टिळक स्मारक मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टिळक स्मारक मंदिर ही लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ पुणे शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे.

प्रकल्प[संपादन]

टिळक स्मारक मंदिराच्या प्रकल्पात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • सेमिनार कक्ष (तळमजला)
  • प्रेक्षागृह (पहिला मजला) - ९०१ आसनी

इतिहास[संपादन]

लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले. स्मारकाचे बांधकाम १९७२-१९७६ सालांदरम्यान पुरे झाले. बांधकामास सुमारे ४५ लाख रुपये खर्च आला. गोपाळराव देऊसकरांनी घडवलेला टिळकांचा पुतळा आणि रंगवलेली भित्तिचित्रे हे या स्मारकाचे वैशिष्ट्य आहे.