मुंबई उपनगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान

मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.


तालुके[संपादन]

मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला तालुका, बोरीवली तालुकाअंधेरी तालुका हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. Borivali हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

पर्यटनस्थळे[संपादन]

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.

या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिल्स टॉवर सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते.

हेसुद्धा पहा


संदर्भ आणि नोंदी[संपादन]