लातूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लातूर जिल्हा
लातूर जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraLatur.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय लातूर
तालुके लातूर शहरउदगीरअहमदपूरदेवणीशिरूर (अनंतपाळ)औसानिलंगारेणापूरचाकूरजळकोट
क्षेत्रफळ ७,१५७ चौरस किमी (२,७६३ चौ. मैल)
लोकसंख्या २४५५५४३ (२०११)
लोकसंख्या घनता ३४३ प्रति चौरस किमी (८९० /चौ. मैल)
साक्षरता दर ७९.०३%
लिंग गुणोत्तर १.०८:१.०० /
लोकसभा मतदारसंघ लातूर
विधानसभा मतदारसंघ अहमदपूरउदगीरनिलंगालातूर ग्रामीणलातूर शहरलोहा
संकेतस्थळ


हा लेख लातूर जिल्ह्याविषयी आहे. लातूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

लातूर जिल्हा महाराष्टाच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद विभागातील एक जिल्हा आहे.

इतिहास[संपादन]

लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने उस्मानाबाद जिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.

राजकीय स्थान[संपादन]

कै. केशवराव सोनवणे हे नवनिर्वाचित महाराष्ट्रातील लातूरचे पहिले आमदार होते. केशवराव सोनवणे यांच्या रूपानं जिल्ह्याला पहिल्यांदा सहकारमंत्रिपद मिळालं. [१]केशवरावांच्या काळात लातूर तालुक्याला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत झाली. सन १९५७ ते ६७ अशी सलग दहा वर्षे केशवराव लातूरचे आमदार होते. त्यानंतर १९७१ ते ८० असे दहा वर्षे औशाचे आमदार म्हणून त्यांनी काम केले.[२] त्यांनी १९६२ ते ६७ या काळात सहकारमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत काम केले. भूतपूर्व केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री कै. विलासराव देशमुख हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य झाले होते. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री श्री शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.


सांस्कृतिक स्थान[संपादन]

भाषा[संपादन]

लातूर हे महाराष्ट्राच्या,आंध्र प्रदेशाच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी व्यतिरिक्त कन्नड आणि तेलुगू भाषा सहज बोलतात.

चतुःसीमा[संपादन]

महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.

लातूर जिल्ह्यातील तालुके[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 • अष्टविनायक मंदिर, लातूर
 • नाना नाणी पार्क, लातूर
 • उदगीरचा किल्ला, उदगीर
 • औसा किल्ला, औसा
 • खरोसा लेणी, निलंगा
 • गंज गोलाई, लातूर
 • नागनाथ मंदिर, वडवल
 • वनस्पती बेट, वडवल (न
 • विराट हनुमान, लातूर
 • शिवमंदिर, निलंगा
 • साई धाम, तोंडार
 • साई नंदनवन, चाकूर
 • सिद्धेश्वर मंदिर, लातूर
 • हकानी बाबा, लातूर रोड
 • हत्ती बेट.

बाह्य दुवे[संपादन]

परंपरा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-amit-deshmukh-latest-news-in-marathi-4630285-PHO.html केशवराव सोनवणे यांच्या रूपानं जिल्ह्याला पहिल्यांदा सहकारमंत्रिपद मिळालं
 2. ^ http://www.loksatta.com/daily/20061109/raj03.htm सन १९५७ ते ६७ अशी सलग दहा वर्षे केशवराव लातूरचे आमदार होते.