हॉकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॉकी
हॉकी
सर्वोच्च संघटना आतंरराष्ट्रीय हॉकी संघटन
सुरवात १९ वे शतक
माहिती
संघ सदस्य ११ खेळाडू मैदानात
वर्गीकरण आउटडोअर
साधन हॉकी चेंडू,हॉकी स्टीक
ऑलिंपिक १९०८,१९२०,१९२८-सद्य

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. सामान्यतः हॉकी, हा एक कौटुंबिक सांघिक खेळ आहे. खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते. हा खेळ गवताच्या मैदानावर किंवा कृत्रिम गवताच्या मैदानावर खेळला जाऊ शकतो. प्रत्येक संघात गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात. गोल आणि कडक रबर बॉलवर मारण्यासाठी खेळाडू लाकूड किंवा फायबर ग्लासपासून बनवलेल्या काठ्या वापरतात. मुठीची लांबी खेळाडूच्या वैयक्तिक उंचीवर अवलंबून असते. फील्ड हॉकीमध्ये, डाव्या हाताची कोणतीही अडचण नसते आणि फक्त एका बाजूने मारली जाऊ शकते. त्याच्या ड्रेसमध्ये शिन-गार्ड्स (गुडघ्याच्या खाली पुढच्या बाजूला पॅडिंग), क्लीट्स, स्कर्ट किंवा शॉर्ट्स आणि जर्सी समाविष्ट आहेत. २१ व्या शतकापर्यंत ते जागतिक स्तरावर खेळले जाऊ लागले. हे प्रामुख्याने पश्चिम युरोप, भारतीय उपखंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रचलित होते. हॉकी हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची गणना केली जाते. "फील्ड हॉकी" हा शब्द प्रामुख्याने कॅनडा, युनायटेड स्टेट्स, पूर्व युरोप आणि जगातील इतर भागांमध्ये लोकप्रिय झाला जेथे आइस हॉकी खेळली जाते.

हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, हॉकी विश्वचषक, चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ.आय.एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ती हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन भाग(हाफ) असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो(विश्रांति घेतली जाते).

अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉलक्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे.

ज्या देशात हिवाळ्यातील उन्हामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ एखद्या छताखाली खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा, एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. (मराठी शब्द सुचवा) ह्या मैदानाच्या क्षेत्रफळ ८०० चौरस मीटर इतके असते. शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी (मराठी शब्द सुचवा) अडथळे (अवरोधके) असतात.

मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाचे जादूगार आहेत. जे स्थान पेले यांना फुटबाल या खेळात आहे, तेच स्थान हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांना आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला होता

ज्या देशांमध्ये हॉकीचा अधिक सामान्य प्रकार आहे तेथे हा खेळ फक्त "हॉकी" म्हणून ओळखला जातो. "फील्ड हॉकी" हा शब्द प्रामुख्याने कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये वापरला जातो, जेथे "हॉकी" बहुतेकदा आइस हॉकीचा संदर्भ देते. स्वीडनमध्ये लँडहॉकी हा शब्द वापरला जातो. इनडोअर फील्ड हॉकी हा एक लोकप्रिय प्रकार आहे, जो हॉकीच्या प्राथमिक तत्त्वांना मूर्त रूप देताना अनेक बाबतीत भिन्न आहे.

हॉकीचे मैदान[संपादन]

खेळाडूंच्या जागा महत्त्वाच्या असतात.[संपादन]

हाॅकी या खेळामध्ये खेळाडूंची सध्याची व आधीची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. खेळाडूच्या स्थितीवरून त्याची हालचाल लक्षात येते. सुरुवातीला हा खेळ हिरवळीवर खेळत असत, पण सध्या आर्टिफिशियल ग्रासवर खेळतात.

चेतावणी[संपादन]

गोल[संपादन]

ज्यावेळेस चेंडू हा मैदानाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या नेटच्या कोणत्याही एका नेट मध्ये जातो किंवा ज्या वेळेस चेंडू नेटला धडकतो त्या वेळेस गोल पकडला जातो.

टाय ब्रेकर[संपादन]

हॉकी स्पर्धेत ३५-३५ मिनिटांचे दोन डाव (दोन half) असतात. जर ते दोन डाव संपल्यानंतरही दोन्ही संघांचे समान गोल असतील, तर टाय ब्रेकरची घोषणा होते. या घोषणे नंतर नाही कोणाचा विजय होतो नाही कोणाचा पराभव...

स्वरुप:-

हा खेळ चौकोनी मैदानावर प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. हे मैदान 91.40 मीटर लांब आणि 55 मीटर रुंद असून त्याच्या मध्यभागी एक मध्यवर्ती रेषा आणि 22.80 मीटरच्या दोन इतर रेषा आहेत. फेरीची रुंदी 3.66 मीटर आणि उंची 2.14 मीटर आहे...खेळाकरिता लागणारे साहित्य[संपादन]

हॉकी स्टिक[संपादन]

हॉकी स्टिक ३६.५ ते ३७.५ इंच लांब असते. पूर्वी लाकडापासून ही स्टिक बनवत असत. आता ही कंपोझिट, फायबर ग्लास यांपासून बनवतात.

हॉकीचा चेंडू[संपादन]

हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकचा असतो.

चेंडू जाळीमध्ये गेला की गोल होतो.

गोल्टीचे साहित्य[संपादन]

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

हॉकीच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खालीलप्रमाणे आहेत,

हॉकी ह्या विषयावर आधारित चित्रपट[संपादन]

  • चक दे इंडिया (हिंदी चित्रपट). प्रमुख भूमिका - शाहरूख खान
  • गोल्ड (हिंदी चित्रपट). प्रमुख भूमिका - अक्षयकुमार

बाह्य दुवे[संपादन]

१५:०५, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)१५:०५, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)१५:०५, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)~