱ्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येते (त्रिफळाचीत, झेल,यष्टीचीत, पायचीत (एल.बी.डब्ल्यू.),धावचीत).हा खेळ सहा चेंडूचे १ षटक या प्रमाणे खेळला जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे टोक बदलले जाते व क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा नवीन खेळाडू गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस पंच सुध्दा आपआपली जागा बदलतात.

प्रत्येक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याच्या संघातील नविन फलंदाज फलंदाजीस येतो. जेव्हा १० फलंदाज बाद होतात तेव्हा तो संघ सर्वबाद झाला असे म्हटले जाते. या नंतर फलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो तर गोलंदाजी करणारा संघ फलंदाजी करतो.

जो संघ दिलेल्या षटकमर्यादेत सर्वात जास्त धावा करतो त्याला विजयी घोषित केले जाते. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात सामना संपण्याचे मापदंड वेगवेगळे आहेत.

क्रिकेटचे नियम[संपादन]

मेर्लबन क्रिकेट क्लबने सर्व महत्त्वाच्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांशी विचारविनिमय करून बनवलेल्या ४२ नियमांनुसार हा खेळ खेळवण्यात येतो.

खेळाडू आणि अधिकारी[संपादन]

खेळाडू[संपादन]

प्रत्येक संघात ११ खेळाडू असतात. सर्व खेळाडूंना फलंदाज अथवा गोलंदाज असे म्हणतात. सहसा प्रत्येक संघात पाच ते सहा फलंदाज व पाच ते सहा गोलंदाज असतात. जो खेळाडू व्यवस्थित फलंदाजी व गोलंदाजी करतो त्याला अष्टपैलू म्हणले जाते. मैदानावर सर्व प्रमुख निर्णय संघाचा कर्णधार घेत असतो. एका वेळेस एका संघातील दोन खेळाङू फलंदाजी करतात व धावा काढतात, तर दुसऱ्या संघातील एक खेळाङू गोलंदाजी करतो व इतर खेळाङू क्षेत्ररक्षण करतात.

पंच[संपादन]

मैदानावर दोन पंच असतात. एक पंच गोलंदाज ज्या यष्टी जवळून गोलंदाजी करत असतो तेथे उभा असतो तर दुसरा पंच क्षेत्ररक्षणाची जागा स्क्वेअर लेगला उभा असतो. तिसऱ्या पंचाला टी. व्ही. अम्पायर म्हणतात तर सामना अधिकारी सामना क्रिकेटच्या नियमांप्रमाणे खेळवला जातोय याची खात्री करतो.

मैदान[संपादन]

मैदान हे सहसा गोल अथवा अंडाकृती असते. सहसा मैदानाचा व्यास १३७ मी (६५ यार्ड) ते १५० मी (८५ यार्ड) पर्यंत असतो. एका दोरीच्या सहाय्याने मैदानाची सीमा आखली जाते.

खख[संपादन]

खेळपट्टी म्हणजे मैदानाच्या मध्यभागी असलेली मुख्य खेळाची जागा. खेळपट्टी ची लांबी २०.१२ मी (२२ यार्ड) आणि रुंदी ३ मी (३.२ यार्ड) असते .

क्षेत्ररक्षण[संपादन]

क्षेत्ररक्षणाच्या जागा

सामन्यांचे स्वरूप[संपादन]

नाणेफेक[संपादन]

सामना सुरू होण्यापुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करतात. नाणेफेक जिंकणारा कर्णधार सुरवातीला फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.

डावाचा अंत[संपादन]

जेव्हा एक डाव संपतो तेव्हा,

 • दहा फलंदाज बाद होतात
 • फक्त एकच फलंदाज बाकी आहे जो फलंदाजी करु शकत नाही.
 • दुसऱ्या संघाने पहिल्या संघापेक्षा जास्त धावा केल्या.
 • ठरवलेले षटके टाकून झाली.
 • कर्णधाराने आपला डाव घोषित केला.

सामन्याचा कालावधी[संपादन]

२०-२० क्रिकेटमधे नावाप्रमाणे दोन्ही डावात २० षटकांचा खेळ होतो. एकदिवसीय सामना ५० + ५० षटकांचा असतो. सहसा कसोटी सामने ५ दिवस खेळवले जातात. दररोज कमीत कमी सहा तास किंवा ९० षटकांचा खेळ होतो. कसोटी सामन्यामधे फलंदाजी करणारा संघ जोपर्यंत सर्वबाद होत नाही, अथवा डाव घोषित करत नाही, तोवर फलंदाजी करू शकतो. खेळ चालू राहण्यासाठी पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. प्रकाश अपुरा असल्यास सामना काही काळ स्थगित होऊ शकतो. दीर्घ काळ प्रकाश अपुरा राहिला तर सामना रद्द झाल्याचे घोषित केले जाते.

फलंदाजी व धावा[संपादन]

फलंदाजी[संपादन]

फलंदाज आपल्या बॅटने चेंडू फटकाऊन धावा काढतात. जेव्हा फलंदाज बॅटने चेंडू मारतो तेव्हा त्याला फटका (शॉट / स्ट्रोक) म्हणतात. फटक्यांना ते ज्या दिशेने खेळले गेले आहेत त्या प्रमाणे नाव दिले गेले आहे. फलंदाज संघाच्या नीतीनुसार आक्रमक अथवा सावध फलंदाजी करतो. फलंदाज सहसा क्रमाने फलंदाजीस येतात. प्रथम येणाऱ्या दोन फलंदाजांना ओपनर म्हणतात.

धावा[संपादन]

एक धाव काढण्यासाठी फलंदाजाला चेंडू फटकाउन फलंदाजी न करणाऱ्या साथीदाराच्या जागी जावे लागते व त्याच बरोबर त्याच्या साथीदाराला त्याच्या जागी जावे लागते (पॉपिंग क्रिझच्या आतमध्ये).

अतिरिक्त धावा[संपादन]

गोलंदाजी व बळी[संपादन]

गोलंदाजी[संपादन]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा अँड्रु फ्लिन्टॉफ गोलंदाजी करतांना.
गोलंदाजीची एक पद्धत.

गोलंदाज एका ठरावीक पध्द्तीने चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकतो व त्याला गोलंदाजीची पद्धत ( Bowling Action) म्हणतात. सहसा गोलंदाज चेंडूचा टप्पा खेळपट्टीवर टाकतो ज्यामुळे चेंडू उसळून फलंदाजाकडे जावा. गोलंदाजी करतांना पाय नेहमी पॉपिंग क्रिझच्या आत रहाणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला नो-बॉल म्हणतात. ह्या शिवाय टाकलेला चेंडू फलंदाजाच्या आवाक्यात टाकणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला वाईड चेंडू म्हणतात. वाईड अथवा नो चेंडु टाकल्या नंतर फलंदाजी करणारया संघास १ अतिरिक्त धाव मिळते व त्याच बरोबर १ अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागतो.

गोलंदाजाचा मुख्य उद्देश बळी घेणे असतो. गोलंदाजाचा दुसरा उद्देश कमीत कमी धावा देणे असतो. गोलंदाज सहसा दोन प्रकारचे असतात. (तेज गोलंदाज, फिरकी गोलंदाज)

फलंदाज बाद होण्याचे प्रकार[संपादन]

दहा वेगवेगळ्या पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतात. एक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याची जागा नवीन फलंदाज घेतो. जेव्हा दहा फलंदाज बाद (सर्वबाद) होतात तेव्हा एक डाव संपतो.

खाली दिलेल्या दहा प्रकारांन पैकी पहिल्या सहा प्रकाराने फलंदाज सहसा बाद होतो.

 • झेल - जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबादाचे श्रेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांनाही दिले जाते.
 • त्रिफळाचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या टोकावरील यष्टींना लागतो तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. गोलंदाजाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते.
 • पायचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला न लागता फलंदाजाच्या पायावर,पॅड्सवर किंवा शरीरावर आदळतो तेव्हा पंच चेंडू यष्टींच्या वर गेला असता की नाही हे ठरवून फलंदाजाला बाद देऊ शकतो. गोलंदाजाला ह्या बळीचे श्रेय दिले जात
 • धावचीत - जेव्हा क्षेत्ररक्षक, गोलंदाज अथवा यष्टीरक्षक, फलंदाज धाव घेण्यासाठी धावत असतांना अथवा इतर कोणत्याही कारणासाठी क्रिझ मध्ये नसतो तेव्हा चेंडू मारुन यष्टी उडवतो तेव्हा त्याला धावचीत म्हणतात. ह्या बळीचे श्रेय कोणालाही दिले जात नाही.
 • यष्टीचीत - चेंडु खेळतांना जेंव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो व चेंडू त्याला चकवून यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेव्हा बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात. गोलंदाजा व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे श्रेय दिले जाते.
 • हिट द बॉल ट्वाइस - खेळ सुरू असताना फलंदाजाने मारलेल्या चेंडूला मुद्दामहून पुनः बॅटने मारले तर फलंदाज बाद ठरतो. याचे श्रेय गोलंदाजाला मिळते.
 • टाईम्ड आउट - एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. ह्या बळीचे श्रेय कोणालाही दिले जात नाही.

प्रकार[संपादन]

क्रिकेटचे अनेक प्रकार व श्रेणी आहेत. आंतरराष्ट्रीय व्यावसायीक खेळाडू कसोटी क्रिकेट, एकदिवसीय सामने आणि २०-२० सामने खेळतात.

कसोटी क्रिकेट[संपादन]

कसोटी क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक प्रकार आहे व त्याची सुरवात १८७७ मध्ये झाली. पहिला कसोटी सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया संघात १५ मार्च १८७७ ते १९ मार्च १८७७ दरम्यान खेळवण्यात आला. ह्या सामन्या साठी निकाल लागे पर्यंत खेळवला जाणार होता व ४ चेंडूचे एक षटक टाकले गेले. हा सामना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकला. तेंव्हा पासून १८०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळवले गेले आहेत व १० संघ कसोटी खेळण्यास पात्र आहेत. संध्या हे सामने पाच दिवसात खेळवले जातात व प्रत्येक संघ दोन खेळ्या खेळतो व प्रत्येक षटक सहा चेंडूचे असते.

एकदिवसीय क्रिकेट[संपादन]

एकदिवसीय क्रिकेटला मर्यादित षटकांचे सामने किंवा इंन्स्टन्ट क्रिकेट असे सुध्दा संबोधले जाते. १९६३ साली ह्या क्रिकेट प्रकाराची सुरवात झाली. १९७१ साली इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दौरयात पावसामुळे विस्कळीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी एकदिवसीय सामना खेळवला गेला. हे सामने खूप लोकप्रिय आहेत.

 • एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (वर्ष) - आयोजित ठिकाण - विश्वचषक जिकंलेला संघ *
 • एकदिवसीय पहिली विश्वचषक स्पर्धा (इ.स. १९७५) - इंग्लंड- वेस्ट इंडिज
 • एकदिवसीय दुसरी विश्वचषक स्पर्धा (इ.स. १९७९) - इंग्लंड- वेस्ट इंडिज
 • एकदिवसीय तिसरी विश्वचषक स्पर्धा (इ.स. १९८३) - इंग्लंड- भारत
 • एकदिवसीय चौथी विश्वचषक स्पर्धा (इ.स. १९८७) - भारत,पाकिस्तान- ऑस्ट्रेलिआ
 • एकदिवसीय पाचवी विश्वचषक स्पर्धा (इ.स. १९९२) - ऑस्ट्रेलिआ,न्यूझीलंड- पाकिस्तान
 • एकदिवसीय सहावी विश्वचषक स्पर्धा (इ.स. १९९६) - भारत,पाकिस्तान,श्रीलंका- श्रीलंका
 • एकदिवसीय सातवी विश्वचषक स्पर्धा (इ.स. १९९९) - इंग्लंड,आयर्लंड,स्कॉटलंड,हॉलंड- ऑस्ट्रेलिया
 • एकदिवसीय आठवी विश्वचषक स्पर्धा (इ.स. २००३) - दक्षिण् आफ्रिका,झिबांब्वे,केनिया- ऑस्ट्रेलिया
 • एकदिवसीय नववी विश्वचषक स्पर्धा (इ.स. २००७) - वेस्ट इंडिज- ऑस्ट्रेलिया
 • एकदिवसीय दहावी विश्वचषक स्पर्धा (इ.स. २०११) - भारत,बांगलादेश,श्रीलंका- भारत

ट्वेंटी-२० क्रिकेट[संपादन]

ट्वेंटी-२० सामने सर्व प्रथम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मधील काउन्टी क्रिकेट मध्ये २००३ साली खेळवण्यात आले. सध्या हा प्रकार बऱ्याच देशात खेळवला जातो. पहिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाFlag of New Zealand.svg न्यू झीलँड च्या दरम्यान २००४ साली खेळवला गेला.

 • विश्वचषक स्पर्धा (वर्ष) - आयोजित ठिकाण - विश्वचषक जिकंलेला संघ *

इंडियन प्रीमियर लीग[संपादन]

हा प्रकार भारतात खेळला जातो.जगातील बरेच खेळाडू आठ संघात विभागले गेले आहेत. ह्या संघांना भारतातील शहरांची नावे दिली आहेत. उदा. -चेन्नई सुपर किंग्ज. ह्या प्रकाराच्या आत्तापर्यंत पाच स्पर्धा आयोजित झाल्या आहेत. पहिली स्पर्धा राजस्थान रॉयल्स या संघाने जिंकली. या संघाचा कर्णधार शेन वॉर्न हा होता. अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज वि राजस्थान रॉयल्स असा झाला. हे २० षटकांचे सामने होतात.

प्रथम श्रेणी क्रिकेट[संपादन]

प्रथम श्रेणी सामने हे सहसा महत्त्वाचे राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय सामने असतात. ह्या सामन्यांचे स्वरूप साधारणपणे कसोटी सामन्यान सारखेच असते.

हाँगकाँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट सिक्सेस[संपादन]

महिला क्रिकेट[संपादन]

लिस्ट - अ आमने[संपादन]

क्लब क्रिकेट[संपादन]

इतर प्रकार[संपादन]

आंतरराष्ट्रीय संघटन[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटनेचे मुख्यालय दुबई मध्ये आहे. प्रत्येक देशाची एक क्रिकेट संघटना असते जी त्या देशात क्रिकेटचे आयोजन करते व संघासाठी खेळाडूंची निवड करतात.

क्रिकेट खेळणारया देशांना तीन विभागात टाकलेले आहे. पहिल्या विभागात कसोटी खेळण्यास पात्र असलेले दहा संघ आहेत. दुसऱ्या विभागात असोसिएट तर शेवटच्या विभागात एफिलिएट सदस्य देश असतात.

क्रिकेटमधील विक्रम[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. जॉन लीच, फ्रॉम लॅड्स टू लॉर्डस. विदागार मूळ, २९ जून २०११. १८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर) गिल्डफोर्ड कोर्ट केस मध्ये तंतोतंत तारीख १७ जानेवारी १५९७ (ज्युलियन तारीख) नोंदवली गेली आहे, जे ग्रेग्रीयन वर्ष १५९८ आहे. १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 2. २.० २.१ २.२ Birley, पान. ३.
 3. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; HSA नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 4. मिडल डच ही भाषा फ्लँडर कांऊटीमध्ये वापरात होती.
 5. Bowen, p. 33.
 6. टेरी, डेव्हिड (२००८). सतराव्या शतकातील क्रिकेटचा खेळ: खेळाची पुनर्रचना. स्पोर्ट्सलायब्ररी. १८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
 7. गिलमेइस्टर यांच्या सिद्धांताचा सरांश जॉनी एडोज यांच्या द लँग्वेज ऑफ क्रिकेट ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे., ISBN 1-85754-270-3.

बाह्य दुवे[संपादन]

साचा:क्रिकेट मधील खेळाडुंची रूपे