लोकमत
लोकमत | |
---|---|
![]() | |
प्रकार | दैनिक वृत्तपत्र |
आकारमान | ७४९ बाय ५९७ मीमी |
मालक | जवाहरलाल दर्डा |
प्रकाशक | लोकमत मीडिया लिमिटेड |
भाषा | मराठी |
मुख्यालय | नागपूर |
भगिनी वृत्तपत्रे | लोकमत समाचार, लोकमत टाइम्स |
| |
संकेतस्थळ: http://lokmat.net/ |
लोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. मुख्यालय - नागपूर, महाराष्ट्र
लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे. लोकमत हे वाचकसंख्येनुसार मराठीतील क्रमांक एकचे वृत्तपत्र असून देशात याचा क्रमांक ४था आहे. (स्रोत: एन.आर.एस २००६) दर्डा कुटुंबीय या वृत्तपत्राचे मालक आहेत.
पुरवणी[संपादन]
लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत दररोज वेगवेगळ्या पुरवण्या देतात.
मंथन[संपादन]
मंथन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत रविवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.
सखी[संपादन]
सखी ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत गुरुवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.
ऑक्सिजन[संपादन]
ऑक्सिजन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत शुक्रवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.
संकेतस्थळ लोकमत.कॉम
सी.एन.एक्स
सी.एन .एक्स हि करमणूक व मनोरंजन संदर्भातील पुरवणी असून ती सोमवार , बुधवार ,शुक्रवार व शनिवारी मुख्य अंकासोबत येते.
संदर्भ[संपादन]
संदर्भ मराठी वृत्तपत्राचा इतीहास