शिंद्यांची छत्री
शिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे. हे स्मारक इ.स.च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी, महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेले आहे.[१]
पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले.[२] पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी, इ.स. १७९४ रोजी वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[३]
इ.स. १७९४ सालाच्या सुमारास वर्तमान शिंद्यांच्या छत्रीच्या जागी महादजीने बांधवलेले शिवालय होते. महादजी शिंदे यांच्या मॄत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले. समाधीच्या बाजूला मोठे शिवमंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम नक्षीकाम व रंगकाम केलेले आहे. स्मारकाच्या पुनर्बांधणीकरिता ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव शिंद्यांनी देणगी दिली आहे.[४]
ग्वाल्हेरचे सिंधिया हे महादजी शिंदे यांचे दत्तक पुत्र दौलतराव सिंधिया यांचे वंशज आहेत. त्याची देखभाल शिंदे देवस्थान ट्रस्ट, ग्वाल्हेर करते.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "महादजी शिंदे". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-10-14.
- ^ "महादजी शिंदे छत्री - उत्कृष्ट स्मारक | Maayboli". www.maayboli.com. 2020-01-01 रोजी पाहिले.
- ^ "महादजी शिंदे छत्री - वानवडी | Maayboli". www.maayboli.com. 2020-01-01 रोजी पाहिले.
- ^ Ferfatka. "फेरफटका: 'द ग्रेट मराठा' महादजी शिंदेंची वानवडीतील छत्री". फेरफटका. 2020-01-01 रोजी पाहिले.
- ^ "Pune Attractions - Shinde Chhatri". web.archive.org. 2007-01-02. 2007-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-07-20 रोजी पाहिले.