कात्रज सर्प उद्यान
Appearance
कात्रज सर्पोद्यान हे पुण्यात भारती विद्यापीठाजवळ पुणे सातारा महामार्गावर कात्रज येथे वसलेले आहे. इ.स. १९८६ मध्ये नीलम कुमार खैरे यांनी ते वसवले.ते सर्पोद्यानाचे पहिले संचालक होते. सर्व जातींचे सर्प, सरपटणारे प्राणी आणि प्राणिजगतातल्या अनेक जीवांना येथे संरक्षण देऊन त्यांचे जतन व संवर्धन केले जाते. इ.स. १९९९ मध्ये या सर्पोद्यानाचा राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी संशोधन केंद्रात समावेश केला गेला जे की पुणे महानगरपालिकेतर्फे व्यवस्थापित केले जाते.सापासारख्या प्राणघातक समजल्या जाणाऱ्या प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करून सापाबद्दल त्यांच्या मनात असलेली अज्ञात भीती काढून टाकून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ही संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करते.