मनोहर जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनोहर जोशी

कार्यकाळ
१४ मार्च इ.स. १९९५ – ३१ जानेवारी इ.स. १९९९
मागील शरद पवार
पुढील नारायण राणे

कार्यकाळ
१० मे इ.स. २००२ – ४ जून इ.स. २००४
मागील जी.एम‌.सी.बालयोगी
पुढील सोमनाथ चॅटर्जी

मनोहर जोशी (डिसेंबर २, इ.स. १९३७ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००२ या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. ते शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.

पूर्वेतिहास[संपादन]

मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.

नंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले.मुंबईत कोहिनूर या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. पुढे बाळ ठाकरे यांची भेट झाल्यावर दिवस पालटले आणि मनोहर जोशी यांची राजकारणात भरभराट झाली.

मनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्था[संपादन]

  • कोहिनूर क्लासेस (दादर-मुंबई,)
  • मनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई)
  • कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (मुंबईत अंधेरी, कल्याण, घाटकोपर, दादर, आणि मुंबईबाहेर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, रत्‍नागिरी, सांगली वगैरे एकूण ४० ठिकाणी)
  • कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्ड टूरिझम कॉलेज (दादर-मुंबई), वगैरे वगैरे.

संदर्भ[संपादन]

कोहिनूर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स

मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आयुष्य कसे जगावे? (प्रकाशन - २-१२-२०१६)

बाह्य दुवे[संपादन]

http://www.tribuneindia.com/2006/20060321/main3.htm

मागील
जी.एम‌.सी.बालयोगी
लोकसभेचे अध्यक्ष
मे १०, इ.स. २००२ - जून ४,इ.स. २००४
पुढील
सोमनाथ चॅटर्जी
मागील
शरद पवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मार्च १४, इ.स. १९९५ - जानेवारी ३१, इ.स. १९९९
पुढील
नारायण राणे