इन्फोसिस
ब्रीदवाक्य | पॉवर्ड बाय इंटेलेक्ट, ड्रिव्हन बाय व्हॅल्यूज् |
---|---|
प्रकार | सार्वजनिक |
संक्षेप |
बी.एस.ई.: 500209 एन.एस.ई.: INFY एन.वाय.एस.ई.: INFY बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य |
उद्योग क्षेत्र | माहिती तंत्रज्ञान सेवा |
स्थापना | जुलै २, १९८१ |
मुख्यालय | बंगळूर, भारत |
कार्यालयांची संख्या | ३० |
महत्त्वाच्या व्यक्ती |
एन्.आर. नारायण मूर्ती(संस्थापक, अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक) नंदन नीलेकणी(सहसंस्थापक, सहअध्यक्ष) क्रिस गोपालकृष्णन(सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक) एस्.डी. शिबुलाल(सहसंस्थापक) |
उत्पादने | 'फिनॅकल' (बँकिंग क्षेत्राकरता आर्थिक सॉफ्टवेर) |
सेवा | माहिती तंत्रज्ञानाधारित सेवा व सोल्यूशन्स |
महसूली उत्पन्न | ३ अब्ज १० कोटी अमेरिकन डॉलर |
कर्मचारी | ८८,६०१ (डिसेंबर ३१, २००७ रोजी) |
संकेतस्थळ | http://www.infosys.com/ |
इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (बीएसई.: 500209, एनएसई.: INFY) ही एन्.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात १९८१मध्ये स्थापलेली माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. १९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात ३० ठिकाणी कार्यालये आहेत. इन्फोसिसचे अदमासे ८८,६०१ कर्मचारी आहेत (डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी). २००६-२००७ सालात कंपनीचे वार्षिक उत्त्पन्न ३.१ अब्ज आणि बाजारमूल्य ३० अब्ज अमेरिकन डॉलरांपेक्षा जास्त होते.
इतिहास
[संपादन]इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेड एन्.आर. नारायण मूर्ती आणि नंदन नीलेकणी, एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात जुलै २ १९८१ मध्ये स्थापन केली.[१] राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले.[२] कंपनीची नोंदणी "इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे माटुंगा, उत्तर-मध्य मुंबई येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते. २००१ मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला "भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता" (नियुक्तकर्ता) किताब दिला होता.[३]
महत्त्वाचे विभाग
[संपादन]इन्फोसिसमध्ये सेवाक्षेत्रांनुसार विभाग करण्यात आले आहेत. त्यांना ’इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड बिझनेस युनिट’ अशी संज्ञा कंपनीमध्ये वापरली जाते. हे विभाग खालीलप्रमाणे:
- बँकिंग आणि भांडवली बाजार
- दूरसंचार माध्यमे आणि मनोरंजन
- ऊर्जा, युटिलिटीज आणि सेवा
- विमा, आरोग्यसेवा आणि जैव शास्त्रे
- उत्पादन
- रिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने आणि पुरवठा यंत्रणा
- न्यू ग्रोथ इंजिन
- भारतीय उद्योग
यांव्यतिरिक्त, येथे स्तरीय विभाग (हॉरिझॉंटल बिसनेस युनिट) आहेत:
- सल्ला (कन्सल्टिंग)
- एंटरप्राइझ सोल्यूशन
- पायाभूत सुविधा व्यवस्थापनसेवा
- प्रॉडक्ट इंजिनियरिग आणि व्हॅलिडेशन सेवा
- सिस्टिमस् इंटिग्रेशन
जागतिक कार्यालये
[संपादन]आशिया
[संपादन]- भारत: बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, भुवनेश्वर, मंगळूर,नवी दिल्ली, म्हैसूर, मोहाली, तिरुअनंतपुरम, चंदिगढ, विशाखापट्टणम (प्रस्तावित) [४]
- ऑस्ट्रेलिया: मेलबर्न, सिडनी
- चीन: बीजिंग, शांघाय
- हेसुद्धा पाहा: इन्फोसिस चीन
- हॉंगकॉंग: हॉंगकॉंग
- जपान: टोक्यो
- मॉरिशस: मॉरिशस
- संयुक्त अरब अमिराती: शारजा
- फिलिपाइन्स: Taguig City
उत्तर अमेरिका
[संपादन]- कॅनडा: टोरोंटो
- अमेरिका: अटलांटा, बेलवू, ब्रिजवॉटर, शारलेट (NC), साउथफील्ड (MI), फ्रेमॉंट, ह्युस्टन, ग्लेस्टनबरी, लेक फॉरेस्ट, Lisle (IL), न्यू यॉर्क, फिनिक्स, प्लानो, क्विंसी, रेस्टन
- मेक्सिको: मॉंटेरे
युरोप
[संपादन]- बेल्जियम: ब्रुसेल्स
- डेन्मार्कः कोपनहेगन
- फिनलंड: हेलसिंकी
- फ्रान्स: पॅरिस
- जर्मनी: फ्रांकफुर्ट, श्टुटगार्ट
- इटली: मिलानो
- नॉर्वे: ऑस्लो
- पोलंड: Lodz
- नेदरलंड: उट्रेख्ट
- स्पेन: माद्रिद, Burgos
- स्वीडन: स्टॉकहोम
- स्वित्झर्लंड: त्स्युरिख
- युके: कॅनरी व्हार्फ, लंडन
संदर्भ
[संपादन]- ^ "इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेड". mcamasterdata.com. 15 जुलै 2023 रोजी पाहिले.
- ^ "इन्फोसिसच्या इतिहासातील प्रमुख घटना". rediff.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-10-07. 7 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "कंपनीचा इतिहास". infosys.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-09-27. 23 सप्टेंबर 2013 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ विशाखापट्टणम Information Technology