परभणी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
परभणी जिल्हा
परभणी जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

१९° ३०′ ००″ N, ७६° ४५′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय परभणी
तालुके गंगाखेड जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम मानवत पूर्णा परभणी
क्षेत्रफळ ६,२५०.५८ चौरस किमी (२,४१३.३६ चौ. मैल)
लोकसंख्या १८,३५,९८२ (२०११)
लोकसंख्या घनता २९३ प्रति चौरस किमी (७६० /चौ. मैल)
साक्षरता दर ७५.२२%
लिंग गुणोत्तर १.०६ /
प्रमुख शहरे परभणी गंगाखेड
जिल्हाधिकारी श्रीमती . आंचल गोयल
लोकसभा मतदारसंघ परभणी (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ गंगाखेड
खासदार संजय हरीभाऊ जाधव
संकेतस्थळ


हा लेख परभणी जिल्ह्याविषयी आहे. परभणी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हाजालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील तेलंगणा राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.

परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.

परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी), संत जनाबाई गंगाखेड व संत भोजलिंग काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी नृसिंह राजारामपंत कुळकर्णी उर्फ राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे. ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओॅंकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.

आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे.

परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे. मनपा १ प्रमुख नदी :- गोदावरी महत्त्वाचे पीक :- ज्वारी समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी. खेडे:- 830 पिन कोड:- १) परभणी -431401 २) सेलू:- 431503 ३) मानवत:- 431504 ४) पठारी:-431506

जिल्ह्यातील तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

मानवत तालुकयाचे प्राचीन नाव मणिपूर हे होते