धुळे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हा लेख धुळे जिल्ह्याविषयी आहे. धुळे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
  ?धुळे जिल्हा
महाराष्ट्र • भारत
—  जिल्हा  —

२०° ५४′ ११.८८″ N, ७४° ४६′ २८.९२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ८,०६३ चौ. किमी
हवामान
वर्षाव

• ५४४ मिमी (२१.४ इंच)
मुख्यालय धुळे
तालुका/के धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
२०,४८,७८१ (इ.स. २०११)
• २११.८६/किमी
९७२ /
७४.६१ %
संकेतस्थळ: dhule.nic.in

धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि खाद्यतेल तसेच अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला,सोनगीरचा किल्ला,शिरपुरचे बालाजीचे मंदीर, देवपूरचे स्वामीनारायण मंदिर,नकाणे तलाव,डेडरगाव आणि तिखी तलाव, इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळ ही धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस,मिरची,ज्वारी, बाजरी,भात,मिरची,ऊस, केळी, द्राक्ष ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. दोंडाईचा येथील संकेश्वरी आणि इतर जातीची लालमिरची सर्वदूर सुप्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्रीशिंदखेडा.
धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी. इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणे आहे. : जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हामध्यप्रदेश राज्य.

या जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी असून त्यात पुरुष: १०,५५,६६९ महिला: ९,९२,११२ असे प्रमाण आहे. जिल्ह्याची साक्षरता ७४.६१% आहे. धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी(खान्देशी) बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिद्ध आहेत. जिल्ह्याचे तापमान कमाल: ४३ डिग्री. सेल्सिअस तर किमान: ४ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ६०० मिमी. इतका पडतो.

शेती[संपादन]

पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. शासनाच्या ११ मध्यमवर्गीय जलसिंचन प्रकल्पामुळे ५१,५९७ हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. प्रमुख पिके - ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, कापूस, मिरची, गहू, ऊस ई . आहेत.

जिल्ह्यात २ मोठे उद्योग आहेत तर ९ मध्यम उद्योग व १३२ लघुद्योग संस्था आहेत.

दळणवळणाची साधने-रेल्वे स्थानकांची संख्या: १२ (मध्य रेल्वे.-५, पश्चिम रेल्वे-७),

रस्ते: राष्ट्रीय महामार्ग: धुळे जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि क्र. ६ जातात.

पर्यटनाची स्थळे[संपादन]

अक्कलपाडा धरण

लळिंग किल्ला, पूर्व पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यावर लळिंग किल्ला आहे लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी आणि महादेव मंदिर,देवपुरचे स्वामीनारायण मंदिर, धरणे,शिरपुरचे बिजासन(विंध्यावासिनी) देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ, नगांवचे दत्त मंदिर, तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.

धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात असून निजामपूर याठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटले आहे. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे धुळे जिल्यात उद्योगधंदे वाढण्यास मदत झाली आहे.काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होत आहे. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.

संदर्भ[संपादन]